तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 26 May 2018

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवेंना चकवा, सोयगावच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या प्रतिभा बोडखे.


येथील नगरपंचायतच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या प्रतिभा बोडखे यांची निवड झालीआहे. पैशांची मस्ती चढलेल्या भाजपने भरसभागृहात ५ लाख रुपये देऊन नगरसेवकाला खरेदी करण्याचा रचलेला डाव शिवसेनेच्या नगरसेवकांनी उधळून लावत भाजपच्या श्रेष्ठींना चांगलाच चकवा दिला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाद्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपचा नगराध्यक्ष व्हावा, यासाठी सर्वतोपरी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले.सोयगाव नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी आज शनिवारी विशेष सभा बोलावण्यात आली होती. शिवसेनेने प्रतिभा बोडखे यांना उमेदवारी दिली होती. या ठिकाणी युती असताना भाजपने ऐनवेळी उमेदवार उभा करून गद्दारी केली. कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा नगराध्यक्ष झाला पाहिजे, यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विशेष लक्ष घातले. विशेष म्हणजे सोयगाव हे दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघातील गाव आहे. आज विशेष सभेच्या वेळी शिवसेना नगरसेवकांची मते आपल्याला पाडून घेण्यासाठी भरसभेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक भगवान इंगळे यांना ५ लाख रुपये देण्याचा प्रयत्न झाला. परंतु इंगळे वमाजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक असलेले योगेश पाटील यांनी हे पैसे खिडकीतून फेकून दिले. यामुळे भाजपचा डाव उधळला गेला.

अण्णा हजारे पुन्हा मैदानात; २ ऑक्टोबरपासून करणार उपोषण.


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी जनलोकपालच्या मुद्यावर २ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने या प्रश्नावर दुर्लक्ष केले आहे. त्याविरोधात २ ऑक्टोबरपासून राळेगण सिद्धीमध्ये उपोषण करण्याचा इशारा अण्णांनी दिला आहे.जनलोकपालासाठी अण्णांनी देशामध्ये जनजागृती करुन लढा उभारण्याचा निर्णय घेतलाहोता. प्रत्येक राज्यामध्ये दौरे करुन त्यांनी जनलोकपालाची माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहचवली होती.  केंद्र सरकारला ४ वर्ष पूर्ण झाले तरीही अण्णांच्या कोणत्याही पत्राची दखल केंद्र सरकारने कधीच घेतली नाही. वेळोवेळी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारवरनिशाना साधला होता. तसेच आपल्या भावनासुध्दा त्यावेळी व्यक्त केल्या होत्या. सरकार कोणत्याही प्रश्नांवर गंभीर नाही. पत्राला उत्तर देत नाहीत. जनलोकपालासाठी सरकार आग्रही नाही असे मुद्दे घेवून त्यांनी दिल्ली येथे आंदोलनहीकेले होते.अण्णांचे दिल्लीतील आंदोलन महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी पुढाकार घेत मागे घेण्यास भाग पाडले. त्यावेळीही पुन्हा आश्वासनाच्या व्यतिरिक्त अण्णांच्या पदरामध्ये काहीच पडले नाही. जनलोकपालसाठी अण्णांनी राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांना स्मरणपत्र पाठवले. सरकारने कृषीमुल्य आयोगाला स्वायत्तता देण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिलेहोते. तसेच शेती मालाच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के जादादर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंत आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोपही अण्णांनी या पत्रामधून केला आहे.‘भ्रष्टाचार रोखण्यासाठी हा क्रांतीकारी निर्णय असताना मात्र, चार वर्षाच्या पार्श्वभूमीवर पान भरभरुन जाहिराती दिल्या.निवडणूक पूर्व भ्रष्टाचार मुक्तीचा नारा दिला होता. हे ते विसरले आहेत. चार वर्षात लोकपाल नियुक्त केले नाही ही बाब दुर्देवी आहे. म्हणजेच हिंदूस्थान भ्रष्टाचार मुक्त बनविण्याची आपली इच्छा नसल्याचे दिसून येत आहे,’ असे अण्णांनी म्हंटले आहे. या सर्व विलंबाच्या निषेधार्थ  २ ऑक्टोबर पासून राळेगण सिध्दी येथे उपोषणास बसण्याचा इशाराअण्णांनी दिला आहे.

