तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 28 April 2018

नगर जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन तरुण कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या


प्रतिनिधी :दि.२८
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच थरार  जामखेड बंदचे आव्हान
जामखेड : केडगाव येथील  दोन शिवसैनिकांच्या हत्याकांडाची घटना २१ दिवसापूर्वीची ताजी असतानाच आज जामखेड येथे पुन्हा राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडल्यामुळे जिल्हा हादरुन गेला आहे.पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातच हा थरार घडला आहे.हत्या झालेले दोघे चुलत भाऊ आहेत.
राष्ट्रवादी युवक काँगे्सचा जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय २९) व राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राकेश ऊर्फ रॉकी अर्जुन राळेभात(वय २८)  हे दोघे जामखेड शहरातील बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर एका हॉटेलमध्ये  बसलेले असताना सायंकाळी सव्वा  सहा वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून तीन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यांनी गावठी कट्ट्यातून योगेश व राकेश यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या़ त्यानंतर तीनही हल्लेखोर बीडच्या दिशेने मोटारसायकलवरुन पळून गेले.
गोळीबारानंतर ते दोघही एकाच जागेवरच पडून होते. नंतर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. परंतु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे दोन्ही रुग्ण उपचाराअभावी अर्धा तास पडून होते. अर्ध्या तासाने वैद्यकीय अधीक्षक सी. व्ही. लामतुरे आल्यानंतर प्राथमिक उपचार करून जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले़.
दरम्यान उद्या जामखेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.  पालकमंत्री राम शिंदे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल झाले असून जमाव संतप्त झाला आहे.योगेश आणि राकेश हे दोघेही मोरे वस्ती येथी

अनाधिकृत इंग्रजी माध्यम शाळेचे गेवराई तालुक्यात पेव फुटले

सुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि. २८ __ शासनाची कसलीही मान्यता न घेता गेवराई शहर व तालुक्यात अनाधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे पेव फुटले आहे. अनाधिकृत इंग्रजी शाळामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होण्याची दाट शक्यता असल्याने शिक्षण विभागाने अनाधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
   नविन शैक्षणिक वर्ष जून महिण्या पासून सुरु होत आहे. गेवराई शहर व तालुक्यातील काही व्यक्तिनी शासनाची कसलीही मान्यता न घेता टपऱ्या सारख्या इंग्रजी शाळा अनाधिकृतपणे सुरू झाल्या आहेत. कोणतीही शाळा सुरु करण्यापुर्वी शासनाची मान्यता असणे बंधंनकारक आहे, माञ शिक्षण विभागाचे कसलेही निमंत्रण नसल्याने कोणताही विचार न करता अनेकांनी अनाधिकृत पणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या आहे. शासनाच्या धोरणा नूसार प्रत्येक विद्यार्थ्याची आॅनलाईन नोंद होणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला क्रमांक मिळतो. शासनाची अधिकृत मान्यता असलेल्या शाळामध्ये आरटीई प्रमाणे पंचविस टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळतो. माञ अनाधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची कोठेही नोंद होत नाही. परीणामी अशा अनाधिकृत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना याचा फटका बसू शकतो. यांचे भवितव्य अधांतरी असल्याने शिक्षण विभागाने अनाधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर कारवाई करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी होत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

