तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 12 May 2018

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष घोषीत करन्याची मागणी

फुलचंद भगत

वाशिम-गेल्या दोन वर्षापासुन विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा महाराष्ट सरकारने केली अाहे पण अद्यापपर्यत या स्मारक समितिच्या अध्यक्षाची घोषणा केलेली नाही तरी त्वरीत बाबासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षाची घोषणा महाराष्ट सरकारने करावी अशी मागणी विदर्भवादी नेते दत्तराव धांडे यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांचेकडे केली आहे.

महाराष्ट हा महापुरुषांच्या वारसाचे केद्रबिंदु आहे त्यामुळे महापुरुषांची विचारधारा अविरत तेवत राहावी आणी महाराष्टातील जनतेला प्रेरणा मिळावी या अनुषंगाने महाराष्टामध्ये छञपती शिवाजी महाराज आणी लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या स्मारकांची घोषणा केली आणी या स्मारक समितीचे अध्यक्षही सरकारने घोषीत केले.याचप्रमाणे विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा दोन वर्षापुर्वीच देवेंद्र फडणविस सरकारने केली परंतु अद्यापपर्यत या स्मारक समीतीच्या अध्यक्षाची घोषणा करुन निवड केलेली नाही हे आंबेडकरी जनतेला न ऊलगडणारे कोडे आहे त्यामुळे सरकारने त्वरीत बाबासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षाची घोषणा करावी अशी मागणी विदर्भवादी नेते दत्तरावजी धांडे यांनी राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांचेकडे केली आहे.

फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.9763007835

आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे चांगल्या मताने निवडून येतील - श्री दिलीपराव देशमुख

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
काँग्रेसचे सर्व मतदार जगदाळे यांनाच मतदान करतील , एकही मतदान इकडे तिकडे जाणार नाही

हम साथ साथ है - आ. अमित देशमुख

लातूर दि 12 ---- _बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून पुन्हा मीच निवडणूक लढवावी असा दोन्ही पक्षाचा आग्रह केला होता,  मात्र माझी यावेळी इच्छा नव्हती . 18 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला सहकार्य केले त्याची परतफेड करण्यास यावेळी काँग्रेस उत्सुक आहे त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील काँग्रेसचे एकही मतदान आघाडीच्या उमेदवाराशिवाय इतरांना जाणार नाही आणि अशोक जगदाळे चांगल्या मतांनी विजयी होतील असा विश्वास माजी मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्या प्रचारार्थ लातूरच्या हॉटेल ग्रँड येथे आयोजित मतदारांच्या बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत व मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , आमदार अमित भैया  देशमुख, आमदार राणा जगजीतसिंग पाटील,आमदार त्रिंबक भिसे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैया देशमुख, आमदार त्रिंबक भिसे, आमदार विक्रम काळे, शैलेश पाटील चाकूरकर, व्यंकटराव बेदरे, बसवराज पाटील नागराळकर, पप्पू कुलकर्णी, मकरंद सावे, संजय बनसोडे आदी उपस्थित होते.

या निवडणुकीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ पाहता आमचा विजय निश्चित असल्याचा दावा यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
सेनाही यावेळी भाजपा सोबत नाही त्याचाही लाभ होईल असे सांगतानाच मागील  18 वर्ष श्री दिलीपराव देशमुख साहेब  यांनी या मतदारसंघात सक्षम पणे काम केले असा गौरव केला. राज्यातील विधान परिषदेच्या आणि पोटनिवडणुका राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणा-या ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेनंतर दोन्ही काँग्रेसच्या मतदारांना उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन केले.

हम साथ साथ है- आमदार अमित देशमुख?

या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असल्याचा दाखला देत हम साथ साथ है चा नारा आमदार अमित देशमुख यांनी दिला. बीड , उस्मानाबाद पेक्षा लातूर मधून जास्त आघाडी देऊ असा विश्वास त्यांनी दिला, धनंजय मुंडे हे मराठवाड्याचे नेते आहेत त्यांच्याकडे महाराष्ट्र आशेने पहात आहे असे गौरोदगार त्यांनी काढले.

धनंजय मुंडे यांनी काढली स्व. विलासराव देशमुख साहेब यांची आठवण

या बैठकीत बोलतांना धनंजय मुंडे यांनी स्व. विलासराव देशमुख साहेब यांची आठवण काढतांना सहा वर्षांपूर्वी बीडच्या अशाच मेळाव्यातील प्रसंग सांगताना अमित भैया मध्ये स्व. विलासराव देशमुख साहेब दिसतात असे सांगितले.

