तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 19 May 2018

जीएसटी ३बी विवरण पत्र भरण्याची मुदतवाढ २२ मे २०१८ पर्यंत


नवी दिल्ली:  जीएसटी’ लागू झाल्यानंतर त्याचे स्वागत करण्यात आले. विविध प्रकारचे कर रद्द करून एकाच करप्रणालीखाली करदात्याला आणल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र, त्याबाबतची ऑनलाइन यंत्रणा सक्षम नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.
ऑनलाइन पद्धतीने विवरणपत्रे भरताना अनेकदा संकेतस्थळात त्रुटी निर्माण होतात. त्यामुळे मुदतीत विवरणपत्रे भरली जात नाहीत. त्यात व्यावसायिकाचा कोणताही दोष नसताना दंड भरावा लागतो.
ऑनलाइन विवरण पत्र भरण्याच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे व्यावसायिकांसह कर सल्लागार मेटाकुटीला आले असतानाच ऑनलाइन यंत्रणेतील त्रुटींमुळे विवरणपत्रे भरण्यास उशीर झाल्यास त्याचा दंड व्यावसायिकांच्या माथी मारला जात आहे.
जीएसटी ३बी विवरण पत्र भरण्यासाठी दोन दिवस मुदतवाढ झाल्यामुळे कर दात्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .विवरणपत्र भरण्याची आंतिम तारीख २० मे  रविवारी येत असल्यामुळे आणि शनिवारी सुट्टी येत असल्यामुळे आजच विवरणपत्र भरण्यास झुबंड ऊठली होती .परंतु सकाळी पासून संकेतस्थळ हेवी लोड असल्यामुळे जीएसटी विवरणपत्र भरण्यास असमर्थ होते .तसेच एका प्रायवेट लिमिटेडचे  असिस्टंट जेनरल  मेनेजर फाइनान्स जगदीश जैस्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार संकेतस्थळात त्रुटी निर्माण होतात असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो .असे मत प्रगट केले .
परंतु संध्याकाळी चारच्या सुमारास जी .एस .टी .काउन्सिल ने प्रसिध्दी निवेदनाद्वारे जीएसटी ३ बी विवरणपत्र आणखी दोन दिवस पुढे ढकलन्यात आले आहे अशी महिती दिली आहे तसेच सनदी लेखापाल सचिन ईश्वर सातपुते यांनी देखील आम्हाला महिती दिली म्हणजे आता जीएसटी ३ बी विवरणपत्र २२ मे २०१८ पर्यंत भरले जातील .

कुमारस्वामी सोमवार ऐवजी बुधवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ.


कर्नाटकात येत्या सोमवारी नवीन सरकार अस्तित्वात येणार होते. पण आता शपथविधीचा दिवस बदलण्यात आला आहे. कुमारस्वामी आता सोमवार ऐवजी बुधवारी २३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय सचिव दानिश अली यांनी ही माहिती दिली.राज्यपाल वजुभाई वाला यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. स्वत: कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली. राज्यपालांनी मला शपथविधीसाठी निमंत्रित केले असून सोमवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान शपथविधीचा कार्यक्रम होईल असे कुमारस्वामी यांनीआधी सांगितले होते. बीएस येडियुरप्पा औट घटकेचे मुख्यमंत्री ठरल्यानंतर आता कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणचे मुख्यमंत्री के.सी.राव यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या असे कुमारस्वामी यांनी सांगितले. मी सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना शपथविधी सोहळयाचे निमंत्रण दिले आहे असे त्यांनी सांगितले. कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण सरकार स्थापनेसाठी राज्यपालांच्या निमंत्रणाची वाट पाहत आहोत असे कुमारस्वामी यांनी म्हटले होते.