ग्रा. पं. कर्मचाऱ्यांनी आंदोलनास उपस्थित रहावे - नारायण जाधव

सुभाष मुळे...
-------------
गेवराई, दि. 28 __ ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि.१ मे मंगळवार रोजी कामगार दिनी गेवराई येथील पंचायत समिती कार्यालय समोर आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नारायण जाधव यांनी केले आहे.
     सरकारचा शेवटचा व कायम उपेक्षित राहिलेला कर्मचारी म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी आहे, परंतु या कर्मचाऱ्यांना शासनाकडून कायम दुर्लक्षित केलेले आहे, आजही हा कर्मचारी तुटपुज्या वेतनावर आपली व आपल्या कुटूंबाची गुजरान करीत आहे, परंतु मागील सहा महिण्यापासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे, तरी त्यांच्या वेतनाचा घोळ शासन दरबारी लवकर सुटावा व त्यांचे वेतन नियमित व्हावे अशी मागणी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून मागण्या प्रलंबित आहेत यामध्ये कर्मचारी वेतन, राहणीमान भत्ता, निवृत्ती वेतन या व इतर प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
     महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे, जिल्हासचिव बळीराम पवार, जिल्हाउपसचिव यासीन शेख व जिल्हा कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई येथील पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात गेवराई तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत कर्मचारी यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष नारायण जाधव यांनी केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

तुकाराम मुंढे आज थेट नागरिकांमध्येच जाऊन पोहोचले


नाशिकमध्ये मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या 'वॉक विथ कमिशनर' या कार्यक्रमाला अखेर सुरुवात झाली आहे. 21 एप्रिलला मुंढे यांच्या आईची तब्येत बिघडल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाहोता. पूर्वसुचनेसह तक्रार करणाऱ्या नागरीकांशी थेट संवाद साधत सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी आयुक्त मुंढे हजर झाले होते. आयुक्त मुंढे ऑनलाईन तक्रार निवारण आणि प्रशासनात शिस्तीवर भर देतात.मात्र थेट नागरिकात जात त्यांनी नाशिककरांच्या समस्या जाणून घेत निवारण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. तसंच प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये जो गैरसमज पसरवला जातो, तो दूर करण्याचा प्रयत्नही केलाय. या उपक्रमाच्या माध्यमातून नगारिकांना तक्रारी, सूचना तसेच शहराच्या विकासाबाबत संकल्पना मांडण्याची संधी प्राप्त झालीय. मुंढे यांनी अनेक नागरिकांना कायद्याचे धडे दिलेय तर अधिकाऱ्यांना काम न केल्याने विचारणा करण्यात येतेय. आतापर्यंत 71 तक्रारीचे निवारण करण्यात आलं आहे. या उपक्रमानंतर आयुक्तांशी संवाद साधल्यानंतर नागरिकांनी आयुक्तांच्या उपक्रमाचे स्वागत केलं आहे. तर आपल्या समस्या लवकर सोडवल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाने सरकारचे ७ जीआर फाडले.


मराठा क्राती मोर्चाची राज्यव्यापी बैठक मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणा संदर्भात सरकारने काढलेले सात जीआर फाडून फेकण्यात आले. सरकार मराठा समाजाची आरक्षणा संदर्भात दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीमधून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा जवळा(नि) शाळेस ISO मानांकन

बाळासाहेब राऊत
मुंबई :दि.२८ GDP foundation प्रणित, कर्मवीर परीवाराची तालुक्यातील दुसरी तर पहीली केंद्रीय प्राथमिक शाळा ISO  होण्याचा मान जवळा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेस मिळाला आहे.आज शाळेस ISO  प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करणार्या सर्व ज्ञात अज्ञात शिक्षणप्रेमी नागरिक, मा.औदुंबर उकिरडेसाहेब (शिक्षणाधिकारी),मा.रोहीणी कुंभार मँडम(उपशिक्षणाधिकारी), मा.कदम साहेब(मा.गटशिक्षणाधिकारी),मा.अशोक खुळेसाहेब(गटशिक्षणाधिकारी, परंडा) ,मा.जगदाळे मँडम(विस्तार अधिकारी) मा.श्रीमंत चौरे सर(केंद्र प्रमुख),मा.नवजीवन चौधरी(सरपंच),मा.अशोक गवारे(उपसरपंच)मा.हनुमंत तात्या कातुरे पाटील(अध्यक्ष, माधवगीरी आश्रम)मा.राजेंद्र खैरे(अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) मा.भाऊसाहेब गवारे(अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, प्रशाला)सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत,सर्व शिक्षक स्टाफ व महादेव राऊत नाना (परीचर) सर्वांचे  आभार.

