तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 5 May 2018

महापुरुषांना वंदन करुन केला नवीन घरात गृहप्रवेश

बाळासाहेब राऊत
मुंबई दि:०४अल्प शिक्षण असून ही समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारा एक उमदा तरुण त्यांचे नाव  बापू विठ्ठल आठवले राहणार रामपूर ता.जत जि.सांगली.शिक्षण पाचवी पर्यंत परिस्थिती हलाखीची असताना देखील शून्यातून विश्व निर्माण करून कोणतीही नोकरी नसतानाही पन्नास लाख रुपये खर्च करून घर बांधून समाजापुढे एक नवीन आदर्श घालून दिला.ते म्हणाले की डोक्यात बुद्ध फुले शाहू व आंबेडकर यांचे विचार आणि मनात जिद्द व चिकाटी असेल तर कोणत्याही कामात यश नक्की मिळते.आजच्या तरुणाने नोकरीच्या नादी न लागता उद्योग धंद्याकडे वळले पाहीजे असा संदेश बापू आठवले यांनी आजच्या तरुणांना दिला.
गृहप्रवेश सत्यनारायण न घालता बहुजन महापुरुष व राष्ट्रमातांना वंदन करून  नवीन घरात गृहप्रवेश. या घटनेतमुळे सर्व स्तरातून बापू आठवले यांचे कौतुक होत आहे.

“आपले सरकार”च्या मंत्रालयातील बैठकीवर संगणक परिचालक संघटनेचा बहिष्कार

डिजिटल महाराष्ट्र व पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर!

मुंबई(प्रतिनिधी)आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायती डिजिटल तसेच पेपरलेस करण्याचे काम जे संगणक परिचालक करत आहेत त्यांना मागील ०६ महिने ते ०१वर्षा पासून मानधन नाही संगणक परिचालकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ०७ मे २०१८ रोजी मंत्रालय मुंबई येथे होत असलेल्या बैठकीवर राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने बहिष्कार टाकला असल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.
       शासनाने अनेक वेळा आश्वासन देऊन सुद्धा मागील १७ महिन्या पासून आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाचे काम सुरळीत झालेले नाही,काम करूनही संगणक परिचालकांना वर्ष वर्ष मानधन मिळत नसल्यामुळे संगणक परिचालक हवालदिल झालेले असताना दुसरीकडे csc-spv या कंपनीने या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु केला आहे त्याकडे शासनानेडोळेझाक करून कंपनीला पाठीशी घातल्याचे दिसत आहे.संगणक परिचालकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी आश्वासन दिले पण त्या आश्वासना नुसार काहीच अमलबजावणी झालेली नाही,यामुळेच राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी ०७ मे रोजी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवर बहिष्कारटाकण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्र्याना दिलेला शब्द ग्रामविकास विभागानेपाळला नाही
        आपले सरकार सेवा केंद्रासाठीचा निधी  १४ व्या वित्त आयोगातून देण्यास राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचा विरोध असल्यामुळे संगणक परिचालकांचे मानधन राज्याच्या अर्थसंकल्पातून करावे यासाठी ०५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मोर्चा काढण्याचे नियोजन संघटने कडून करण्यात आले होते,तत्पूर्वी ०४ मार्च रोजी रात्री ११ वाजता मा.मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्रामविकासमंत्री ना.पंकजा मुंडे,ग्रामविकास सचिव असीम गुप्ता,मुख्यमंत्री यांचे विशेषकार्यअधिकारी कौस्तुभ धवसे,पोलीस उपायुक्त मनोजकुमार शर्मा याच्यासह संघटनेच्या १२ प्रतिनिधी सोबत बैठक घेण्यात आली,त्यामुळे ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्र्यांना शब्द दिला कि ०१ मे पासून ज्या ग्रामपंचायती निधी देणार नाहीत तेथील संगणक परिचालकांचे संपूर्ण मानधन वेगळी योजना तयार करून ग्रामविकास विभाग देईल त्यावर मे महिन्यात काहीच हालचाल झालेली नाही.
CSC-SPV कंपनीमुळे पेपरलेस ग्रामपंचायती कागदावरच –
राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतीचे हस्तलिखित कामकाज बंद करून सर्व ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी ग्रामविकास विभागाने ०१ एप्रिल २०१८ हि तारीख ठेवलेली असताना ०१ मे होऊन राज्यातील एकही ग्रामपंचायत पेपरलेस होऊ शकलेली नाही,कारण कि या ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी csc-spv कडून ई-ग्राम सोफ्ट हे सोफ्टवेअर तयार केले आहे,गेल्या १७ महिन्या पासून तयार केलेल्या या सोफ्टवेअर मध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे पेपरलेस ग्रामपंचायती करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे,कंपनीने आपले सरकार प्रकल्पासाठी करोडो रुपयांचा निधी घेतला पण चांगले सेवा देण्या ऐवजी निकृष्ट दर्जाचे सोफ्टवेअर देऊन शासनाची फसवणूक केली,त्यातच स्टेशनरी न देता ग्रामपंचायती कडून निधी घेतला आहे,विनाकारण संगणक परिचालकांचे मान्ध्फ्न कपात केले  यामुळे  शासनाची प्रतिमा मिलन झाली.
*ई-पंचायत पुरस्कार मिळऊन देणारे वाऱ्यावर-*
केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला त्यावेळी हा पुरस्कार ग्रामविकासमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी स्वीकारला होता या पुरस्काराची मोठी चर्चा झाली परंतु ज्या ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकानी मानधन नसताना  शासनाला मिळउन दिलेला आहे त्या संगणक परिचालकांना एक एक वर्ष मानधन नाही त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम राज्य शासन करत आहे.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