दिलीपराव देशमुख यांची ही इंनिग संपली नाही तर नवी इंनिग सुरू होत असल्याचे ते म्हणाले.

मादळमोहीत मंगल कार्यालयाची भिंत कोसळली; 2 ठार; 2 जखमी

सुभाष मुळे...
--------------
गेवराई, दि. १२ __ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मंगल कार्यालयाची भिंत पडून लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडातील बाप व लेकीचा जागीच मृत्यु झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
     गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मुरलीधर रोमण यांच्या मुलीचा शनिवारी राञी मादळमोही येथील युवराज मंगल कार्यालयात विवाह होता. या विवाहासाठी वऱ्हाडी मंडळी आली होती. दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यामध्ये युवराज मंगल कार्यालयाची भिंत कोसळली. भिंती खाले दबून सुखदेव लिंबाजी चव्हाण (वय ६५ रा. चव्हाणवाडी ता. बीड ) व कालिंदा नारायण गायकवाड ( रा. ढाकलगाव ता. अंबड ) या बाप व मुलीचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
     भिंत कोसळल्याने युवराज मंगल कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

रामनारायण जी तोषनीवाल इनका देहांत येलदरी ग्राम में होगा अंत्यविधी


जिंतुर:-महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा के संगठन मंत्री श्री ब्रिजगोपाल तोषनीवाल एवं श्री गोविदंप्रसाद तोषनीवाल इनके पिताजी श्री रामनारायनजी तोषनीवाल आज शाम 6-40 (छे बजकर चालीस मिनिट) को श्रीजीचरण हुवे,जिनका अंतिम संस्कार कल दिनांक 13 मई को सुबह 9-00 (नव)बजे एलदरी कैम्प (स्मशान भूमि) तालुका जिंतुर जिला परभणी यंहा पर होगा।सुबह 8-00बजे तक उनका मृत देह जिंतुर  निजी निवास यंहा पर रहेगा ,उस के बाद स्वर्गरथ से एलदरी कैम्प ले जाए जाएगा ।  वंहा श्री गजानन महाराज मंदिर के पास मृतदेह अन्त्यदर्शन के लिए रखा जाएगा ,तत्पश्चात 9-00 बजे एलदरी कैम्प स्मशान भूमि में अंत्यविधि क्रिया संम्पन्न होगी।

बोंडअळी च्या नुकसान भरपाईचे श्रेय कसले घेता ; एका टप्यात मदत द्या-मुंडे

नवनवीन निकष लावून शेतक-यांची थट्टा काय करता - धनंजय मुंडे यांचा सवाल

37 हजार 500 रु जाहीर केले होते त्याचे काय झाले ?

बीड दि 12 ----- गुलाबी बोंड अळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना तुटपुंजी मदत जाहीर करून सरकारने आधीच शेतक-यांची चेष्टा केली आहे. आता ही मदत आमच्यामुळेच मिळाली असे दाखवून त्याचे श्रेय घेऊन बेगडी प्रेम दाखवण्याची मंत्र्यामध्ये स्पर्धा लागली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची खरोखरच भावना असेल तर मदतीचे नवनवीन निकष लावून शेतकऱ्यांची थट्टा करण्यापेक्षा एकाच टप्प्यात पूर्ण मदत द्या अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

         मागील वर्षी आलेल्या बोंड अळीच्या संकटामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी संपूर्णपणे उध्वस्त झाला आहे या शेतकऱ्यांना एकरी 50000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांनी व आम्ही विरोधी पक्षांनी सतत मागणी केल्यानंतर , त्यासाठी संघर्ष केल्यानंतर सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली.

ही मदत जाहीर करण्यात आली करण्यासही सहा महिने विलंब केला आणि मदत जाहीर केल्यानंतर ती अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही मदतीबाबत नवनवीन निकष लावून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे . आता जाहीर केलेल्या मदतीमध्ये तीन टप्प्यांमध्ये हिमदत देण्यात येणार  असून पहिल्या टप्प्याचे पूर्ण वितरण झाल्यानंतर दुसरा टप्पा आणि त्यानंतर तिसरा टप्पा याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.  या प्रक्रियेस किती वेळ लागेल हे सांगता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे असे असताना जाहीर झालेली मदत आपल्यामुळेच मिळाली असा आव आणीत जिल्ह्यातील काही मंत्र्यांनी त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. 

