तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 January 2019

पाणी फाउंडेशन चा उपक्रमातून निसर्गाची धम्माल शाळाफुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)

मंगरुळपीर : श्री.मोतीरामजी चंद्रभानजी ठाकरे विद्यालय कासोळा येथे निसर्गाची धमाल शाळा उपक्रमाचे उदघाटन पार पडले.                                        विध्यार्थ्यांमध्ये पर्यावरणासंबंधी,पाण्याविषयी जाणीव निर्माण व्हावी म्हणून निसर्गाची धमाल शाळा उपक्रमा अंतर्गत दि.28 ते 31 जानेवारी 2019 पर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांमध्ये निसर्गा बद्दल  व पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण करण्यासाठी सदर उपक्रम राबविला जाणार आहे.ह्या मध्ये हसत खेडत खूप उपक्रम असतील नि 35 विध्यार्थ्यांचा सहभाग असेल.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अनंत उपाध्ये तर प्रमुख अतिथी म्हणून कैलास येवले उपस्थित होते. सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.तालुका समन्वयक समाधान वानखडे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रवीण कानकिरड तर आभार श्रीराम गांजरे सर यांनी मानले.या प्रसंगी पाणी फाऊनडेशनच्या सामाजिक प्रशिक्षक दीपमाला तायडे ,मयुरी काकड,अतुल तायडे.तांत्रिक सहायक निलेश भोयर .तांत्रिक प्रशिक्षक कल्याणी वडसकर,जलमित्र गोपाल भिसळे उपस्थित होते.कार्यक्रमाला सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

पत्रकार अजय ढवळे यांना राज्यस्तरीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उकृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदानफुलचंद भगत (जिल्हा प्रतिनिधि)
वाशिम दि.०१ (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून विविध दैनिक व  वृत्तवाहिणीच्या मध्यमातून पुरोगामी विचारांचा वारसा जपत बहुजन समाजातील तळागाळातील वंचीत,पीडित घटकासाठी व सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे सामाजिक तथा उल्लेखनीय कार्य करणारे व सतत पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला  सहकार्य करणारे वाशिम जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यध्यक्ष तथा  पत्रकार अजय ढवळे यांच्या कार्याची दखल घेत नॅशनल मुव्हमेंट फॉर जस्टीज (एन डी एम जे) महाराष्ट्र च्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात महत्वाचा समजल्या जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय  पत्रकारिता पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
वाशिम येथे नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र (एन डी एम जे)वाशिम शाखेच्या वतीने राज्यस्तरीय महाधिवेशन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,या राज्यस्तरीय महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी एन डी एम जे चे केंद्रीय सचिव डॉ.रमेश नाथन,उदघाटक म्हणून अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सदस्य सि एल थुल हे होते,तर प्रमुख उपस्थितीमध्ये माझी जिल्हाधिकारी तथा जेष्ठ धम्म उपासक यशवंत गायकवाड,जेष्ठ विधिज्ञ एड बि. जे.बनसोडे,माझी समाज कल्याण आयुक्त आर के गायकवाड,एड प्रिय दर्शनी तेलंग, कामगार नेते सागर तायडे,जेष्ठ विचारवंत अबीरामी ज्योती, (चेन्नई)एड डॉ केवल उके,संविधान अभ्यासक तथा जिल्हा उपनिबंधक डॉ रमेश कटके,दामिनी दारू बंदी संघटनेच्या सत्यभामा सौदर्यमल,राज्य समनव्यक समितीच्या अध्यक्षा रमाताई अहिरे,वाशिम समाजकल्याण उपयुक्त माया केदार,राज्य सचिव वैभव गीते,जेष्ठ समाज सेवक हंसराज शेंडे,यांच्यासह महाराष्ट्रातून विविध मान्यवर उपस्थित होते,या राज्यस्तरिय महाधिवेशन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन वाशिम शाखेच्या वतीने पी.एस खंदारे राज्य सहसचिव (एन डी एम जे)यांनी केले होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

अर्थसंकल्प 2019
छोट्या शेतकर्‍यांना वार्षिक 6 हजार रूपये वेतन...

 सरकारची अर्थसंकल्पात घोषणा....

 21 हजार रुपये पगार असणार्‍यांना 7 हजार रूपये बोनस ...

20 लाखा पर्यंतच्या ग्रॅज्युएटीवर कर लागणार नाही

 सैनिकांना किमान 7 हजार पेंशन...