वरवट बकाल येथे जैन फाऊन्डेशन निवाणाच्या वतीने  भव्य बौध्द धम्मीय सामुहिक विवाहसोहळयात 51 जोडपे विवाह बध्द 


संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील वरवट बकाल येथील जेतवन बुद्धविहार मध्ये जैन फाऊन्डेशन निवाणाच्या वतीने भव्य बौद्ध धम्मीय सामुहित विवाह ४ मे रोजी मोठ्या उत्सहात संपन्न झाला आयोजीत बौद्ध धम्मीय सामुहिक विवाह सोहळ्यात 51 जोडपे विवाह बद्ध झाले या विवाह सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रामकृष्ण रजाने हे होते तर भव्यदिव्य बौध्द धम्मीय विवाह सोहळ्याचे उदघाटन दानशुर भारिप ,सामाजीक नेते रविन्द्र भेलके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आ डॉ संजय कुटे, कॉग्रेसनेते अॅड प्रसेन्नजीत पाटील, भाऊ भोजने ,राजेश्वर देशमुख , डॉ स्वातीताई वाकेकर, शंकर पुरोहित,देविदास दामोदर, भिमराव तायडे, दशरथ सुरडकार, डॉ संदिप वाकेकर, राजेन्द्र वानखडे, डॉ हागे,श्याम डाबरे, पंजाबराव वानखडे,संदिप अवचार, विविध राजकिय पक्षाचे नेते सामाजीक कार्यकर्तेनी सामुहिक विवाह स्थळी भेट देऊन नववधु वरांना आशिर्वाद दिला 

बौध्द धम्मीय विवाह सोहळ्यात वर व वधु यांना राजेश्वर देशमुक यांनी 2 झाडे दिले व पाण्याची व्यवस्था केली होती तर पाहुने व आमंत्रीत मंडळीसाठी भारिप नेते रविन्द्र भेलके यांनी जेवणाची व्यवस्थाकेली होती तर नेहमी बहुजन समाज बांधवाच्या सुख दुखात सामाजीक कामासाठी सदाअग्रेसर असणारे परंतु प्रसिध्दी पासुन नेहमी अलीप्त राहणारे शिक्षक