भाजपाच्या आंदोलनाला यश जि.प.सदस्य गणेशराव रोकडे (दादा) यांच्या प्रयत्नांना मुळे पालम, चाटोरी, बनवस मंडळाला मिळाला विमा


अरुणा शर्मा

पालम :- तालुक्यातील मागील वर्षी खरिपाच्या पिकांचे पाऊसा आभावी मुग, ज्वारी, सोयाबिन, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हल्लाकाची झाली होती. आशामध्ये शेतकऱ्यांना रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे खरिपाच्या पिकाचा विमा बँकेमार्फत भरणा करण्यात आला होता. पाण्या आभावी नष्ट झालेल्या पिकाचा विमा कंपनीने न दिल्यामुळे शेतकऱ्यांत आक्रोश दिवसान दिवस वाढत आसल्याने भाजपाचे प्रदेश कार्यकारर्णी सदस्य तथा मा.सभापती गणेशराव रोकडे (दादा) यांनी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात मा. मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री यांची प्रत्येक्षा भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या यांच्या पुढे मांडुन व स्थानिक पातळीवर कंपनीच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे पालम, चाटोरी, बनवस, या तिन्ही मंडळा खरिपाच्या सोयाबिन, मुग, ज्वारी, विमा मंजुरी मिळविण्यात यश आले आहे. यामध्ये पालम मंडळाला मुग, 6458 शेतकऱ्यांना 8.062822 ज्वारी, 3116 शेतकऱ्यांना 882,882 तर सोयाबिन 8602 शेतकऱ्यांना 45,007,707 तर चाटोरी मंडळाला मुग, 4914 शेतकऱ्यांना 7,478,899 ज्वारी, 2475 शेतकऱ्यांना 922,699  तर सोयाबिन 7244 शेतकऱ्यांनी 41,640,290 प्राप्त झाले आहेत. तर बनवस मंडळाला सोयाबिन पिकाला नुकसान भरपाई म्हणून 91 कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. तर मुग, ज्वारी याही पिकाना विमा मिळविण्यात यश आल्याने शेतकऱ्यात आनंद होत आहे.

ज्योतिषांना विचारून कुमारस्वामींनी ठरवला शपथविधीचा मुहूर्त.


कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीत नापास होण्याच्या भीतीने मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी शनिवारी (19 मे) परीक्षे आधीच माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस-जेडीएस युतीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एचडी कुमारस्वामींचा मार्ग मोकळा झाला असून त्यांनी लगेचच ज्योतिषांच्या सल्ल्याने शपथविधीचा मुहूर्त ठरवला आहे. सोमवारी (21 मे)दुपारी १२.३० वाजता ते शपथ घेणार असल्याचं कळतं. कर्नाटकात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बराच आटापिटा करूनही भाजपाला ते जमलं नाही. १५ दिवसांत १०४ वरून ११२ जागांवर जाण्याचं गणित त्यांनी मांडलं होतं. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने एका दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आणि इथेच भाजपाची कोंडी झाली.सकाळी 'शत-प्रतिशत' बहुमत सिद्ध करण्याची भाषा करणारे येडियुरप्पा दुपारी अचानक भावुक झाले आणि त्यांनी बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस-जेडीएससाठी हा मोठाच विजय ठरला असून ते सत्तास्थापनेसाठी सज्ज झाले आहेत. काँग्रेस-जेडीएस नेते आता राज्यपाल वजुभाई वाला यांच्या आमंत्रणाची वाट पाहताहेत. जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी परवाच त्यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला होता. येडियुरप्पा 'विश्वास' जिंकण्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी आता शपथविधीची तयारीही सुरू केली आहे. ज्योतिषांशी बोलून त्यांनी सोमवारचा, १२.३० वाजताचा मुहूर्त ठरवला आहे. या सोहळ्यासाठी त्यांनी भाजपाविरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याचं समजतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी, राहुल गांधींचा हल्लाबोल.


बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कर्नाटक विधानसभे बाहेर काँग्रेस व जेडीएसनं जल्लोष साजरा केला. ''आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे'', असं म्हणत येडियुरप्पा यांनी विधानसभेत आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले आहेत. कर्नाटकमध्ये येडियुरप्पा सरकार पडल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीयांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला.''देशाच्या जनतेनं पाहिलं की कर्नाटक विधानसभेमध्ये राष्ट्रगीता आधीच भाजपा आमदार आणि हंगामी अध्यक्षांनी सभागृह सोडलं. देशाच्या कोणत्याही संस्थेचा आदर करायचा नाही, हाच त्यांचा स्वभाव आहे. लोकशाहीला विकत घेतलं जाऊ शकत नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हत्येचे आरोपी अमित शाह यांना कर्नाटकच्या जनतेनं दाखवून दिल्याचा मला अभिमान आहे'', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपावर हल्ला केला आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा अन्य घटनात्मक संस्थांचा भाजपा आदर करत नाही, असा आरोप देखील यावेळी राहुल गांधी यांनी केला.भ्रष्टाचारा विरोधात बोलणारे पंतप्रधान मोदीच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत.भाजपा, पंतप्रधान, अमित शाह यांनी काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशात पैसा आणि सत्ताच सर्व काही नसल्याचं जनतेनं दाखवून दिलं आहे. यावरुन भाजपा आणि आरएसएसनं धडा घेतला असेल, अशी अपेक्षा आहे. असेही राहुल गांधी यांनी म्हटले. 'पंतप्रधान देश, सुप्रीम कोर्ट, जनता आणि लोकशाहीपेक्षा मोठा नसतो. मोदींनी संस्थांचा सन्मान करावा', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.  शिवाय,"पंतप्रधानांचं मॉडेल लोकशाहीचं नाही तर हुकुमशाहीचं आहे. मात्र विरोधक एकत्र येऊन भाजपाला पराभूत करतील. आम्ही भाजपा आणि आरएसएसला रोखणार. काँग्रेस या देशाच्या संस्था आणि जनतेचं संरक्षण करेल," असा दावा देखील राहुल गांधी यांनी केला.

क्रिकेट सामन्यादरम्यान स्फोट; ८ जणांचा मृत्यू.


अफगाणिस्तानातील नांगरहर प्रांतात रमजानच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका क्रिकेट सामन्यादरम्यान अनेक स्फोट झाले आहेत. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४५ जण जखमी झाले आहेत.अद्याप या स्फोटांची जबाबदारी कोणी स्विकारलेली नाही परंतु, पूर्व अफगाणिस्तान मध्ये तालिबानचे दहशतवादी आणि इस्लामिक स्टेट ग्रुप सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांनीच हा स्फोट घडवून आणल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या नांगरहर प्रांतात या वर्षी हिंसक घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील आठवड्यात राज्यलेखा कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात १५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

कर्नाटकात येडियुरप्पा सरकार कोसळलं.


कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी आधी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे भाषण सुरु आहे. अत्यंत भावनात्मक असे हे भाषण आहे. जनतेचा कौल हा काँग्रेस आणि जेडीएसला मिळाला नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

= भाजपाकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा.

= जनतेने आम्हाला १०४ ऐवजी ११३ जागा दिल्या असत्या तर आम्ही राज्याच नंदनवन केलं असतं – येडियुरप्पा

= माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कर्नाटकाची सेवा करीन-मी परिवर्तन यात्रा सुरु केली त्यावेळी लोकांचा मला भरपूर पाठिंबा मिळाला – येडियुरप्प

=  गरीब आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार बनवण्याचे माझा उद्देश होता – येडियुरप्प

= मी मागची दोनवर्ष संपूर्ण राज्याचा दौरा केली आणि वेदना, दु:ख लोकांच्या चेहऱ्यावर पाहिले, लोकांकडून मला जे प्रेम मिळाले ते मी कधीही विसरु शकत नाही – येडियुरप्पा

= लोकांनी आम्हाला १०४ जागांचा आशिर्वाद दिला. हाजनादेश काँग्रेस आणि जेडीएसला मिळालेला नाही – येडियुरप्पा

= बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेत मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे.