50 कोटी जनतेला आयुष्यमान योजनेचा लाभ होणार

शेअर बाजार 140 अंकानी वाढला

संरक्षण क्षेञासाठी 3 लाख कोटीचा निधी


सौजन्य : मराठी न्युज चॅनल

एनडीजेएम च्या महाअधिवेशनात विनोद तायडे याना पत्रकारिता पुरस्कार प्रदानफुलचंद भगत( जिल्हा प्रतिनिधी)
वाशिम-विनोद तायडे यांनी मीडियाच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे .त्यांच्या कार्याची दखल घेत नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस महाराष्ट्राच्या वतीने   त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर  पत्रकारिता पुरस्कार  राज्यस्तरीय महाअधिवेशनात  प्रदान करण्यात आला .
वाशिम येथे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस 
 एनडीएमजे च्या वतीने राज्यस्तरीय महाअधिवेशन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . महा अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी एमडीजेएम चे केंद्रीय महासचिव डॉ रमेश नाथन हे होते .उद्घाटक म्हणून अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य  सि एल थुल हे होते   प्रमुख मार्गदर्शक म्हणून  जेष्ठ विधिज्ञ एडव्होकेट बी .जी. बनसोडे , माजी समाजकल्याण आयुक्त आर. के . गायकवाड, अडव्होकेट प्रियदर्शी तेलंग, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी यंशवंत गायकवाड ,कामगार नेते सागर तायडे,अबीरामी ज्योती,अडव्होकेट डॉक्टर केवल उके, संविधान अभ्यासक रमेश कटके, संविधान प्रचारक हंसराज शेंडे,  दामिनी दारूबंदी च्या सत्यभामा सौंदर्यमल , राज्य समन्वयक रमाताई अहिरे, राज्यसचिव वैभव गीते,आदी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार  अर्पण करण्यात आला . याप्रसंगी मान्यवरांची  मार्गदर्शनपर  भाषणे झालीत . प्रास्ताविक केवल उके यांनी  केले.  सूत्रसंचालन पी एस खंदारे यांनी करून आभार मानले.  कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

ना. पंकजाताई मुंडे यांनी पुसले स्वाती राठोडच्या कुटूंबियांचे अश्रू

ब्रह्मनाथ तांड्यावर जाऊन घेतली भेट; स्वातीच्या बहिणीला शिक्षणासाठी ५० हजाराची मदत 

वडवणी (प्रतिनिधी) :- दि. ३१ ------- रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या स्वाती राठोड या शाळकरी विद्यार्थीनीच्या कुटूंबियांचे अश्रू पुसण्यासाठी  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज सायंकाळी तिच्या घरी भेट दिली. ही घटना अतिशय क्लेशदायक असून यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिस अधिका-यांना त्यांनी सूचना दिल्या.  स्वातीच्या बहिणीला शिक्षणासाठी ५० हजाराची मदतही त्यांनी यावेळी दिली. 

     स्वाती राठोड या शाळकरी विद्यार्थीनीने एका तरूणाच्या छेडछाडीला कंटाळून नुकतीच आत्महत्या केली होती.   पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज संध्याकाळी वडवणी जवळ असलेल्या ब्रह्मनाथ तांड्यावर जाऊन स्वातीच्या कुटूंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल शिवाय तिच्यासोबत शिक्षण घेणा-या इतर मुलींना समुपदेशन करण्याचे आदेश त्यांनी पोलिस अधिका-यांना दिले. स्वातीच्या बहिणीला शिक्षणासाठी ५० हजाराची मदतही त्यांनी यावेळी केली. यावेळी बाबरी मुंडे, संजय आंधळे, राजाभाऊ पवार आदी उपस्थित होते.

फटाके कशाला ! राष्ट्रवादीचा प्रत्येक नेता तोफ आहे - धनंजय मुंडे यांच्या भाषणाला पारनेर मध्ये तुफान प्रतिसाद
पारनेर  (प्रतिनिधी) :- दि 31 -------- अरे सभेस्थानी फटाके कशाला वाजवता,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक नेता एक तोफ आहे त्यामुळे सभेच्या ठिकाणी असे छोटे मोठे फटके बाजवून वेळ घालवू नका असे वक्तव्य करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पारनेर येथील सभेत तुफान प्रतिसाद मिळवला.

परिवर्तन यात्रे दरम्यान आज पारनेर येथील शिवसेनेचे नेते निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला त्यावेळी मुंडे बोलत होते. 

यावेळी बोलताना मुंडे यांनी राज्यातील इतर घडामोडींनाही हात घातला. कांद्याला ५ रुपये अनुदान पाहिजे होते सरकारने दिले फक्त २ रुपये तेही ऑक्टोबरपर्यंत. या सत्ताधाऱ्यांना सरकार चालवायची अक्कल नाही अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार आले तर पारनेरचा पाण्याचा प्रश्न पहिला सोडवला जाईल असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. 

आमदार विजय औटी यांचे नाव न घेता इशारा

इथले आमदार फार दहशत पसरवतात मी आमदाराला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसला दहशत दाखवू नका. तुमचे फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत हे लक्षात ठेवा. सभेची गर्दी पाहता आता तुमची दहशत त्यांनी पाळली अशा शब्दात कार्यकर्त्यांना बळ दिले.

मुकनायक’आंबेडकरी चळवळींचा आवाज


मुकनायकदिनी कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे प्रतिपादन

बीड,दि.31(प्रतिनिधी)ः-त्या काळच्या भारतात धर्म संस्कृतिच्या नावाखाली माणसाला माणुस असूनही समान हक्क आणि अधिकार दिले जात नव्हते. विषमतावादी प्रवाहाकडून जातीची उतरंड निर्माण करून माणसा-माणसांमध्ये भेद केला जात असे. अशा काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक पाक्षिकातून मुक्यांना आपल्या हक्क, अधिकार आणि समतेसाठी बोलके केले.त्यामुळे मुकनायक हा आंबेडकरी चळवळींचा खरा आवाज असून मुकनायकदिन मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे. असल्याचे प्रतिपादन कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांनी व्यक्त केले.