वासुदेव सुबेदार यांनी बौध्द धम्मीय सामुहिक विवाह स्थळी भव्य दिव्य मंडप दिला होता या सामुहिक विवाह सोहळयात विवाह करणाऱ्या जोडप्याना कन्यादान योजने अंतर्गत शासकीय अनुदानसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आयोजक भारिप जि उपाध्यक्ष संजीव इंगळे , माजी सैनिक मेजर सुनिल शिवणकार यांनी वधुच्या पालकांना दिले 

सामुहिक विवाह सोहळयात मान्यवरांची समायोचीत भाषणे झालीत 

सामुहिक विवाह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबुराव सोनोने , आबाराव इंगळे, निरंजन इंगळे, भारत वानखडे,हुसेन सुरत्ने, महादेव अजने, शंकर ससाने, सुधाकर खंडेराव, सचिन शेगोकार, भिमक्रांती मंडळचे अध्यक्ष पंकज इंगळे, विशाखा महिला मंडळ, भिमपर्व ग्रुप च्या पदाधिकाऱ्यानी अथक परिश्रम घेतले  

बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता !


अंबाजोगाई प्रतिनिधी
केज तालुक्यातील एका खेडेगावातील महिलेने  आरोपीविरूद्ध घरात घुसून बलात्कार केल्याची तक्रार केली होती त्या आरोपातून आरोपीची येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एस.व्ही. हांडे यांनी निर्दोष मुक्तता केली.
सविस्तर वृत्तांत असा की, केज तालुक्यातील एका खेडेगावातील येथील महिलेचा पती दिनांक १९/०९/२०१६ रोजी  तिचे माहेरी गेल्याने तिच्या लहान मुलामुलींसह जेवण करून झोपली असताना रात्री ०८.०० वाजणेच्या दरम्यान  आरोपी दारासमोर येऊन दार वाजवू लागल्याने दार उघडले असता धमकी देऊन बळजबरीने बलात्कर केला व धमक्या देऊन निघून गेल्याची तक्रार पिडीत महिलेने पोलिस स्टेशन केज येथे दि. २०/०९/२०१६ रोजी दिल्याने गुन्हा कलम ३७६, ४५२, ५०४, ५०६ भा.द.वि. प्रमाणे नोंद करण्यात आला. त्याचा गुन्हा रजि. नं. २९४/२०१६ नोंदवून आरोपी रामदास कलाने यास अटक केली व गुन्ह्याचा तपास पो. नि. गाडेवाड यांनी पूर्ण करून केज न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश श्री. एस.व्ही. हांडे यांचेसमोर झाली. सरकार पक्षातर्फे फिर्यादी महिलेसह एकुण पाच साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. पिडीत महिलेने न्यायालयात आरोपीविरूद्ध साक्ष दिली. तथापि पुराव्यातील विसंगती व साक्षीदारांच्या घटना काळातील कृती यामुळे संशय निर्माण झाल्याचा युक्तीवाद केल्याने तो मान्य करून आरोपी रामदास  कलाने याची दि. ०५/०५/२०१८ रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीची बाजू ॲड. दत्तकुमार लांब यांनी मांडली. त्यांना ॲड. सचिन शेप, ॲड. चंद्रकांत चौरे, ॲड. सुनिल हारणावळ यांनी सहाय्य केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी पकडली खडका येथील अवैध वाळू वाहतुकीची वाहने