गोव्यात बीचवर फिरणाऱ्या कपलचे कपडे काढले, बॉयफ्रेंड समोर तरुणीवर गँगरेप.


विदेशी पर्यटकांसाठी सर्वात आवडती जागा असलेल्या गोव्यामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीचवर फिरायला गेल्या कपलचे आधी कपडे काढण्यात आले आणि नंतर तरुणीवर गँगरेप करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखलकरण्यात आला असून आरोपींना अद्याप पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.मिळालेल्या माहितीनुसार, बीचवर फिरायला गेलेल्या कपलचे तिघांनी फोटो काढले आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी कपलचे कपडे काढले आणि बॉयफ्रेंडसमोर २० वर्षीय तरुणीवर गँगरेप केला. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून काही संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती एसपी अरविंद गावड यांनी दिली आहे. परंतु अद्यापही आरोपींची ओळख पटली नसून ते पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.यापूर्वीही जिवाचा गोवा करण्यासाठी दिल्लीवरून आलेल्या एका तरुणीवर गँगरेपचे प्रकरण समोर आले होते. गोवा फिरण्यास आलेल्या तरुणीने अंजुना बीचवर जाण्यासाठी एक टॅक्सी केली होती. या दरम्यान अरपोरा गावाजवळ काही लोकांनी आपण अँटी नारकोटिक्स विभागाचे असल्याचे सांगत टॅक्सी थांबली. आरोपींनी तरुणीच्या बॅगची तपासणी केली आणि चौकशीसाठी तिला एका फ्लॅटमध्ये घेऊन गेले. याच ठिकाणी गँगरेप करण्यात आल्याचा आरोप तरुणीने केला होता. या प्रकरणातील पाचही आरोपींनी पोलिसांनी अटक केली आहे.

शेतकरी जाणार दहा दिवसांच्या संपावर.


येत्या १ ते १० जून दरम्यान देशव्यापी शेतकरी संप पुकारण्यात आला आहे. हा संप देशातील २२ राज्यात होणार असून राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने देशभरातील १३० संघटना एकत्र येऊन हा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय किसान महासंघ कोअर कमिटीचे संदीपआबा गिड्डे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस कोर कमिटीचे लक्ष्मण वंगे, श्रीकांत तराळ, शंकर दरेकर, राजामारा पाटील, दिलीप चव्हाण, अतिश गरड, उद्धव, भिसे, अमोल साबळे यांची उपस्थिती होती.देशव्यापी संपाबाबत अधिक माहिती देताना पाटील पुढे म्हणाले, संपूर्ण कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमी भाव, किमान आधारभूत उत्पादनाची हमी, देशपातळीवरील मागण्यांसह राज्य पातळीवर तसेच शेती व शेतीपूरक व्यवसायांना मोफत वीजपुरवठा, संरक्षित शेती उत्पादन कायदा अंमलबजावणी, दुधाला कमीत कमी ५० रुपयेस्थिर भाव द्यावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली.गतवर्षी झालेला शेतकऱ्यांचा संपवेळी शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले होते. त्यामुळे १ ते १० जून शेतकऱ्यांचा देशव्यापी संप कडकडीत करण्याचा निर्धार पाटील यांनी यावेळी बोलून दाखवला. मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही, असा इशारा देत आंदोलन यशस्वी करुन दाखवणार असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.

कत्तलखाण्यात जाणारी २९ जनावरे पकडली; दंड भरुन लगेच सुटका.


पाटोदा जवळील चुंबळी फाटा येथे बीड पोलिसांनी केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी जाणाऱ्या २९ जनावरांची सुटका केली़. मात्र त्यानंतर लगेच पाटोदा पोलीसांनी दंड करुन वाहने व त्यामधील व्यक्तींना सोडले.जामखेड आठवडी बाजारातून शनिवारी बीडच्या मोमिनपुरा येथील कत्तलखाण्यात कापण्यासाठी अवैधरित्या जनावरे जाणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीवरुन चुंबळी फाटा वाहन तपासणीमध्ये १६ गाईंसह एकूण २९ जनावरे कत्तलखाण्यात कापण्यासाठी नेत असल्याचे समजले. पोलिसांनीया माहितीवरुन ४ जणांसह ८ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र त्यानंतर कागदपत्र तपासून या प्रकरणातील सर्वांकडून दंड वसूल करुन सोडून दिले.इम्रान कुरेशी ,शेख समीर, जाबेर पठाण, लक्ष्मण राहिंज या चौघांना पोलिसांनी सोडून दिले.