  मुकनायक दिनानिमित्त बहूजन पत्रकार संघाकडून गुरूवार (दि.31) जानेवारी रोजी शहरातील तुलसी संगणक शास्त्र महाविद्यालय बीड येथे मुकनायक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून मुप्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून प्रा.लक्ष्मण गुंजाळ, द्वारकादास फटाले, बबन वडमारे, डी.जी.वानखेडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

 उपस्थिताना संबोधित करताना संजय कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते’.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 साली मुकनायक हे पक्षिक सुरू केले होते.या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणिव निर्माण करून दिली. त्याला आज 99 वर्ष होत आहेत. पुढच्या वर्षी मुकनायकाला एक शतक होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुकनायक दिन साजरा झाला पाहिजे. असल्याचे मनोगत संजय कांबळे यांयासह मान्यवरांनी व्यक्त केले.  

 या मुकनायक दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन  पत्रकार सुनिल डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार अनिल मगर यांनी व्यक्त केले. यावेळी बहूजन पत्रकार संघाचे उत्तम हजारे, गलाब भावसार, सुधाकर सोनवणे, बालाजी जगतकर, नाना कांबळे, अनिल ससाणे,  सुरेश पाटोळे, पत्रकार बांधव यांच्यासह तुलसी संगणक शास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंदाने मोलचे सहकार्य केले. यावेळी समतेची विचारधारा घेऊन निघालेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.मूकनायकाच्या पहिल्या 

अंकातला मजकूर

हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोर्‍याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही.

गणेशपार खंडोबा नगर मित्र मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

परळी वैजनाथ ( प्रतिनिधी) :- दि.३१- प्रतिवर्षी प्रमाणेच गणेशपार खंडोबा नगर मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक शिवजन्मोउत्सव समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्ष म्हणून गणेश दिपक देशमुख यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी गोविंद जाधव यांची निवड करण्यात आली.खंडोबा नगर मधील संत गाडगेबाबा सार्वजनिक सभागृहात ही बैठक आयोजित केली गेली होती.
  
या बैठकीत सचिवपदी सौदागर शेळके कोषाध्यक्षपदी पवन खरोळकर,शिवा सुरवसे सहसचिवपदी विकास कुंभार,अमर सुरवसे,मिरवणूक प्रमुख म्हणून दत्ता तुरुप,अमोल आरसुडे,भागवत नाईकवाडे अजय शिंदे यांची निवड करण्यात आली.  सदस्य म्हणून चक्रधर पवार, संदीप गिरी,बाळू लोखंडे,गणेश आगलावे, अक्षय सुरवसे,अजय लोखंडे,बाळू सुरवसे,रवी सुरवसे,अंकित सेलूकर,मनीष खोत ,प्रसाद खोडवे, राम कुंभार आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नी च्या मदतीसाठी सरसावले शेकडो हातमुलाचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारले

संकल्प राष्ट्र उभारणीचा ग्रुपचा उपक्रम

गंगाखेड (प्रतिनिधी) :- पती जाऊन पंधरवाडाही लोटला नाही, अचानक पंधरा-वीस लोकांचे टोळकॆ येतंय अन मोडक्या तोकड्या दारात उभा टाकत मदत करण्यामागची भूमिका सांगत शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्य भेट देऊन जातयं असा एक वेगळा अनुभव कर्ता पुरुष गेल्याने दुःखाच्या सागरात बुडालेल्या गंगाखेडातील भुमरे कुटुंबीयांनी अनुभवला.
याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील जनाबाई मंदिरासमोरील धनगर गल्लीतील सखाराम रोहिदास उंबरे या 35 वर्षीय शेतकऱ्यांनी पंधरा दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. घरातील कर्ता गेल्याने कुटुंबीय शोकसागरात बुडाले होते. निवडणुका तोंडावर आल्याने बऱ्याच पुढाऱ्यांनी भुमरे कुटुंबाची माहिती घेत घरी भेटी दिल्या. पण सांत्वनाचे चार शब्द पानावर पडण्याशिवाय पती गेल्याने कुटुंब प्रमुखांची जबाबदारी खांद्यावर पडलेल्या  विधवा पत्नी चौत्राबाई सखाराम भुमरे यांच्या कानावर दुसरं काहीच पडलं नाही.  महिनाभरापूर्वी झालेला लाडक्या गायीचा मृत्यू  अन् पंधरा दिवसापूर्वी पती देवाघरी जाण्याचे दुःख मनात साठवत आपल्या 2 लहान मुलांना आई आणि बाप दोघांचीही माया चौतराताई देत होत्या. भुमरे कुटुंबीयांचे दूरचे नातेवाईक असलेले येथील व्यापारी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी या कुटुंबाची व्यथा संकल्प राष्ट्र उभारणीचा या ग्रुपचे कर्तेधर्ते शामसुंदर निरस यांच्या कानावर घातली. कुटुंबाची व्यथा कानावर पडताच शामसुंदर नीरस सर हे दोन दिवसात या कुटुंबास मदतीची खरोखर गरज आहे का हे पाहण्यासाठी सखाराम बोबडे यांना घेऊन मयत शेतकर्याच्या घरी दाखल झाले. दुःख सागरत बुडालेल्या भुमरे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून शामसुंदर निरस यांनी त्याच क्षणी मयत शेतकरी सखाराम भुमरे यांच्या मोठ्या मुलास स्वतः कार्यरत असलेल्या समाज कल्याण विभागाच्या केंद्रीय विद्यालयात प्रवेश देण्याची जबाबदारी बोलून दाखवली. परभणी जिल्ह्यातील सुमारे 170 गरजु कुटुबियांना आरोग्य, शिक्षण, रोजगार अशा वेगवेगळ्या विषयावर मदत करणाऱ्या संकल्प राष्ट्रउभारणीचा या ग्रुपच्या सदस्यांनी त्यांना रोजगाराची साधनं उपलब्ध व्हावीत या हेतूने शिलाई मशीन भेट देण्याचा निर्णय घेतला. 26 जानेवारी रोजी सर्वत्र प्रजासत्ताक दिनाची धामधुम चालू होती. संकल्प राष्ट्र उभारणीचा या ग्रुपचे सदस्य मात्र आपण सेवेत असलेल्या ठिकाणचे ध्वजारोहण आटोपून परभणीहुन गंगाखेड च्या दिशेने रवाना झाले होते. दुपारी साडेबाराची वेळ होती. मोटरसायकल, ऑटो ,जीप मिळेल त्या वाहनाने या ग्रुपचे सदस्य ग्रामीण भागात सारखीच वातावरण असलेल्या धनगर गल्लीत दाखल होत होते. एकदम अनोळखी माणसं गल्लीत येतात शेजारी मात्र यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. कुटुंबातील सदस्य मुजाभाउ भुमरे यांना नविन माणसं येणार असल्याची माहिती असल्याने ते पाहूण्याची वाट पाहत थांबले होते. या ग्रुपच्या काही सदस्यांनी आपले मनोगत मोजक्या शब्दात  मदती मागची भूमिका मांडली.  आम्ही करत असलेल्या मदतीने भुमरे कुटुंबातील दुःख संपणार नसले तरी रोजगार उपलब्ध होण्यास  मदत होणार असल्याचे या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. असा प्रसंग कोणाच्या कुटुंबात दुर्दैवाने घडू नये पण घडला तर त्या कुटुंबास मदतीसाठी हजारो हात तयार व्हावेत यासाठी ही माहिती सांगावी लागत असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. भुमरे कुटुंबातील सदस्यांचा व या ग्रुपच्या सदस्यांचे एकमेकाला परिचय करून देण्याची भूमिका सखाराम बोबडे यांनी पार पाडली. यावेळी संकल्प राष्ट्र उभारणीचा या ग्रुपचे शामसुंदर निरस, कोमल गावंडे, सतीश शिंदे, धिरज सोनवणे, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी अमित घवले, दिनकर जोशी, रामदास धोंगडे, विजय पकाने, प्रकाश कांबळे, विष्णू दराडे, सुरेश सरवदे, सुनील कांबळे, मुंजाभाऊ सोंगे यांनी आर्थिक मदत जमा करून एकत्र येत  शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याची खरेदी केली होती. यावेळी यावेळी सतीश शिंदे, मंजुषा पदेवाड, संतोष शिंदे, धिरज सोनवणे, सुनील वराळे, विलास साखरे, लक्ष्मण निरस,संपत निरस, दत्ता गुरले, नारायण धनवटे, सखाराम बोबडे, धनंजय पवार,  सरपंच सीमाताई धनवटे, सौ अलकाताई बोबडे आदींची उपस्थिती होती. दुर्गा लेडीज टेलर प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख सीमाताई घनवटे यांनी चौत्राताई भुमरे यांना मोफत शिलाई मशीन चालवण्याचे प्रशिक्षण देणार असल्याचे जाहीर केले. तर शहरातील डाॅ शिवाजी निरस यांनी या कुटुंबाची मोफत आरोग्य सेवेची जबाबदारी स्वीकारली. यावेळी या कुटुंबास रोख स्वरूपात एक लाख रुपयांची मदत करणारे माजी आमदार सीताराम घनदाट मामा व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या गोविंद यादव यांचेही आभार मानण्यात आले.
 यावेळी कुटुंबाच्या वतीने मयत शेतकऱ्याचे भाऊ मुंजाभाऊ भुमरे त्यांच्यासह भुमरे परिवाराचे नातेवाईक, मित्र असलेले राम ठेबरे, मुक्तीराम आळसे, पिराजी भुमरे, मधुकर आवाड,अशिष बोबडे यां सर्वांनी पाहुण्यांचे आभार मानले. यावेळी पत्रकार बाळासाहेब स्वामी, शेख अन्वर लिंबेकर, उत्तम आवंके, सुनील कोनारडे, प्रा.पिराजी कांबळे, बाळासाहेब राखे, शिवाजी कांबळे आदीची उपस्थिती होती.

बाबासाहेबांची पत्रकारिता लोकशाहीला दृढ करणारी - प्रेमनाथ कदम
परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) : - दि.31 बाबासाहेबांची पत्रकारिता लोकशाहीला दृढ करणारी असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी मूकनायक दिनानिमित्त आयोजित लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे कार्यक‘मात अध्यक्षीय भाषणात केले. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दैनिक सम‘ाटचे पत्रकार रानबा गायकवाड यांचा मूकनायक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक‘माचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन इंजि. भगवान साकसमुद्रे यांनी केले. साकसमुद्रे पुढे म्हणाले की, यावर्षी मूकनायक या वर्तमानपत्राला 99 वर्षे झाली. बाबासाहेबांनी मूकनायकसह बहिष्कृत भारत, समता आणि प्रबुद्ध भारत सारखे वर्तमानपत्र  काढले. त्यांची पत्रकारिता त्यांच्या कल्पनेतील आदर्श समाज, स्वातंत्र्य, समता, व मित्रत्व यावर आधारित नवसमाज निर्मितीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केले. यावेळी पत्रकार मोहन व्हावळे, दै. दिव्य मराठीचे प्रतिनिधी धनंजय आढाव, सुकेशिनी नाईकवाडे, संभाजी मुंडे, संजीव राय, प्रा.दशरथ रोडे, अनिसचे तालुका अध्यक्ष  विकास वाघमारे, प्रा. विलास रोडे, ऍड. कपिल चिंदालिया, बापू गायकवाड, संजय व्हावळे, प्रा.दासू वाघमारे,  नवनाथ दाने, निलेश सगट, किरण लोंढे, आकाश देवरे, ओमप्रकाश शिंदे, प्रकाशसिंग तुसाम, जितेंद्र मस्के, के. डी. उपाडे, सिद्धांत लांडगे आदि उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व गावांना 10 रुपयात एक हजार लिटर फिल्टर चे पाणी देऊ बबनराव लोणीकर