चार ट्रक्टर पैकी दोन जप्त दोन गेले पळुन

सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील खडका येथे गावातील स्वयंघोषीत पुढाऱ्यांनी एकत्र येऊन संगणमताने मागील अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा करत शासनाचा लाखो रुपयांचा महसुल लाटला आहे.या ठिकाणी करण्यात येणारा वाळू उपसा महसुल प्रशासनाच्या आर्शीवादाने  केला जात असल्याने या ठिकाणी कार्यवाही केल्या जात नव्हती याच अवैध वाळू उपस्याचा एक बळी मागील आठवड्यात खडका येथे गेला होता.मात्र खडका येथील वाळूउपस्यात काळे हात असणाऱ्या दलालांनी हा खून दडवत गंगाखेड पोलीस स्थानकात बैलगाडीखाली जाऊन संबधीत युवक मयत झाल्याची फिर्याद दाखल करत प्रकरण दाखवले होते.मात्र जिल्हाधिकार्यांनी या ठिकाणी ड्रोन कँमेऱ्याद्वारे याची पहाणी केली असता खडका येथून सुमारे दोन हजार ब्रास वाळू चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले होते.तेव्हापासून खडका हे गांव जिल्हाधिकाऱ्यांच्या अजेंड्यावर होते.मात्र याठिकाणी वाळू उपसा करणाऱ्या लोकांसोबत सोनपेठच्या तहसिल प्रशासनाचे संगणमत असल्याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती.या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांनी दि.५मे रोजी खडका येथे गोदावरीची अचानक पहाणी केली असता या ठिकाणी विनानंबरचे चार ट्रक्टर रेती भरुन जात असल्याचे आढळून आल्याने त्यांनी सदर ट्रक्टरकडे धाव घेतली असता.ट्रक्टर पळवत असल्याचे त्यांनी ट्रक्टरचालकांना ट्रक्टर थांबवण्याचा इशारा केला असता मोटारसायकलवरुन लोकेशन देणारा सभापतीपुत्र वैभव यादव यानी मोटारसायकलवरुन ट्रक्टर पळवण्याचा इशारा केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाने या सभापतीपुत्रास चंगालाच चोप दिला आहे.यात मध्यस्थीची भूमिका पार पाडणारे सभापतींचे दिर यांनाही पोलिसांनी चांगलेच चोपल्याचे यावेळी प्रत्यक्षदर्शींनी कळवले.सोनपेठ तालुक्याच्या महसुल प्रशासनाच्या अशा कारणांमुळेच प्रशासनाचा माफियांना धाक राहीला नसल्याचे दिसून येत आहे.यावरून चार ट्रक्टरचालक व लोकेशन देणारा वैभव यादवविरुद्ध सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रकीर्या उशीरा प्रयंत सुरु होती.

तेल्हारा पोलिसांनी राबविले रस्ता सुरक्षा अभियान


विशाल नांदोकार
तेल्हारा : रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी विविध प्रकारे मार्गदर्शनात्मक उपक्रमे तेल्हारा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होत आहेत.सुरक्षा सप्ताह सुरू असताना तरी वाहतुकीला शिस्त लागेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे; दुचाकी,चारचाकी वाहने सुरक्षेच्या नियमांचे पालन करूनचालवणे, धावत्या दुचाकीवर मोबाइलवर बोलणाऱ्याची संख्या कमी करणे. तसेच शालेय विद्यार्थी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमधील विद्यार्थ्यांच्याकोंबाकोंबीवर नियंत्रण ठेवणे. शाळा-महाविद्यालय परिसरात विद्यार्थी बेफिकिरीने दुचाकी चालवत आहेत.त्यांना वाहतूक नियमांचे पालन करणे, इत्यादी प्रकारे तेल्हारा पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना मार्गदर्शन केले आहे.
आज दि.०५ मे रोजी स्थानिक शेगाव नाका येथे तेल्हारा पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील दुचाकी, चारचाकी, मालवाहू, ट्रक, इत्यादी प्रकारच्या वाहनांना थांबवून रीप्लेक्टर लावून नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्व समजावून सांगितले. यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे पी.एस.आय केडसे, वाहतूक निरीक्षक प्रकाश जाधव, राजेश पिंजरकर, अरुण हिवराळे, विजय खेकडे, करणसिंग ठाकूर, नागोराव भांगे हे हजर होते.

वाढदिवसानिमित्त हनुमान गुट्टे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-  परळी तालुक्यातील मौजे नंदनज येथील माजी सरपंच हनुमान गुट्टे यांचा वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
       यावेळी वाढदिवसा निमित्त सत्कार करतांना वैद्यनाथ काँलजचे लेखापाल नवनाथ घुले, संपदा टी.डेपोचे संचालक अंकित वेरूळे, परमेश्वर गुट्टे, पत्रकार महादेव गित्ते, ऋत्विक घुले, कृष्णा साळुंखे आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.  हनुमान गुट्टे यांच्या त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करुन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गुट्टे यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्‌सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता. दरम्यान शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे गुट्टे मुंडे यांनी आभार मानले.असुन या शुभेच्छांच्या बळावर आपण कटीबध्द राहुन आणखी उमेदिने सामाजिक कार्य करु असे त्यांनी म्हटले आहे.