शेतमजुराचा मुलगा गिरीश बडोले राज्यात पहिला

बाळासाहेब राऊत
मुंबई : दि.२८ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून उस्मानाबादमधील गिरीश बडोलेने महाराष्ट्रातून पहिला तर देशात विसावा क्रमांक पटकावला आहे.
गुणवत्ता यादीत ९९० विद्यार्थी
गुणवत्ता यादीत एकूण ९९० परीक्षार्थींचा समावेश आहे. त्यात ४७६ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील, २७५ विद्यार्थी इतर मागासवर्गीय, १६५ विद्यार्थी अनुसूचित जाती आणि ७४ विद्यार्थी अनुसूचित जमातीतील आहेत.
गिरीश बडोलेचे वडील शेतमजूर आहेत. त्यांची दोन एकर शेतजमीन आहे. गिरीशचा एक भाऊ मेकॅनिकल इंजीनियर आहे. गिरीशचं दुसरीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण कसगीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर तिसरी आणि चौथीत तो कासार शिरसी येथील कारीबसवेश्वर विद्यालयात होता. त्याने तुळजापूर येथील सैनिकी विद्यालय माध्यमिक शिक्षण घेतलं. दयानंद विद्यालय लातूर येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईत आला. मुंबईतील जे. जे. मेडिकल कॉलेजमधून त्याने एम. बी. बी. एस. पदवी घेतली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील १६ विद्यार्थी यशवंत ठरले आहेत. यात गिरीश बडोले (२०), दिग्विजय बोडके (५४), सुयश चव्हाण (५६), भुवनेश पाटील (५९), पियुष साळुंखे (६३), रोहन जोशी (६७), राहुल शिंदे (९५), मयुर काटवटे (९६), वैदेही खरे (९९), वल्लरी गायकवाड (१३१), यतिश विजयराव देशमुख (१५९),रोहन बापूराव घुगे (२४९), श्रीनिवास वेंकटराव पाटील (२७५), प्रतिक पाटील (३६६), विक्रांत सहदेव मोरे (४३०), तेजस नंदलाल पवार (४३६) या परीक्षार्थींचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर २०१७ रोजी घेण्यात आली होती.

मोटार सायकल अपघातात चार जन जखमी;पाथरी परभणी महामार्गावरील घटना


प्रतिनिधी
पाथरी:-दोन मोटारसायकलच्या झालेल्या भिषन अपघातात एका महीलेसह चार जन गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार २७ एप्रील रोजी दुपारच्या सुमारास पाथरी परभणी महामार्गावर घडली असुन यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रूग्नालयात हलवण्यात आले आहे.
     मानवत तालूक्यातील पोंहडूळ येथील २८ वर्षीय प्रकाश तुपसमिंदरे हे सासरवाडी पाथरी तालूक्यातील खेर्डा येथुन पत्नी प्रियंका हीस मोटारसायकवर बसवुन शुक्रवार २७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास पोहंडूळ आपल्या गावाकडे पाथरी - परभणी २२२ महामार्गावरुन जात होते तर याच वेळेला पाथरी येथील झानेश्वर नगर येथील ३५ वर्षीय अशोक गव्हाणे व पप्पू नवघरे हे दोघे जन मोटारसायकलवर मानवत कडून पाथरी कडे येत असतांना या दोन्ही मोटार सायकल चा महामार्गावरील दालमिलच्या काही अंतरावर अपघात झाल्याने यात दोन्ही गाडयावरील चौधे जन गंभीर रीत्या जखमी झाले होते यातील प्रियंका प्रकाश तुपसमिंदरे , प्रकाश तुपसमिंदरे ,व पप्पू नवघरे यांच्यावर पाथरी येथील ग्रामीण रुगनालयात प्राथमिक उपचार करण्यात आले तर अशोक गव्हाणे  यांच्यावर शहरातील खाजगी रुग्नालयात उपचार करून यांना पुढील उपचारार्थ परभणी जिल्हा सामान्य रुगनाल्यात हलवण्यात आले आहे . या अपघातात प्रकाश तुप संमिदरे यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते

नितीन क्रीडा मंडळाच्या वतीने उन्हाळी लेदरबाँल क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

प्रतिनिधी
सेलू: -येथील नितीन कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने शहरातील  पारीख काँलनी येथे उन्हाळी लेदरबाँल क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन वक्षरोपन करून करण्यात आले. 

यावेळी  मंडळाचे अध्यक्ष माजी आ.हरिभाऊ लहाने,  उद्योजक नंदकिशोर बाहेती , उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, माजी नगराध्यक्ष पवनराजे आडळकर,  व्हिजन इग्लिंश स्कुलचे  अध्यक्ष संतोष कुलकर्णी, परसराम गेना,  मंडळाचे सचिव संदीप लहाने, पारस काला, गणेश माळवे आदी उपस्थित होते. 

या प्रंसगी बोलतांना उद्योजक नंदकिशोर बाहेती म्हणाले की  वृक्षारोपनात जशी वाढ होईल त्याप्रमाणे नितीन क्रीडा मंडळाची प्रगती होईल   आज युवक खेळाडू मैदानावर न राहता मोबाईल व टि.व्ही वर गुंतले आहेत  तर खेळाडू नी मैदानात येऊन आपली प्रगती करावी असे म्हटले व आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . 

हे  प्रशिक्षण शिबिर 26 एफ्रील ते 30 मे पर्यंत रोजी सांय 5 ते 6:30 वा . घेण्यात येणार आहे. शिबिरास 50 खेळाडू सहभागी झाले आहेत. प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय क्रिकेट पटू संदीप लहाने, प्रा. राजेश राठोड यांचे लाभणार आहे.  

या प्रशिक्षण शिबिरात क्रिकेट सोबत व्हाँलीबाँल, कबड्डी, टेनिस व्हाँलीबाँल , खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

यशस्वी ते साठी  अमर सुरवसे, सचिन भेंडे, दिपक निवळकर, गजानन शैलार, राहुल भांडे परीश्रम घेत आहेत.

◾फोटो ओळी

सेलू◾येथील पारीख काॅलनी मध्ये वृक्षारोपण नंतर लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करतांना उपगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, माजी आ.हरीभाऊ लहाने,नंदकिशोर बाहेती,पवनराजे आढळकर,संतोष कुलकर्णी,संदीप लहाने,ईतर .

रोहित गुट्टेचे यु.पी.एस.सी परीक्षेत घवघवीश यश

 परळी वैजनाथ : तालुक्यातील गुट्टेवाडी येथील रोहित माणिकराव गुट्टे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशा मिळविले आहे. देशात त्याला ७३४ ची रँक मिळाली आहे. गुट्टेवाडी सारख्या ग्रामीण भागात असतानाही रोहितने हे यश जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळविले आहे. रोहितचे वडील हे पशुवैद्यकीय डॉक्टर असून त्याच्या यशमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. रोतिची बहीणही नायब तहसील तर भाऊ के.एम मुंबई येथे उ्च्च शिक्षण घेत आहे. घरातूनच मोठी प्रेरणा असल्याने राहूलचा या क्षेत्राकडे कल होता. अखेर अथक परीश्रमानंतर त्याला यश मिळाले असून त्याचे कौतूक होत आहे.  ग्रामस्थांकडून होणार सन्मान राहूलने देशात ७३४ वा क्रमांक पटकावून गावाचे नाव उज्वल केले आहे. त्यमुळे १ मे महाराष्ट्र दिनादिवशी गटविकास अधिकारी संजय  केंद्रे, तहसीदार शरद झाडगे, संरपंच बाळासाहेब गुट्टे, राम गुट्टे, दिलीप गुट्टे,विकास गुट्टे, पाराजी गुट्टे, हरीराम दराडे, सुरेश् गुट्टे, परमेश्वर गुट्टे, हनुमंत गुट्टे व भागवत गुट्टे व ग्राम स्थांच्या वतीन बुधवारी हात सोहळा रंगणार आहे. 