अरुणा शर्मा


पालम :- केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून जिल्ह्यात प्रत्येक गावात फिल्टरचे पाणी देण्यासाठी लागेल तेवढा निधी आणून जिल्ह्यातील सर्व गावांना 10 रुपयात एक हजार लिटर फिल्टर चे पाणी देऊ यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पालम येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी 65 गाव पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. व्यासपीठावर जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, माजी आमदार विजय गव्हाणे, राहुल भैया लोणीकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे, मेघनादीदी बोर्डीकर, रामप्रभू मुंढे, शामसुंदर मुंडे, विठ्ठलराव रबदडे, अँड.व्यंकटराव तांदळे ,डॉक्टर सुभाष कदम, बाबासाहेब फले, सुरेश भुमरे, सूर्यकांत कुलकर्णी, भागवत, लक्ष्मणराव रोकडे, राजश्री जामगे, संगीताताई जामगे, रामकिसन रौंदळे, लिंबांअना भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना बबणराव लोणीकर म्हणाले की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने राज्यातील आठ हजार गावच्या पाणीपुरवठा योजना अपूर्ण ठेवल्या होत्या. त्या योजना आमच्या सरकारने सहा हजार कोटी रुपये खर्च करून पूर्ण केल्या आहेत. मागील सरकारने सिंचनावर 70 हजार रुपये कोटी रुपये खर्च करूनही पिण्याचे पाणी सरकार देऊ शकले नाही. तसेच राज्यावर पाच लाख 52 हजार कोटीचे कर्ज करून ठेवले होते. परंतु सर्व गोष्टीवर मात करीत राज्य सरकारने पिण्याच्या पाण्यासाठी सर्व पाणीपुरवठा योजना पूर्ण केल्या आहेत.मागील चार वर्षापासून सतत दुष्काळ पडत आहे परंतु सरकार संपूर्णपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे असून संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. असे सांगून दुष्काळाची मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी केले.त्यांनी तालुक्यातील विविध प्रश्न मांडून तात्काळ तालुक्याच्या विकासासाठी मदत करण्याचे आव्हान केले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर, माजी आमदार विजय गव्हाणे, राहुल भैया लोणीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चाटोरी येथे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 65 गाव पाणीपुरवठा योजनेच्या कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पालम नगरपंचायत च्या तीन कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे मंत्रीमहोदयांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगर पं.चे उपाघ्यक्ष बालासाहेब रोकडे तालुका अध्यक्ष भागवत बारगीर, तुकाराम पाटील, लक्ष्मणराव रोकडे, डॉक्टर शेख बडेसाब, शिवाजीराव दीवटे, डॉ. रामराव ऊंदरे, दत्तराव घोरपडे, गणेश घोरपडे, पदुदेवा जोशी, सोपान कराळे, अण्णासाहेब किरडे, विनोद किरडे, गजानंद राेकडे, चंद्रकांत गायकवाड, ताराबाई कराळे, सुनिल छाजेड, विलास जोंधळे, वामन बरडे, जळबाजी फुले, प्रल्हाद कराळे, सुनील भैया दुधाटे आदींनी परिश्रम घेतले.

विरल करिया यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात ०९.१६ लोकल ट्रेन मध्ये साजरा करण्यात आला


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई: दि.३१ बार बार दिन यह आये, बार बार दिल यह गाये तू जिये हज़ारों साल, यह मेरी आरज़ू है हैप्पी बर्थडे टु यू हैप्पी बर्थडे टु यू, विरल , हैप्पी बर्थडे टु यू आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण.आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा एक क्षण मोठा उत्सव  होऊ दे हिच सदिच्छा..
विरल करिया यांचा वाढदिवस  ०९.१६ लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला.मीत भाषी स्वभावाचे विरल नेहमी प्रवाशांना चांगले बोलतात कधी वाद कधी भांडण नाही.आलेल्या परीस्थिती मोठ्या चातुर्य बुद्धी ने तडीस नेतात त्यामुळे लोकल ट्रेन मध्ये विरलचा जयघोष असतो.त्याच्या वाढदिवसा निमित्त रमेशभाईं लोकल ट्रेन मित्र मंडळातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेछ्या दिल्या 
त्यावेळी रमेशभाई रजक  , ठाकूरभाई , कुंवरजी छेडा , जगदीश जैसवार , अजितभाई , विजयभाई , चिंतन करिया , आनंद पटेल , जयेश पटेल  , वैभव पवार पावडर , जीवन चाळके , कुरेशी काका , अजय भाई डाकवा , मीठभावकर , नामदेवभाई ,इत्यादी उपस्थित होते .