लग्नात पर्यावरण संवर्धनाचा संदेश


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
विटा : पाथरी तालुक्यातील विटा गावचे रहिवाशी कारभारी दळवे यांनी त्यांच्या भाचीच्या विवाहामध्ये वधु वर्षा व वर मुंजाभाऊ राऊत यांच्या हस्ते  पाच  वृक्षांचे दान करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.सदरील वृक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास परभणी या संस्थेने स्वीकारले.
विटा या गावातील रहिवाशी असलेले वृक्षमित्र व नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्थेचे जिल्हा सचिव माऊली आदत, व पाथरी तालुका अध्यक्ष दत्तात्रय मोरे, यांनी पर्यावरण चळवळ रूजवली असून विवाहात दान करण्यात आलेले पाच वृक्ष स्वीकारले सदरील संस्थेने भेट घेतलेले असून या वृक्षांचा काळजीपूर्वक सांभाळ करणाऱ्या व्यक्तीला देत असतात. हा एक अनोखा उपक्रम ते मागील अनेक दिवसापासून चालवत आहे. सर्वांनी झाडे लावून पर्यावरणाचे संरक्षण करावे व शुभ प्रसंगी वृक्षदान करावे असे अवाहन महेश जाधव, माऊली आदत,व दत्तात्रय मोरे, यांच्या वतीने करण्यात आले आहे.

वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मानसाचे जिवन सुखकर - आ.जयदत्त क्षीरसागर


अनिल घोरड तेजन्युज हेडलाईन जिल्हा प्रतिनिधी
बीड दि. 05 (प्रतिनिधी)ः- गेल्या काही वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले आहेत. अधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने योग्य निदान करणे सोपे होवून तातडीची उपचार पध्दती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाचे जिवन सुखकर होवू लागले असल्याचे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

शहरातील आदर्श नगर भागात पुण्याई डामग्नोस्टीक सेंटरचा शुभारंभ आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ह.भ.प. हरिहर महाराज मोरेश्‍वर संस्थान, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात, डॉ.आय.व्ही.शिंदे, डॉ.दिलीप खरवडकर, डॉ.संतोष शिंदे, बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, अरूण डाके, डॉ.अनील बारकुल, न.से.विनोद मुळूक, महादेव रकटे, डॉ.राठोड, राजेश मचाले, गुंडीबा नवले, शरद नवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संचालक डॉ.स्वप्नील राऊत व डॉ.रूपाली राऊत, मुरलीधर राऊत व जयश्री राऊत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आ.क्षीरसागरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व फीत कापून सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलतांना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की पुर्व पुण्याई मुळेच समाजउपयोगी कार्य करण्याचे भाग्य लाभत असते. आजच्या काळात वैद्यकीय व्यवसायाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. निदान आणि उपचार चांगले मिळावेत अशी रूग्णांची भावना असते त्यामुळे अधुनिक पध्दतीच्या माध्यमातून योग्य उपचार सहज करतायेवू  लागले आहेत. स्पर्धेच्या काळातही वाढत्या वैद्यकीय व्यवसायाची गरज निर्माण झाली आहे. खाजगी क्षेत्राबरोबर जिल्हा रूग्णालयातही अशा सेवा उपलब्ध व्हाव्यात गरज लक्षात घेवून बीडचे रूग्णांलयाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत लवकरच सुसज्ज असे रूग्णालय बीडकरांच्या सेवेत उभारले जाईल. शहरात शासकीय सेवेेबरोबरच खाजगी रूग्णालयातून मदत घेता येईल. रोग दूर होवून माणूस बरा व्हावा हा एकमेव उद्देश असतो.अधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता यंत्रमानवाच्या माध्यमातून देखील शस्त्रक्रीया होवू लागल्या आहेत. यंत्रमानवाकडून रोबोटच्या सहाय्याने अचूक शस्त्रक्रीया पध्दती उपलब्ध होवू लागली आहे ुत्यामुळे रूग्णांची गरज आणि परिस्थिती ओळखून सेवा दिल्यास त्याचा नक्कीच फ ायदा होईल असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी डॉ.अशोक थोरात, डॉ.शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.स्वप्नील राऊत यांनी तर मुरलीधर राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