 श्रेय घेण्याच्या या मंत्र्यांच्या भूमिकेवर आणि सरकारच्या मदतीबाबतच्या  निकषांबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तीव्र टीका केली आहे . सरकारचे मदतीचे हे नवीन निकष म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे मदत द्यायची असेल तर ती जाहीर करून शेतकरी प्रेमाचे खोटे प्रदर्शन करण्यापेक्षा एकाच टप्प्यात मदत द्या अशी मागणी त्यांनी केली आहे

बीड जिल्ह्याला बोंड अळीचा नुकसानभरपाईसाठी 256 कोटी रुपये मंजूर झाली असताना प्रत्यक्षात केवळ 85 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत उर्वरित निधी केव्हा मिळणार असा सवालही त्यांनी केला आहे . जिल्ह्याला मिळालेल्या मदतीचे श्रेय घेणाऱ्यांना स्वतःच्या परळी विधानसभा मतदारसंघातील परळी अंबाजोगाई तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत का मिळू  शकली नाही असा सवालही त्यांनी केला आहे. 

फसवे पॅकेज ; 37 हजार 500 रु कुठे आहेत - धनंजय मुंडे

सरकारने बोंडअळीग्रस्त शेतक-यांना 37 हजार 500 रुपयाचे पॅकेज जाहीर केले होते.  प्रत्यक्षात विमा कंपन्यांनी  अद्याप मदत दिलेली नाही,  पिक विमा कंपन्यांनी न्यायालयात जाऊन मदत देणार नाही अशी भूमिका घेतली आहे NDRF च्या  निकषानुसार शेतकऱ्यांना केवळ 2000 रुपये ही मदत मिळणार आहे .  जाहीर केलेले 37 हजार 500 रुपयांचे पॅकेज कुठे आहे असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे . असे पॅकेज जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे ही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

बोगस बी. टी. बियाणे उत्पादक कंपनी विरोधात का कारवाई केली नाही ? शेतकऱ्यांना फसविणाऱ्यांची शासन का पाठराखण करत आहेत ? यामागचे गौडबंगाल काय आहे, हे सुद्धा जनतेला कळले पाहिजे....

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे त्याचे श्रेय  कसले घेता असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.


Friday, 11 May 2018

स्वाभिमानीच्या उसतोड मजूर जिल्हाध्यक्ष पदी गोविंद राठोड

प्रतिनिधी

पाथरी:-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परभणी उसतोड मजूर  जिल्हाध्यक्ष पदी तालुक्यातील टाकळगव्हाण येथील बाबासाहेब गोविंद शिंदे यांची निवड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा राजू शेट्टी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन या संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन पाटील बंगाळे यांनी केली आहे.
यात म्हटले आहे की, खा राजू शेट्टी यांच्या आदेशान्वये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मजुर जिल्हाध्यक्ष पदी आपली निवड करण्यात आली असूून आपण उसतोड कामगारांच्या न्याय हक्का साठी सातत्याने जागृत राहून लढा द्यावा आणि दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी .या निवडीचे पत्र गंगाखेड येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमा वेळी खा राजू शेट्टी यांच्या हस्ते बाबासाहेब शिंदे यांना देण्यात आले.या निवडी बद्दल खा राजू शेट्टी, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन पाटील बंगाळे, स्वाभिमानीचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.

ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे बीड जिल्हयाला बोंडअळी नुकसानीचे २५६ कोटी मंजूर

पहिला हप्ता ८५ कोटीचा ; पैकी ६८ कोटी रुपये कापूस उत्पादकांच्या खात्यात जमा

बीड दि. १२ ------ शेतक-यांना संकट काळात नेहमीच धावून जाणा-या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी याही वेळी शेतक-यांना दिलासा दिला असून त्यांच्यामुळे जिल्हयातील कापूस उत्पादकांसाठी बोंडअळी नुकसानीचे २५६ कोटी ५८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यातील पहिला हप्ता ८५ कोटी ५२ लाख रुपये असून त्यापैकी ६८ कोटी ४२ लाख रुपये शेतक-यांच्या खात्यातही जमा झाले आहेत.