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

विद्यूत अभियंत्याच्या निलंबनासाठी गेवराई तालुक्यात बुधवारी आंदोलन

सुभाष मुळे...
-----------------
गेवराई, दि. 28 __ शेतकऱ्यास अरेरावी करुन खुर्चीने मारहाण केल्या प्रकरणी विद्युत अभियंता लगड यांना सेवेतून तातडीने निलंबीत करावे यामागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या 2 मे रोजी सकाळी 11 वाजता तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
           गेवराई तालुक्यातील धोंडराई 33 के.व्ही.सबस्टेशन याठिकाणी लाईटच्या चौकशीसाठी गेलेल्या बाबासाहेब नारायण कोरडे या शेतकऱ्यास विद्युत अभियंता लगड यांनी अरेरावी करुन खुर्चीने मारहाण केली. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अभियंता लगड यांना निलंबीत करावे या मागणीचे निवेदन तहसीलदार संजय पवार यांना दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यास अरेरावी करुन खुर्चीने मारहाण केल्या प्रकरणी विद्युत अभियंता लगड यांना सेवेतून तातडीने निलंबीत करावे, न केल्यास येत्या बुधवार, दि. 2 मे रोजी सकाळी 11.00 स्वाभिमानी शेतकरी संघटना गेवराई तालुका वतीने धोंडराई फाटा सबस्टेशन जवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
     यावेळी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी युवती शेतकरी संघटनेच्या अध्यक्षा पुजा मोरे, तालुकाध्यक्ष राजेन्द्र डाके पाटील, बाबासाहेब कोरडे, विक्रम तुरुकमारे, अंजीर पवार, विनोद खरात, कपील वडघणे आदि शेतकरी उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

अंबिका आर्बन भोकरदन शाखेत श्रीमती दयादेवी कोठारी यांना श्रध्दांजली...

  प्रतिनिधी : भोकरदन

  भोकरदन येथे अंबिका आर्बन बॅंकेचे अध्यक्ष विजय कोठारी यांच्या मातोश्री श्रीमती दयादेवी गोपालदास कोठारी यांना बॅंकेच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली
या वेळी बॅंकेचे स्थानिक सल्लागार डाॅ.विपिन काबरा,विनायक औटी,संजय पिसे,आढाव साहेब,विठोबा गिरणारे,बॅंक मॅनिजर विजय देशमाने सह बॅंक कर्मचारी उपस्थित होते.

अहमदपूर येथे दिलीपराव गुट्टे यांचा धनराज गुट्टे यांच्या हस्ते सत्कार

अहमदपूर (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील नंदनज येथील ल
कोकण विभागाचे विभागीय उपायुक्त (पुरवठा) दिलीपराव गुट्टे साहेब हे आज अहमदपूर येथे आले असता. धनराज विक्रम गुट्टे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट प्रसंगी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
      यावेळी सारडगावचे सिद्धेश्वर आघाव , श्री डोळे साहेब यांच्या सह इतर उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे वंचित लोकांचा विकास झाला-डॉ.अंजलीताई घाडगे