शिवसेना नगरसेविका सौ अर्चना ताई भालेराव यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला

बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई: दि ३१.बार बार दिन यह आये, बार बार दिल यह गाये तू जिये हज़ारों साल, यह मेरी आरज़ू है हैप्पी बर्थडे टु यू हैप्पी बर्थडे टु यू,  , अर्चना ताई हैप्पी बर्थडे टु यू आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.
शिवसेना नगरसेविका सौ अर्चना ताई भालेराव हया वार्ड  क्रमांक १२६ च्या विद्यमान नगरसेविका तसेच आरोग्य समिती  अध्यक्षा आहेत.आरोग्य समिती अध्यक्षा झाल्यानंतर त्यांनी मधुमेह या आजाराबद्दल.मुंबईतील लोकलच्या माध्यमातून मधुमेहाबाबत जनजागृती केली.रेल्वे स्थानकात फलक आणि पोस्टर्स लावून मधुमेहाबाबत आवश्यक ती माहिती प्रवाशांना दिली गेली गोवर रुबेला लसीकरण मोहीम. या मोहिमेत ९ वर्षे ते १५ वर्षे पर्यंतच्या बालकांना हि लस दिली गेली तसेच त्यांच्या वार्डत गटारांची , लादीकरण , पेव्हर ब्लॉक , असे कामी त्यांनी मार्गी लावली आहेत .त्यांचे पती हे देखील मा .नगरसेवक होते त्यावेळी देखील त्यांनी खुप कामे केल्याने वार्डात काम करनारा नगरसेवक म्हणुन त्यांची ख्याती आहे .
आरोग्य समिती अध्यक्षा.डाॅ सौ अर्चना ताई भालेराव(शिवसेना नगरसेविका-१२६,घाटकोपर प.) यांच्या वाढदिवसा निमित्तपक्ष_प्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब_ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन पुढिल वाटचालीसाठी आशिर्वाद घेतला.त्यावेळी शिवसेना नेते विभाग प्रमुख आ.अॅड.अनिल परब ,शिवभक्त, शिवसेना मा.नगरसेवक.श्री.संजय(दादा) भालेराव उपस्थित होते

पालम काँग्रेस कार्यालया मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस चे संभाव्य उमेदवार राजेश विटेकर यांचा सत्कारअरुणा शर्मा

 पालम :- येथे दिनांक 31 जानेवारी रोजी कॉग्रेस कार्यलयात कॉग्रेस -राष्ट्रवादी कॉग्रेस चे संभाव्य उमेदवार राजेश विटेकरयांचा शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. यावेळी पालम काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुलाबराव सिरस्कर दादा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव सिरस्कर काका, पंचायत समिती उपसभापती रत्नाकर शिंदे, बाळासाहेब देशमुख, शेख अहमद भाई, माधव फाजगे, अकबर खान पठाण, साजिद भाई काजी रामप्रसाद कदम, उत्तमराव गादगे, सोपानराव कुरे, सय्यद इखार, शेख महेबुब, उस्मान मोमीन, सय्यद मनुभाई, सय्यद तकिर आदि उपस्थित होते.

देश सेवा करण्याच्या उद्देशाने रासेयो शिबीर महत्त्वाचे - परमेश्वरराव कदम


सोनपेठ : देश हा व्यक्तींनी मिळून बनलेला समुह असतो. समुहातील उच्चशिक्षित नागरीकांमध्ये शिस्त लागण्यासाठी व देश सेवा करण्यासाठी रासेयो  महत्त्वाचे असते असे मत रासेयोच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीय समारोपात हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम यांनी व्यक्त केले. 
शहरातील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विटा खुर्द येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबीराचे आज उद्घाटन करण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटक मा.मदनराव विटेकर  प्रमुख पाहूणे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले, किरण स्वामी, ग्रामसेवक लक्ष्मण चितळे , ग्रामपंचायत सदस्य कस्तूराबाई भोसले, आशा परसे, ज्योतीताई तुपसमिंद्रे, कार्यक्रमाधिरी प्रा. डाॅ. मारोती कच्छवे, समन्वयक मुकुंदराज पाटील, आदींची उपस्थिती होती.
या वेळी विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोण बानवण्यासाठी जादुचे प्रयोग श्री बने गुरूजी यांनी दाखवले. 
यावेळी सुत्रसंचालन प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी, तर आभार डाॅ. बापुराव आंधळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. गोविंद वाकणकर, प्रा. डॉ. शिवाजी अंभुरे, प्रा. विकास रागोले, प्रा. डॉ. अनंत सरकाळे, प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रा. श्रीकांत गव्हाणे, संतुक कुलकर्णी व बाबुराव फड यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी गावकरी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