पकडलेली जनावरे ही चांगली होती ती कत्तल करण्यासारखी नव्हती. ती सोडून न देता गो शाळेत पाठविणे गरजेचे होते. यामध्ये मोठा घोळ झालाय. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे’, असा आरोप हिंदुत्त्वादी संघटनांनी केला आहे.

बारामती येथून पळालेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना दौंडला अटक


दौैंड येथील रेल्वे स्थानकावरुन तीन बांगलादेशी नागरिकांना शनिवारी पकडण्यात आले. रॉनी अजय चौैधरी (वय ३0), सूरजित सुजित रॉय (वय ३३), शीलनंद मागोत्रो (वय ४0) अशी या नागरिकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती येथून तीन बांगलादेशी नागरिक पळाले असल्याचे तसेच ते रेल्वेने प्रवास करण्याची शक्यता बारामती पोलीस ठाण्याकडून दौंड पोलिसांना कळविण्यात आली होती. त्यानंतर दौैंड शहर पोलीस आणि रेल्वे पोलीस यांनी रेल्वे स्थानकात सापळा लावला. त्यानुसार शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला तीनही बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. आयपीएस अधिकारी सौैरव अग्रवाल, रेल्वे पोलीस निरीक्षक देवसिंग बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. पकडलेल्या तीन नागरिकांची पोलिसांकडून कसून चौैकशी सुरू आहे.

नागपूरात विजांंच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस.


गेल्या काही दिवसांपासून ४२-४५ डिग्री तापमानामुळं हैराण झालेल्या नागपूरकरांना आज पहिल्या पावसानं थोडाफार दिलासा मिळाला आहे. संध्याकाळच्या वेळी अचानक आलेल्या पावसानं नागपूरकरांची त्रेधात्रिरपीट उडाली आहे. नागपूरात अचानक आलेल्या पावसासोबतच विजांच्या कडकडाटही झाला आहे. कोसळणाऱ्या पावसानं वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण केला. या मान्सुनपूर्व सरींचा आनंद नागपूरकरांनी घेतला. पण उपराजधानीच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना अंधाराचा सामना देखील करावा लागला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे सचिन तेंडुलकरचा नागपूरातील एक पूर्वनियोजित कार्यक्रमदेखील रद्द करावा लागला आहे.

नाशिकमधल्या 'ग्रीन फिल्ड लॉन्स' कारवाईनंतर. उपअभियंता गायब.


नाशिकमधील ग्रीन फिल्ड लॉन्सवरील कारवाईच्या वादाला आता वेगळंचवळण लागलंय. ग्रीन फिल्ड लॉन्स कारवाई प्रकरणाची फाईल हाताळणारे नाशिक महापालिकेचे उप अभियंता रवी पाटील हे गायब झाले आहेत. वॉक विथ कमिशनर कार्यक्रमाला जात असल्याचं सांगून आज सकाळी ते घराबाहेर  पडले. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. या कारमध्ये त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलीय. कार्यालयीन काम करताना येत असल्यामुळं दबावामुळं आपण आत्महत्या करतोय, असं चिठ्ठीत लिहिलंय. पाटील यांचा मोबाइल फोन देखील मोटारीतच आढळून आलाय.या प्रकारानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गंगापूर पोलिसांत तक्रार दाखल केलीय. या प्रकारानंतर महापालिकेच्या सर्व अभियंत्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी कसे तणावात काम करतात? हे यानिमित्तानं अधोरेखित होतंय. बेकायदा लॉन्सवर झालेल्या कारवाईत रवी पाटील यांचाही सहभाग होता. याच प्रकरणात शुक्रवारी उच्च न्यायालयानं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दणका दिला होता. त्यानंतर रवी पाटील गायब झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय.

काही मिनिटात व्हॉट्सअॅपवर ओळखू शकाल 'बनावट' औषध !