शैक्षणिक कामाबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा आष्टी जि.बीड चा ध्येयवेडा राज्य पुरस्कार प्राप्त दिव्यांग शिक्षक राजेंद्र लाड

बाळासाहेब राऊत
मुंबई : दि ०४ पाणी फाऊंडेशन सत्यमेव जयते वाँटर कप स्पर्धेत आष्टी तालुक्यातील अनेक गावे सहभागी झाली असून पाणी फाऊंडेशनच्या या प्रयत्नांना दिव्यांग बांधवांची साथ मिळावी,सामाजिक कार्यात दिव्यांगांचाही सहभाग असावा म्हणून आष्टी तालुक्यातील एक आवलिया दिव्यांग शिक्षक राजेंद्र लाड हे स्वःताच्या दुचाकीवर पाण्याच्या संदर्भात वेगवेगळे घोषवाक्य लिहून गाडीवर या गावातून त्या गावात प्रसार व प्रचार करण्याचे काम करत असून स्वतः दिव्यांग असतांना देखील दिव्यांगत्वावर मात करुन श्रमदान करण्याचे काम अनेक गावात जावून स्वखुशीने व आनंदाने करताहेत.ते सध्या दिव्यांग कर्मचारी संघटना बीड चे जिल्हा सचिव म्हणून काम पहात असून त्यांच्या या कामामुळे अनेक दिव्यांगांना प्रोत्साहन मिळत असून ते ही स्वःताच्या किंवा नजिकच्या गावात जावून श्रमदान करत आहेत.राजेंद्र लाड यांनी चला तर श्रमदान करु या..... या नावाने जलमित्र मोहिमेत भाग घेवून वाँटर कप स्पर्धेतील गावातील ग्रामस्थांना साथ मिळावी त्याचबरोबर दिव्यांग व ग्रामस्थ यांच्यातील नाते अतुट व्हावे,दिव्यांगांकडे श्रमदान करतांना पाहून तेथील ग्रामस्थामध्येही श्रमदान करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी या उद्दात हेतुने व पाण्याचे भविष्यातील महत्त्व लक्षात घेवून आष्टी तालुक्यातील अनेक गावात जावून प्रचार व प्रसार करुन स्वतः श्रमदान करताहेत.
     अशा एका शैक्षणिक,सामाजिक व दिव्यांग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिव्यांग शिक्षकाच्या कार्यास सलाम...

सेनगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विश्वनाथ देशमुख सेनगावकर

सेनगांव:- येथील एका अल्पवयीन १७ वर्षीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवुन तिच्यावर ठिकठिकाणी नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी सेनगाव पाेलीस ठाण्यात दि.०५ मे शनिवार राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेनगाव येथील बालाजी अनिल गाढवे याने सेनगावातीलच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवुन पळवुन नेले व दि.१ मे २०१८ ते दि.०४ मे २०१८ पर्यंत लक्ष्मीनगर सेनगाव,वाशिम बसस्टँन्ड,अकाेला रेल्वे स्टेशन, भुसावळ रेल्वे स्टेशन,औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे जबरीने संभाेग केला तसेच इतर दाेन आराेपींनी फिर्यादीच्या आई,वडीलांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादी अत्याचार झालेल्या अल्पवयीन १७ वर्षीय मुलीच्या फिर्यादीवरुन अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार बालकांचे लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी कलम ३७६,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी हिंगाेली ग्रामिण चे उपविभागीय पाेलीस अधिक्षक श्री भाेरे साहेब यांनी भेट दिली व सविस्तर माहीती घेतली.पुढील तपास उपविभागीय पाेलीस अधिक्षक श्री भाेरे हे करीत आहेत.