संक्रांती निमित्त कोन होता शिवाजी ग्रंथाचे वाटपप्रतिनिधी
पाथरी:-वाचन संस्कृती जोपासली जावी तसेच या साठी शहरातील ज्ञानेश्वरनगर येथील मिनाक्षी किरण घुंबरे पाटील यांच्या वतीने मकरसंक्रांती निमित्त वान म्हणून कॉ गोविंद पानसरे लिखित 'कोन होता शिवाजी' या ग्रंथाचे महिलांना वाटप करण्यात आले.
महिला गृह कामा बरोबरच लहान मुलांवर योग्य संस्कार करत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजां विषयीचा खरा इतिहास घराघरात पोहचवा राजांचे कार्य माताभगिनींनी मुलांना गोष्टीच्या माध्यमातून समजून सांगुन मुलां मध्ये प्रेरणा निर्माण व्हावी. मुले हीच घराचे वैभव आणि खरी संपत्ती असतात ते चांगल्या संस्कारात वाढावे या साठी हा ग्रंथ निश्चित उपयेगी पडेल असे सौ घुंबरे या सांगतात गुरूवार 31 जानेवारी रोजी देवनांद्रा परिसरातील ज्ञानेश्वरनगर येथे संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात त्यांनी महिला भगिनींना या तिळगुळाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवन चरीत्रा वरील हा ग्रंथ वानन म्हणून भेट दिला. या वेळी सौ वर्षा गजानन घुंबरे,सौ वैशालीताई ठोंबरे, सौ पोपळघट, सौ रोहिनी घुंबरे आदि मोठ्या संखेने महिला उपस्थित होत्या

ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या तळेगांव, पांगरी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटनलोकार्पण व शुभारंभांचा होणार अधिकृत शासकीय कार्यक्रम

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ३१ ------ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मंजूर करून आणलेल्या तालुक्यातील तळेगांव आणि पांगरी येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे उद्घाटन उद्या (ता. १) अधिकृतपणे त्यांच्या हस्ते होणार आहे. 

   ना. पंकजाताई मुंडे यांनी परळी तालुक्यात १५ गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून तर सहा ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतल्या आहेत. ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या ना पंकजाताई मुंडे यांनी  विकास कामे करतांना भेदभाव न करता मतदारसंघातील प्रत्येक गावांत निधी दिला आहे. तळेगांव येथे ७६ लाख रुपये खर्च करून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना मंजूर केली असून त्याचे कामही पुर्ण झाले आहे, या योजनेचे लोकार्पण उद्या दुपारी १ वा. त्यांच्या हस्ते होणार आहे. 

   राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पांगरी येथे  ८९ लाख रुपये खर्चाची योजना मंजूर केली असून त्याच्या कामाचा शुभारंभ ना पंकजाताई मुंडे उद्या करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे आवाहन ग्रामस्थ व भाजपच्या पदाधिका-यांनी केले आहे.

ना.धनंजय मुंडे आज वडवणीत स्वाती राठोड कुटुंबियांची घेणार भेट


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.31..............विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे हे उद्या शुक्रवार दि.1 फेब्रुवारी रोजी वडवणी येथे भेट देणार असुन रोड रोमियोच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केलेल्या स्वाती राठोड कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. 

सकाळी 8 वाजता श्री.मुंडे व माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके हे वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांड्यावर जाणार आहेत. येथील स्वाती गोविंद राठोड या शाळकरी मुलीने रोड रोमियोच्या त्रालासा कंटाळुन नुकतीच आत्महत्या केलेली होती. श्री. मुंडे व सोळंके हे तिच्या कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन करणार आहेत.

 स्वाती राठोड हिच्या मृत्युच्या घटनेमुळे वडवणीतच नव्हे तर संपुर्ण बीड जिल्ह्यात व बंजारा समाजात तिव्र संतापाची लाट ऊसळली आहे. मागील काही दिवसात बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ठासळली असुन बीड मध्ये महाविद्यालयाच्या समोर झालेली हत्या, अंबाजोगाई येथील खुन आणि त्या पाठोपाठील वडवणीतील घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ठासळल्याचे स्पष्ट दिसत आहे. या पार्श्वभुमीवर मुंडे यांच्या या दौर्‍याला महत्व प्राप्त झाले असुन, ते या प्रकरणी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले  आहे.

ना.पंकजाताई मुंडे यांची वैजनाथ आप्पा गारठे यांच्या निवासस्थानी भेट


घाटनांदूर (प्रतिनिधी) :- दि. ३० ----  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ आप्पा गारठे यांच्या निवासस्थानी भेट दिली. गारठे यांनी यावेळी त्यांचा सत्कार केला. 

    नांदेड-बेंगलुरू एक्स्प्रेसला घाटनांदूर येथे थांबा मिळावा म्हणून वैजनाथ आप्पा गारठे यांनी ना. पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मुंडे भगिनींच्या प्रयत्नांमुळे रेल्वेला घाटनांदूर येथे थांबा मिळाला त्याबद्दल नुकताच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या दौ-यात मुंडे भगिनींनी गारठे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी गारठे परिवारांनी त्यांचा सत्कार केला व आभार मानले. मुंडे साहेबांच्या नंतर दोन्ही भगिनी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा आहोत असे गारठे यांनी यावेळी सांगितले.

निवृत्त न्यायालयीन कर्मचारी सतीश गडम यांचे निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.३१- निवृत्त न्यायालयातील कर्मचारी सतीश गडम यांचे बुधवार दि.३० रोजी रात्री २.३० च्या सुमारास निधन झाले,मृत्यूसमयी ते ६१ वर्षांचे होते.