आजकाल औषध आणि वैद्यकीय क्षेत्रातही बनावट कंपन्यांचा सुळसुळाट वाढला आहे. बाजारातून विकत घेतलेली सारीच औषधं सुरक्षित असतीलच याची पाहता क्षणीच अनेक ग्राहकांना ओळख पटवता येत नाही. परिणाम हा प्रकार जीवावर बेतण्याची शक्यता असते. परंतू आता बनावट औषधांचा धोका वेळीच ओळखणं शक्य होणार आहे. 

कसे ओळखाल बनावट औषध?

बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधविक्री रोखण्यासाठी आता व्हॉट्सअॅप तुम्हांला मदत करणार आहे. याकरिता भारत सरकार प्रयत्न करत आहे. 'ट्रेस अॅन्ड ट्रॅक' या उपक्रमाखाली ग्राहकांना बनावट औषधं ओळखता येणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय याबाबत आघाडीच्या 300 औषध विक्रेत्या कंपन्यांसोबत करार करणार आहे.

कशी असेल यंत्रणा?

कंपन्यांच्या औषधांवर एक 16 अंकी युनिक आयडेंटीटी कोड असेल. त्यावर मोबाईल नंबरही दिलेला असेल. ग्राहकांना औषधाची पडताळणी करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर कोड पाठवायचा आहे. या क्रमांकावर औषध कंपनी, निर्मिती कोठे झाली? मालकाचं नाव अशी माहिती दिली जाईल. बनावट कंपन्यांच्या औषधांवर हा कोड नसेल.

काँग्रेसने पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे दुचाकीची काढलीअंत्ययात्रा


संग्रामपुर [प्रतिनिधी]
केंद्र शासनाने पेट्रोल,डिझेल,दरवाढी मुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगने कठीण झाले असल्याने इंधन दरवाढी विरोधात शनिवारी सकाळी तालुका काँग्रेस च्या वतीने काढली दुचाकीची अंत्ययात्रा
पेट्रोल डिझेल चे भाव गगनाला भिडले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे अवघड झाले आहे त्या आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी शेतमजूर होरपळून निघाले आहेत आंतराष्टीय बाजारात कच्या तेलाच्या किमती अत्यंत कमी झाल्या असल्यातरी सरकार नफेखोरी करून पेट्रोल डिझेल व ग्रास या इंधनाचे भाव कमी करीत नसून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जाते आहे एकप्रकारे जनतेची जाणीवपूर्वक आर्थिक व शारिरीक पिळवणूक शासन करीत असल्याने या इंधन दर वाढीमुळे  छोट्या मोठ्या व्यवसायांना खिड बसला आहे त्या निषेधार्त संग्रामपूर तालुका काँग्रेस व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने वरवट बकाल येथे मोटर सायकल ची अंत्ययात्रा काडून सरकार विरुद्ध नारे बाजी करून निषेध नोंदवला यावेळी अंत्ययात्रा वरवट बकाल येथील पेट्रोल पंप पासून सुरवात करून बस थांबा वर कॉग्रेस पदाधिकार्यानी इंधन दरवाढ वरून निषेध व्यक्त करून अंतयात्रेचा समारोप करण्यात आले यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र वानखडे, माजी ता अ संतोष राजनकर ,जि प.सदस्य मीनाक्षी हागे,नगर पंचायत उपाध्यक्ष सैय्यद आसिफ, संजय ढगे, तेजराव मारोडे,सुरेखा पळसकार,सुरेश हागे,अकबर कुरेशी, सतिष चोपडे,अमोल पाटील,अमोल घोडेस्वार,प्रा.मोहन रोदंळे, गणेश टापरे,संतोष ढगे,विवेक राऊत,पंकज तायडे,मनोज पालीवाल,निलेश चांडक,रणजित गमतिरे, मुन्ना ठेकेदार,संजय माली,सचिन पालकर,हरिदास दामधर,राहुल शिरसोले,लूकमान कुरेशी, शेख महेमुद , जलील शेख , अमीत गांधी, यांच्या सह आदी कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते

आज २७ मे १९५१:- मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उदघाटन


मरीन ड्राईव्हला फेरफटका मारताना समोरच एक भव्य दिव्य इमारत दिसते ती म्हणजे मुंबई शहरातील एकमेव तारापोरवाला मत्स्यालय. सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी मांडली. त्याचबरोबर समुद्राच्या आतील अद्भूतरम्य जग लोकांना पाहायला मिळावे, या हेतूने मरीन ड्राईव्हला ६० वर्षापूर्वी म्हणजे १९५१ साली बांधण्यात आलेले हे मत्स्यालय. मत्स्यालयाच्या बांधणीसाठी त्यावेळी८,९०,९०४ रु खर्च झाला, त्यापैकी दोन लाखांचा निधी तारापोरवाला यांनी दिला होता. असे हे दुमजली मत्स्यालय १०८ फुट लांब व ९४ फुट रुंद असून याच्या उभारणीसाठी तीन वर्षाचा कालावधी लागला आणि या वास्तूचे  उदघाटन  चेराष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले
हॉलमध्ये खा-या पाण्यातील आणि गोडया पाण्यातील मासे असे दोन मुख्य गट तयार करण्यात आले आहेत. खा-या पाण्यात आढळणा-या माशांच्या २०० तर गोडय़ा पाण्यात आढळणा-या २०० जाती ठेवण्यात आल्या आहेत.खा-या आणि गोडया पाण्याचे सतरा ते अठरा टँक आहेत. डॅम्सेल, बटरफ्लाय, एंजल, ट्रिगर, कावळा मासा, किळीस, वाम, स्क्विरल, पोम्पॅनो, ग्रुपर, टँग, कोंबडा, व्हिम्पल, मुरीश, सी अनिमल आदी प्रकारचे आणि त्यांच्या प्रजातींचे शोभिवंत माशांचे टँक पाहायला मिळतात. याचं आणखी एक आकर्षण म्हणजे या ठिकाणी जेली फिश नावाची नवीन टाकी मध्यभागी ठेवण्यात आली आहे.
केवळ भारतातच नव्हे तर सिंगापूर, मलेशिया, चीन, हाँगकाँग आणि बँकॉक आदी ठिकाणांहून आणलेले मासे दक्षिण मुंबईत असलेल्या तारापोरवाला मत्सालयात पाहायला मिळतात. माशांना नैसर्गिक वातावरण लाभावं म्हणून टाक्यांमध्ये खडक आणि पान वनस्पती ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांची शोभा अधिकच वाढलेली दिसते.
संदर्भ : इंटरनेट
संकलन : बाळू राऊत

महाराष्ट्रातील सहा पोलीस उपायुक्तांना आज 'आयपीएस'चा दर्जा बहाल

बाळू राऊत
मुंबई : पोलिस अहोरात्र काम करून आपले प्राण पणाला लावून ते नागरिकांचे रक्षण करत असतात त्यामूळे आपण घरी आरामात झोपु शकतो .इकडे तिकडे आपण फिरतो ते पोलिसामूळेच .
महाराष्ट्र पोलीस सेवेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी, राजेंद्र दाभाडे, अशोक दुधे, विक्रम देशमाने, व्ही. जी. मगर, आर. आर. बनसोडे, व्ही. डी. पंधारे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी 'आयपीएस'चा दर्जा बहाल केला. या सहा जणांना ४५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे जावे लागणार आहे
यासाठी त्या अधिकाऱयाच्या सेवेचे मूल्यमापन केले जाते. गोपनीय शेरे अहवाल म्हणजे एसीआर उत्कृष्ट, सेवेचा कालावधी, अधिकाऱयाला कोणतीही शिक्षा झाली नसावी, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी नसावी यासारख्या अनेक बाबींचा अभ्यास करून केंद्रीय गृहमंत्रालय 'आयपीएस'चा दर्जा बहाल करते.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ घ्यावा


- जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

एक लाखापर्यंतच्या कर्जाला ‘नो ड्युज’ची आवश्यकता नाही
पीक कर्जासंबंधी अडचण निर्माण झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