– मी माझ्या भावासोबत ताज वेस्ट एन्ड हॉटेल मध्ये होतो. कोणीही माझ्या संपर्कात नाही, आनंद सिंह आणिप्रताप पाटील यांना मी ओळखत नाही – सोमशेखरा रेड्डी

४० हजार रूपयांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह पाच जण जाळ्यात.


४० हजार रूपयाची लाच घेतल्याच्या आरोपावरून सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई धारूर येथे करण्यात आली. या कारवाईने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.तक्रारदाराविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्यातून वगळण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक केळे यांनी एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या पथकाने तक्रारीची शहानिशा करून शनिवारी धारूर येथे सापळा रचला. तडजोडीअंती तक्रारदाराकडून ४० हजार रूपयाची लाच पोलिसांनी घेतली आणि एसीबीच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक केळे, सहाय्यक उपनिरीक्षक अमीर इनामदार, पोलीस कर्मचारी बिक्कड यांच्यासह दोन खाजगी व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्या विरद्ध धारूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसीबीचे अधिकारी करीत आहेत.

मुर्डेश्वर पिठाधिस बालयोगी काशीगिरी महाराज पंचतत्वात विलिन

सिल्लोड तालुक्यतील केळगाव मुर्डेश्वर येथे शोकाकुल वातावरणात महाराजाना शेवटचा निरोप, राज्यभरातून हजारो भाविक दाखल

प्रतिनिधी
सिल्लोड :-तालुक्यतील केळगाव मुर्डेश्वर संस्थांचे पिठाधिस प, पु बालयोगी काशीगिरी महाराज गुरुवार दि 17 सकाळी 6 वाजता पंचतत्वात विलीन झाले मुत्युसमयी त्यांचे वय 52 वर्ष होते शुक्रवार सकाळी 11 वाजता त्याचा अंत्यविधी कऱण्यात आला त्यांच्या देहाचा नाशिक,काशी येथून आलेल्या संत म हतच्या हस्ते अभिषेक करून अंत्यविधी करण्यात आला त्याच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक दाखल झाले होते बालयोगी काशीगिरी महाराज यांच्या अंगातील धार्मिकता ओळखून येथील पीठडीस सीतामाई यांनी वयाच्या11 व्या वर्षी गादीवर बसवले तेव्हा पासून ते आतापर्यत बालयोगी काशीगिरी महाराजांनी मुर्डेश्वर संस्थाचा कायापालट केला आहे त्याच्या कार्यकाळात,राममंदिर,सभागृह, यात्री निवास, सीतामाई समाधी, यासह अनेक मंदिरे सभागृह, उभारली संस्थनास ब दर्जा मिळवण्यात काशीगिरी याचे मोलाचे योगदान आहेत तसेच मुर्डे श्वर मंदिरच्या परिसरात असणाऱ्या टेकटीवर 108 फुटाची शंकराची मूर्ती उभारणे पर्यटन सृष्टीकरिता दोन कोटी रुपय किमतीचे पर्यटन मंजूर झालेले असून कामाला सुरुवात सुद्धा झाली होती मुर्डे श्वर येथील मंदिररात येणाऱ्या जास्तीत जास्त भक्तास जेवणाची यवस्था कायमस्वरूपी मिळचयची बाबा येणाऱ्या सर्व भक्तागणास विचारपूस करायचे त्यामुळे मुर्डे श्वर देवस्थान भक्तगणास आपलेसे वाटायचे बाबाच्या काळात याठिकाणी दोन मोठे महायज्ञ होऊन गेले आहेत
             बाबाच्या अंत्यदर्शनासाठी आनंद आखाडा अध्यक्ष सागर नंदगिरी महाराज, गणेशगिरी महाराज ,सारावंगीरी महाराज शांतिगिरी महाराज  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,प्रदेश अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार,माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तायडे,माजी जि, प अध्यक्ष प्रभाकर पालोद कर, माजी सभापती अशोक दादा गरुड,सुरेश बनकर सभापती ज्ञानेश्वर तायडे, इंद्रिस मुलतानी,ज्ञानेश्वर मोठे, ठगणराव भागवत पाटील, सुनील मिरकर, नामदेव चापे,सुदर्शन अग्रवाल, मच्छिंद्र पाखरे, नंदकिशोर सहारे कृषि उतपन्न सभापती रामदास पालोकर नामदेव गाढे यांची उपस्थिती होती.