   सन २०१७ च्या खरीप हंगामात जिल्हयातील कापूस पिकांवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांवर आर्थिक संकट ओढवले होते.राज्यात सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात याचा फटका शेतक-यांना बसला होता, अशा परिस्थितीत त्यांना मदत करण्याची भूमिका ना. पंकजाताई मुंडे यांनी घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांनतर शासनाने कापूस उत्पादकांना मदत जाहीर केली. बीड जिल्हयातील ६ लाख ९२ हजार ३८ बाधित शेतक-यांना २५६ कोटी ५८ लाख ९३ हजार इतकी रक्कम त्यासाठी मंजूर झाली आहे. ही रक्कम शेतक-यांना समान तीन हप्त्यात वितरित करण्यात येणार आहे. यातील पहिला हप्ता ८५ कोटी ५२ लाख ९७ हजार ८९३ एवढा मंजूर झाला असून यापैकी ६८ कोटी ४२ लाख रुपये शेतक-यांच्या खात्यात जमा देखील करण्यात आले आहेत.

परळीला कमी पण जिल्हयातील
शेतक-यांचा विचार
--------------------------------
परळी तालुका व अंबाजोगाई तालुक्याचा काही भाग असा ना. पंकजाताई मुंडे यांचा मतदारसंघ आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत या दोन्ही तालुक्यातील कापूस उत्पादकांना कमी नुकसान भरपाई मिळाली असली तरी ना. पंकजाताई मुंडे यांनी मदत करताना संपूर्ण जिल्हयातील शेतक-यांचा विचार केला. त्यांचे झालेले नुकसान लक्षात घेवून एवढी मोठी रक्कम त्यांनी मंजूर करून घेतल्यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
--------------------
अतिवृष्टीचे पैसैही लवकरच
----------------------------------
जिल्हयाच्या ऑक्टोबर २०१६ मध्ये अतिवृष्टी व पुर परिस्थितीमुळे एक लाख ३२६ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले होते. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा करून जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाईचा अहवाल ना. पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेवरून शासनाकडे पाठवला होता. यातील नुकसान भरपाईचे ६८ कोटी १५ लाख रुपये लवकरच शेतक-यांना मंजूर होणार असून ना. पंकजाताई मुंडे यांचा त्यादृष्टीने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
----------------
  बोंडअळी नुकसानीची मंजूर झालेली तालुकानिहाय रक्कम पुढीलप्रमाणे..कंसातील आकडे बीम्स प्रणालीद्वारे प्रत्यक्ष जमा झालेल्या रकमेचे आहेत. बीड - ५२ कोटी ५९ लाख ९३ हजार (१४ कोटी २ लाख ), गेवराई- ५० कोटी १७ हजार (१३ कोटी ३३ लाख ), शिरूर- १९ कोटी ८४ लाख (५ कोटी २९ लाख ), आष्टी- १८ कोटी ७६ लाख (५ कोटी ), पाटोदा - १४ कोटी ८८ लाख (३कोटी ९६ लाख), माजलगाव- २५ कोटी १८ लाख (६ कोटी ७१ लाख ), धारूर - १६ कोटी ८ लाख (४ कोटी २८ लाख ), वडवणी- १५ कोटी २ लाख (४ कोटी ), केज- २६ कोटी ६१ लाख (७ कोटी ९ लाख ), अंबाजोगाई- ५ कोटी १७ लाख (१ कोटी ३७लाख ), परळी- १२ कोटी ४० लाख (३ कोटी ३० लाख )

विनामुल्य सामुहिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडल्याबद्दल 

परळी दि.११

महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी राज्यात सर्वधर्मिय विनामुल्य सामुहिक विवाह सोहळ्याची चळवळ सुरु केल्याने वधु-वरांच्या कुटुंबियांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली व विवाहाचा ताण वधु पित्यांना येणारा कमी झाला. त्याबद्दल आयुक्त शिवकुमार डिगे यांचा बीड जिल्हा धर्मादाय संस्था अंतर्गत सामुहिक विवाह समिती २०१८ च्या वतीने सन्मान पत्र  देऊन वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले

परळी येथे दि.०८ मे रोजी आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतुन दिमाखात ३८ सर्वधर्मिय विनामुल्य सामुहिक विवाह सोहळा लावण्यात आला. यामुळे ७६ कुटुंबातील वधु-वर पिता खुश झाले. कुटुंबांनिही या विवाह सोहळ्याचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच बीड येथे १२ मे रोजी ६१ वधुवरांचे शुभमंगल होणार आहे. परळी येथे झालेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात शिवकुमार डिगे यांचा सन्मान करण्यात आला.