वाशिम, दि. २६ : जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील सर्व बँकांच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या बँकेत किंवा सेवा सहकारी सोसायटीत संपर्क साधून पीक कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. एक लाखापर्यंतच्या पीक कर्जासाठी ‘नो ड्युज’ची मागणी न करण्याच्या सूचनाही त्यांनी बँकांना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळावे, याकरिता यावर्षी १४७५ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  पावसाळा सुरु होण्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पीक कर्ज वितरणास अधिक गती देण्याच्या तसेच पीक कर्ज मागणीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांना एक लाख रुपयेपर्यंतच्या पीक कर्जासाठी ‘नो ड्युज’ सारख्या अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करता, पीक कर्जासाठी आवश्यक असलेल्या किमान कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पीक कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

एक लाख रुपये पर्यंत पीक कर्जासाठी फक्त १) सातबारा, २)  आठ अ उतारा, ३) फेरफार नोंदी, ४) आधारकार्ड अथवा मतदान ओळखपत्र अथवा रेशनकार्ड, ५) दोन पासपोर्ट फोटो, ६) बचत खाते पासबुकची झेरोक्सप्रत ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

पीकनिहाय असे होणार कर्जवाटप

पीक कर्ज वाटपासाठी स्केल ऑफ फायनान्समध्ये यावर्षी २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीनसाठी प्रति हेक्टरी ४८ हजार रुपये, तूर पिकासाठी ३६ हजार रुपये, कापूस पिकासाठी ४८ हजार रुपये, खरीप ज्वारीसाठी ३० हजार रुपये, भुईमुगसाठी ३६ हजार रुपये, सुर्यफुल व तीळ पिकासाठी २६ हजार ४०० रुपये, उडीद व मुग पिकासाठी प्रत्येकी २१ हजार ६०० हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पीक कर्जाविषयी अडचणी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही अडचण निर्माण झाल्यास संबंधितांनी elokshahiwashim@gmail.com या ई-मेलवर अथवा ८३७९९२९४१५ या व्हाटस्अप क्रमांकाद्वारे कागदपत्रांसह बँकेचा विस्तृत तपशील द्यावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचा टोल फ्री क्रमांक १०७७ अथवा ०७२५२-२३११२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून पीक मिळविण्यासाठी कोणत्याही अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा अग्रणी बँकेशी (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३४६२५) अथवा जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे (भ्रमणध्वनी क्र. ९६०४२४३०००) यांच्याशी संपर्क साधावा.

सेवा सहकारी संस्था व जिल्हा मध्यवर्ती बँकेतून पीक कर्ज प्राप्त करून घेण्यासाठी  शेतकऱ्यांना कोणतीही अडचण असल्यास वाशिम सहाय्यक निबंधक कार्यालय (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२१४७ किंवा बी. एन. कोल्हे- भ्रमणध्वनी क्र. ९८२२७१३७४०), रिसोड सहाय्यक निबंधक कार्यालय (दूरध्वनी क्र. ०७२५१-२२२३१० किंवा एम. बी. बनसोडे-भ्रमणध्वनी क्र. ९४२२२७१४०३), मालेगाव सहाय्यक निबंधक कार्यालय (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७१३०७ किंवा पी. टी. सरकटे- भ्रमणध्वनी क्र. ९५६१७३७९७२), मंगरूळपीर सहाय्यक निबंधक कार्यालय (दूरध्वनी क्र. ०७२५३-२६०३५४ किंवा वाय. डी. खोब्रागडे- भ्रमणध्वनी क्र. ७८७५६९३८९०), कारंजा सहाय्यक निबंधक कार्यालय (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२०६४ किंवा किंवा पी. एन. गुलाणे- भ्रमणध्वनी क्र. ७५१७५९१९६२), मानोरा सहाय्यक निबंधक कार्यालय (दूरध्वनी क्र. ०७२५३-२६३२५९ किंवा आर. बी. राठोड- भ्रमणध्वनी क्र. ८२७५५८०७३४) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय ( दुरध्वनी क्र. ०७२५२-२३११७३), जिल्हा उपनिबंधक रमेश कटके (भ्रमणध्वनी क्र. ८६५२१३१३०१), जी.बी.राठोड (भ्रमणध्वनी क्र.  ९७६५६९०४९४), मारोती भेंडेकर (भ्रमणध्वनी क्र. ८२७५३१२१४४) यांच्याशी सुद्धा संपर्क साधून जिल्हा मध्यवर्ती बँक अथवा सेवा सहकारी संस्थांच्या पीक कर्ज वाटपाविषयी तक्रार नोंदविता येईल.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835