     ╭════════════╮    ▌ प्रतिनिधी : अजय बोराडे - सिल्लोड -------------------------------- 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी मो.नं./व्हाॅट्स अॅप :  9923763333 ...                           ╰════════════╯

क्युबामध्ये विमान दुर्घटनेत 100 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू.


क्युबामध्ये विमान दुर्घटनेत 100 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीआहे. हवानाच्या जोस मार्टी या विमानतळावरून बोइंग 737-200 या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात ते दुर्घटनाग्रस्त झाले.या विमानातून 104 प्रवासी प्रवास करत होते. डी अॅव्हियाकियान या एअरलाइन्सचं हे डोमेस्टिक विमान होते. हवानावरून क्युबाच्या पूर्वेकडील होलगुइनकडे जात असताना स्थानिक वेळेनुसार दुपारच्या 12.08 वाजता हेविमान कोसळले. जोस मार्टी विमानतळजवळ असलेल्या सॅंटियागो दे लास व्हॅजेस या शेती असलेल्या भागात हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झालं असून, स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे.क्युबा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल डाइझ कॅनेलही घटनास्थळी दाखल झाले आहेत. यापूर्वी तांत्रिक बिघाडामुळे डी अॅव्हियाकियान या एअरलाइन्सनं अनेक विमानांचं उड्डाण रद्द केले होते. परंतु विमान दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अमेरिकेतल्या शाळेत विद्यार्थ्यानं केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू, 10 जखमी.

अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातील एक शाळा गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. एका विद्यार्थ्याने अचानक केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी आहेत. मृतांमध्ये ब-याच विद्यार्थ्यांचाच समावेश आहे. गोळीबार प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, या दोघांपैकी एकाने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. टेक्सास प्रांतातील ह्युस्टन शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या सांता फे हायस्कूल मध्ये हा गोळीबार झालाय. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत अशा अनेक गोळीबाराच्या घटना घडत आहेत. तसेच सात दिवसांतील शाळांमधील ही तिसरी गोळीबाराची घटना आहे. फेब्रुवारी महिन्यातही फ्लोरिडातल्या पार्कलँड शाळेत अशाच प्रकारे गोळीबार झाला होता. त्यात 17 जणांना स्वतःच्या प्राणांना मुकावे लागले होते. आतापर्यंत अमेरिकेत वर्षभरात 22 वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. तसेच या गोळीबारांच्या घटनांना अमेरिकेतलं गन कल्चर काही प्रमाणात जबाबदार असल्याचीही चर्चा आहे.

गुजरात मध्ये सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटला, 19 जणांचा मृत्यू.


गुजरात मधील भावनगर- अहमदाबाद महामार्गावर सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, भावनगर- अहमदाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटलं आणि ट्रक उलटला. या भीषण अपघातात 19 जणांनी जीव गमावला तर 7 जण जखमी आहे. तेथिल जवळच्या हॉस्पिटलमध्ये 7 जणांवर उपचार सुरू आहेत. अपघाताचं नेमकं कारण तपासानंतरच समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अपघाताचं वृत्त समजताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Friday, 18 May 2018

महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशनच्या अकोला महानगर अध्यक्ष पदी सौ. मंगलाताई सुभाषराव म्हैसने यांची नियुक्ती