 यावेळी मानपत्राचे वाचन प्रदिप खाडे यांनी केले. कार्यक्रमास सहाय्यक धर्मादाय आयुक्त काशीनाथ कामगौडा, धर्मादाय उपायुक्त के.आर.सुपाते, संजय पाईकराव,  बीड जिल्ह धर्मादाय संस्था अंतर्गत सामुहिक विवाह समिती २०१८ चे अध्यक्ष राजेश देशमुख, सचिव विजयराज बंब, उपाध्यक्ष बाबासाहेब मस्के, सहसचिव अंकुश काळदाते, कोषाध्यक्ष श्रीराम देशपांडे, ऍड.संतोष पवार, प्रा.संतुक देशमुख, प्रदिप खाडे, ऍड.जरीना देशमुख व इतर सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयात सामुहिक विवाह सोहळा होत आहे.बीड जिल्हयातील परळी येथे सामुहिक विवाह सोहळा चांगल्या पध्दतीने झाला.विविधतेत एकता या सर्व धर्मीय सामुहिक विवाह सोहळयास पाहावयास मिळत आहे.गरीबांना लग्नाची चिंता वाटू नये यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने सर्वधर्मीय विनामुल्य सामुहिक विवाह सोहळा सुरू केला आहे.

    शिवकुमार डिगे 

  धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई

 महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतुन महाराष्ट्रात सर्वधर्मिय विनामुल्य सामुहिक विवाहाची चळवळ सुरु झाली. यामुळे सामान्य शेतकरी, शेतमजुर, अदिवासी, अल्पसंख्याक समाजातील वधु वरांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली व होणारा खर्च टळल्या गेला. त्याबद्दल आयुक्त शिवकुमार डिगे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. राज्यात या सामुहिक विवाह सोहळ्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे....

      

..राजेश देशमुख 

सेक्रेटरी:- वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट, परळी वैजनाथ

महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी मंदिर व संस्थेच्या सहकार्याने सुरु केलेले. सामुहिक विवाह सोहळे हे प्रेदणादायी ठरणारे आहेत. विनामुल्य सामुहिक विवाह सोहळ्यात वधुवरांना विविध सामजिक कार्यकर्त्यांच्या वतीने मदत करण्यात येत आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. 

श्रीराम देशपांडे

विश्‍वस्त ः योगेश्‍वरी देवस्थान कमेटी,अंबाजोगाई 

नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर....शहादा तालुख्यातील घटना


अवश्य वाचा व आपल्या गावातही अंमलात आणा.