बोधीवृक्ष प्रतिष्ठाण व दिपीकाताई जाधव विचारमंचच्या वतीने मान्यवरांना पुरस्कार, शालेय साहित्य वाटप व प्रबोधनपर व्याख्यान
-----------------------------
अंबाजोगाई (प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला संविधानाच्या माध्यमातून आज संपुर्ण देश चालत असून संविधानाने भारतीय लोकशाही बळकट केली आहे. आरक्षणामुळे वंचित व तळागळातील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात योगदान देता येत आहे.शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्याने सामाजिक अभिसरण होवून त्याचा सकारात्मक परिणाम देशात झाला.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे डोक्यावर घेण्यापेक्षा ते डोक्यात घेण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.त्याशिवाय देशातील सामाजिक विचारांची दरी कमी होणार नाही.असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजलीताई घाडगे यांनी केले.त्या येथील बोधीवृक्ष प्रतिष्ठान व दिपीकाताई जाधव विचारमंचच्या वतीने मान्यवरांना पुरस्कार, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रमात शुक्रवार, दिनांक 27 एप्रिल रोजी बोलत होत्या.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त बोधीवृक्ष प्रतिष्ठान व  दिपीकाताई जाधव विचारमंच यांच्या वतीने शहरातील लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात जाहीर व्याख्यान,शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच विविध क्षेञातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.  या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजलीताई घाडगे (केज) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अांबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दाजीसाहेब लोमटे,
ज्येष्ठ पत्रकार अ.र.पटेल,संपादक स.का.पाटेकर,अमीर पटेल,ज्ञानेश्वर वैद्य तसेच सत्कारमुर्ती महादेव लोखंडे,डॉ.संजय बनसोडे,प्रा.किर्तीराज लोणारे,नागेश औताडे, ऋचा जगन सरवदे, सय्यद अमजद यांची यावेळी विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी नागेश औताडे (पञकारीता),महादेव लोखंडे (रंगकर्मी), डॉ.संजय बनसोडे (वैद्यकिय सेवा), कु.ऋचा उर्फ सावली जगन सरवदे (क्रिडा), प्रा.किर्तीराज लोणारे (शैक्षणिक),सय्यद अमजद (सामाजिक) यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप शाल,पुष्पहार,पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे होते. शहर व परिसरातील 127 हुन अधिक विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटपही करण्यात आले.या प्रसंगी डॉ.संजय बनसोडे, नागेश औताडे,महादेव लोखंडे व प्रा.किर्तीराज लोणारे यांनी सत्काराला उत्तर दिले.तर अध्यक्षीय समारोप करताना दाजीसाहेब लोमटे यांनी सदरील उपक्रमाचे स्वागत करून संयोजकांचे अभिनंदन केले.अंबाजोगाईत यापुढेही हा उपक्रम सातत्याने सुरू रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रमुख वक्ते मच्छिंद्र खाकरे (जिल्हाध्यक्ष,प्रोटान, बीड) यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलुंची मांडणी आपल्या अभ्यासपुर्ण व्याख्यानातून केली. सद्य:स्थितीत शिक्षण व्यवस्था कोलमडून पडल्याचे सांगुन बहुजन समाजातील उपेक्षीत व वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दुर ठेवण्याचे काम विद्यमान सत्ताधारी करत असल्याचे ते म्हणाले. अशा काळात आरक्षणाच्या माध्यमातून जी माणसे मोठी झाली,विकसीत झाली त्यांनी आपली जबाबदारी ओळखून वंचित घटकांच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मच्छिंद्र खाकरे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मकरंद जोगदंड यांनी करून उपस्थितांचे आभार अरविंद साळवे यांनी मानले.तर प्रास्ताविक दयानंद कांबळे यांनी केले.
यावेळी आयोजक
बोधीवृक्ष प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दयानंद कांबळे,
दिपीकाताई जाधव विचारमंचचे अध्यक्ष मोबीन देशमुख,सचिव अजय गोरे,उपाध्यक्ष अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल उघडे,आकाश कांबळे, अमर कांबळे,संतोष सोनवणे,पल्लवी मस्के, पुजा जोगदंड,वैशाली शिंदे,शुभम शिंदे,सुधीर जाधव,भारत क्षीरसागर, ऋषीकेश जोगदंड, प्रताप दासुद,अभिषेख जोगदंड आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतसेाठी पुढाकार घेतला.यावेळी सभागृहात अंबाजोगाई शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.