फुलचंद भगत
   प्रतिनिधी/अकोला :-
              महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. रवि वैद्य यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा अध्यक्ष श्री. निलेश किरतकार यांनी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अँड. रूपाली राऊत यांच्याशी चर्चा करून अकोला महानगर अध्यक्ष पदी सौ. मंगलाताई सुभाषराव म्हैसने यांची नियुक्ती केली आहे. सौ. म्हैसने यांचे सामाजिक कार्य आणि पोलीस बांधवांच्या प्रति काम करण्याची तळमळ पाहून त्यांची या पदी नियुक्ती करण्यात येत आहे असं यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. निलेश किरतकार यांनी सांगितले.
     आपण सदैव पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति काम करू आणि संघटनेच्या नियमांच्या अधीन राहून संघटना वाढी साठी प्रयत्न करू, असा विश्वास यावेळी सौ. मंगलाताई म्हैसने यांनी व्यक्त केला.
    त्यांच्या नियुक्तीला समस्त पोलीस बॉईज असोसिएशन पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष श्री. महेश गावंडे, सचिव संदिप सोनोने, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. शिवराज इंगळे, क्रिडा आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. रणजित दादा गावंडे, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. पवन पाठक, अकोट तालुकाध्यक्ष श्री.अनिल वगारे व समस्त महिला आघाडी यांनी शुभेच्छा दिल्या.                                     फुलचंद भगत मो.9763007835


धनगरांनो, झालेल्या फसगतीवर मात करण्यासाठी मुंबईला या– डॉ.शिवाजी दळणर

प्रतिनिधी

परभणी:-2014 मध्ये धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढल्यानंतर आणि मल्हार सैनिकांच्या उपोषणानंतर आजचे मुख्यमंत्री त्यावेळेसचे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सत्ता द्या आपणास पहील्या कॅबीनेट मध्ये धनगर समाजाच्या लोकांना अनुसूचित जातीचे पमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्त सहयांच्या हमीपत्रात धनगर समाजावर स्वातंत्र्यप्राप्तीपासून अन्याय झाला आहे. ‘ र ‘ चे ‘ ड ‘ झाले याची जाणीव आम्हास आहे तेंव्हा आम्हाला साथ द्या तुमचा प्रश्न लगेच निकालात काढू तसेच सोलापुरच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्याचा शब्द दिला होता. या सर्व अश्वासनाला आज साडेतीन वर्ष झाले पण केंद्र व महाराष्ट्र सरकार धनगर समाजाची जाणून बुजून फसवणूक करित असल्याचा आरोप धनगर समाजोन्नती मंडळ महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांनी केला आहे.

     डॉ.शिवाजी दळणर म्हणाले, शासनाच्या अनेक कॅबीनेट बैठका झाल्या, विविध सभेतून आश्वासने दिले, शब्द देणे झाले तरी समाजाला अद्याप न्याय मिळत नाही. फडणवीस यांची समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याची प्रॅक्टीस चालू आहे. गरज नसतांना “ टिस “ संस्थेकडे सर्वेसाठी प्रकरण दिले पण त्याचा अजूनपर्यंत अहवाल नाही. झोपीच सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी दि. 22 मे 2018 रोजी दुपारी दोन वाजता मुंबईत मंत्रालयासमोर हजारो धनगरी ढोल द्वारे गर्जना आंदोलन माजी आमदार प्रकाश (अण्णा) शिवाजीराव शेंडगे यांच्या नेत्रत्वाखाली करण्यात येणार आहे, अशी माहीती सागून ते म्हणाले, मराठवाडयातील धनगर समाजातील बुद्धीवंतांनी त्यात प्राध्यापक,शिक्षक,डॉक्टर, वकील, व्यापारी, व नवयुवकांनी हजारोंच्या संखेने मुंबईला हजार राहावे, असे आवाहान प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर तसेच लक्ष्मण पोले, साधू हाके, श्रीनिवास घाळगीर , तुकाराम तरडे, हरीभाउ शेळके, मारोतराव पैलवान बनसोडे , मारोतराव बकाल मामा, पांडूरंग बनसोडे, विजय घोरपडे, गणेशराव देवकते, दत्ता मायदंळे, राधाकिशन डूकरे, मुंजाभाउ तरटे, गंगाधर पितळे, विजय दळवी, प्रा.वजीर प्रभाकर, सुधाकर कुकडे आदींनी केले आहे.