शेत नांगरावे लागते ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे , पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेसेच वाटते ना ? सतरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ,पण तिचे समकालीन मूल्य मात्र आजही तितकेच आहे.
शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव . गोमाई मध्यप्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
२००० ची गोष्ट आहे. डांबरखेडा परिसरात अचानक असे लक्षात आले की , परिसरातील बऱ्याच विहिरी , बोअरवेलना पाणी येत नव्हते. चारसहा महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहीरी , बोअर मृत . पाचशे ते सातशेफुटापर्यंत जलस्तर खोल गेला . लोक बोअरची खोली तेवढी वाढवत होते. पण पाणी वरती येत नव्हते .असे का ? शेतकरी हैराण. कुणाकडे नीट उत्तर नव्हते.
मोतीलाल पाटील ( पटेल ) तात्या. नांदरखेडा त्यांचे गाव. शहाद्याला त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते . त्यामुळे डांबरखेड्याची पाणी समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली होती. तात्या पुणे विद्यापीठाचे १९७० चे एम एस्सी ऍग्री . डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक होती. गावात नदी असून विहरी , बोअर कोरड्या होत्या. सर्वचजण विचारात पडले होते , पण उत्तर सर्वांकडे नव्हते.
तात्यांनी एकेदिवशी डांबरखेड गावाच्या सरपंचांना मनातल्या चार गोष्टी सांगितल्या . खूप दिवसानंतरच्या आपल्या चिंतनाचा परिपाक लोकांपुढे ठेवला. समस्येचा मुळापर्यंत जाऊनच उत्तर सापडतात. आणि ती चिरस्थायी असतात. *जलस्तर खोल गेला या समस्येवर तात्यांनी सांगितलेला उपाय अगदीच वेगळा होता. काहीसा वेडेपणाचा , पण त्यामागे अभ्यास , संशोधन आणि चिंतन होते. लोकांनी तात्यांचे ऐकले आणि पाचशे ते सातशे फुटावर गेलेला जलस्तर चक्क नव्वद फुटावर आला.
डांबरखेडच्या लोकांसाठी तात्यांनी स्वतः डिझल पुरवले , ट्रॅक्टर , लाकडी नांगर , लोखंडी नांगर अशा साधनांनी गोमाई नदी उन्हाळ्यात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले. चार किमी. नदी आडवी नांगरायचा हा अजब प्रयोग काहीसा चेष्ठेचा विषय झाला.गावकऱ्यांनी फक्त फक्त एक किलोमीटर इतकीच नदी नांगरली. जून कोरडा गेला , जुलैत पहिला पाऊसपूर आला . मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही. नांगरलेल्या नदीने रात्रीच सर्व पूरपाणी पिऊन टाकले . अवघ्या चोवीस तासात पाचशे फुटावरचे पाणी नव्वद फुटावर आले.लोक आनंदले.सकाळी परिसरातील मोटारींनी फोर्सने पाणी फेकले.
तत्कालीन जिल्हाधिकारी असीमकुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांना " वॉटर मॅन ऑफ शहादा " असे संबोधून तात्यांचे तोंडभरून कौतुक केले होते .महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळ्या प्रयोगाची पाहणी करून कौतुक केले.
नदी नांगरण्याची ही अभिनव कल्पना कशी सुचली ? या विषयी सांगताना तात्या बोलले , " दरवर्षी येणाऱ्या गढूळ पूरपाण्यातले 'फाईन पार्टीकल' वाळूत साचून साचून दोन-तीन फुटावर हे पार्टीकल सेटल होतात , थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत जाते. अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून जाते. माझ्या अनेक वर्षांच्या अभ्यास आणि चिंतनातून मला समस्येचे हे कारण लक्षात आले. "
खेतीया या मध्यप्रदेशातील शहारापर्यंतच्या अनेक गावातील लोकांनी नंतर सातत्याने गोमाई नदी नांगरली आहे , आणि वाहून जाणारे पाणी आपल्याच गावात जिरवले आहे. हे तात्यांच्या कल्पक प्रयोगाचे फलित आहे. निराश न होता , आत्महत्येचा पर्याय न अवलंबता शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर जिवंत करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतल्यास उत्तर नक्की सापडेल. मोतीलाल तात्या पटेल या वेड्या माणसासारखा परिपक्व विचार शेतकऱ्याने करावा बस.

पालम तहसील कार्यालयातील दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई-श्रीरंग कदम


अरुणा शर्मा

पालम :- तहसील कार्यालयात दिनांक 11 में रोजी तहसीलदारासह चार कर्मचारी वगळता दहा कर्मचारी गैरहजर असल्यामुळे तहसील कार्यालयात बहुतांशी टेबलवर कर्मचारी नसल्यामुळे उन्हातानात पालम तालुक्यातुन अनेक नागरीकांना व शेतकरयांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. त्यामुळे येथील नागरिकांनी नायब तहसीलदार यांची भेट घेऊन दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिनांक 11 में रोजी  बारा वाजण्याच्या सुमारास नायब तहसीलदारासह चारच कर्मचारी उपस्थित असल्यामुळे तहसील कार्यालयातील अनेक  टेबल रिकामे होते. जवळपास दहा कर्मचारी नसल्यामुळे नागरिक  सैरावैरा पळत होते. उन्हातानात आलेल्या नागरिकांना आपापले काम न करताच परत जावे लागले होते. त्यांनी नायब तहशिलदार श्रीरंग कदम यांची भेट घेऊन दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी चे निवेदन नायब तहसीलदार श्रीरंग कदम यांना दिले. या निवेदनावर   गजानन सिरसकर, सुग्रीव पौळ, गणेश कदम, श्रीकांत पळसकर, रोहिदास ठाकरे, उत्तम शेंगोळे, गंगाधर शिंदे आदिंच्या स्वाक्षरया आहेत.सदरील तक्रारीची दखल घेत गैरहजर राहणार्या कर्मचार्यावर कारवाई करन्याचे आश्वासन नायब तहसीलदार श्रीरंग कदम यांनी दिले.