सतीश दिगंबर गडम यांचा अतिशय मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वत्र परिचय होता.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.गडम यांच्या पार्थिवावर गुरुवार दि.३१ रोजी दुपारी ४ वा.परळीतल्या वैकुंठधाम सार्वजनिक स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जलयुक्त शिवार अभियान पत्रकारिता पुरस्कारासाठी दि. 15 फेब्रुवारी पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


         औरंगाबाद, दि.30 (जिमाका) :-- जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टिने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत योजनेच्या कामाला व्यापक  प्रसिध्दी देऊन या  योजनेत लोकसहभाग वाढवणाऱ्या  पत्रकारांसाठी शासनामार्फत जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येतात. औरंगाबाद जिल्ह्यातील पत्रकारांनी या पुरस्कारासाठी आपल्या प्रवेशिका दि. 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी पाठवाव्यात, असे आवाहन जलयुक्त शिवार अभियान पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समितीच्यावतीने करण्यात येत आहे.सन 2017 आणि सन 2018 या वर्षातील पुरस्कारांसाठी सदर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
    राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभाग स्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार तर जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देण्यात  येतो. तसेच राज्यस्तरावर इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रतिनिधींना एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार आहे.  प्रवेशिकेचा विहित नमुना जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद येथे उपलब्ध असून तसेच अधिक माहितीसाठी ग्रामविकास ज जलसंधारण विभागाचा दि. 09.08.2017 आणि 28.09.2016 चा शासन निर्णय पहावा.
जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रसिध्दीसाठी बातमीदारांनी मोहिमेच्या अंमलबजावणीच्या दि. 1 जानेवारी 2017 ते दि. 31 डिसेंबर 2017 (सन 2017 चा पुरस्कार) तसेच   आणि 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये प्रसिध्द केलेले लिखाण (सन 2018 चा पुरस्कार) याच्या पात्रतेकरिता मूल्यमापनासाठी ग्राह्य धरण्यात येईल. नमूद कालावधीत वृत्तपत्रे/नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफिचर्स अशा साहित्याचा विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्तपत्रकार पात्र असतील. पारितोषिकांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा विचार करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अ, ब, क वर्गवारीतील वृत्तपत्रे/नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच या पारितोषिकांसाठी विचार करण्यात येईल.
        एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीतील एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जर एका वर्तमानपत्राच्या एका आवृत्तीतील एकापेक्षा जास्त पत्रकार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांनी केलेल्या अर्जापैकी एकाच पत्रकाराच्या साहित्याची निवड करुन संबंधित संपादकांनी त्याचा अर्ज पुरस्कार योजनेसाठी पुढे सादर करावा. वृत्तपत्र बातमीदाराचे साहित्य अनेक वृत्तपत्रांतून प्रसिध्द झालेले असेल तर त्या संबंधिचा एकत्रित अर्ज त्या संपादकापैकी कोणत्याही एका संपादकांनी निवड समितीकडे सादर करावा.पुरस्कारासाठी गठित निवड समितीतील सदस्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे विभागीयस्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल तर विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल. अर्जदारांनी विहित नमुन्यातील आपला अर्ज तीन प्रतीमध्ये संबंधित जिल्हास्तर समितीकडे विहित मुदतीत पाठवावा. पुरस्कारासाठी पाठवायच्या प्रवेशिकेसोबत मुळ लिखाणाची कात्रणे त्याच्या दोन प्रतीसह पाठवावी लागतील. मुळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालीकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल त्या नियतकालीकाच्या संपादकाचा दाखला प्रवेशिकेबरोबर जोडलेला असावा अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
औरंगाबाद जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका  जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, जलयुक्त शिवार अभियान पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समिती, खडकेश्वर, औरंगाबाद, पिन 431001 (दूरध्वनी क्र. 0240-2331285) यांचेकडे दि. 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हास्तरीय समितीतर्फे जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी केले आहे.

संक्रांतीच्या वानाची रक्कम गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या साठी दान;जि प सदस्या टेंगसे यांचा उपक्रम


प्रतिनिधी
पाथरी:-मकरसंक्रांत निमित्ताने पाथरी तालुक्यात जि प सदस्या सौ मिराताई दादासाहेब टेंगसे यांनी मागील 4 वर्षां पासून अनोखा उपक्रम राबवत असून मकर संक्रांती निमित्त महिलांना देण्यात येणा-या वानाची रक्कम दर वर्षी ग्रामिण भागातील गरीब गरजू विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्या साठी भेट देण्याचा प्रेरणादाई आणि स्तूत्य असा उपक्रम राबवत असून गुरूवारी मरडसगाव येथील दोन मुलांना वाणाची रक्कम मदत शैक्षणिक साहित्य खरेदी साठी मदत म्हणून दिली.
       येथील देवनांद्रा जि प गटाच्या सदस्या सौ मिराताई दादासाहेब टेंगसे या मागिल चार वर्षा पासून मकर संक्रातीला वान देण्या साठी होणारा खर्च आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणा साठी देण्यास सुरुवात केली,2016 साली पाथरी तुक्यातील 18 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास सौ टेंगसे यांनी व त्यांच्या सर्व मैत्रिणींनी 72 हजार रुपयांची मदत केली,तर 2017 साली पाथरी येथे सुरू असलेल्या विध्यार्थी वसतिगृहास आर्थिक मदत केली,तर 2018 साली कु गीता बोराडे या गरीब कुटुंबातील मुलीस उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली, तर 2019 साली पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथील कर्जबाजारी शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या समोर उपोषण करत असताना हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मयत झाले,त्यांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणा साठी मदत म्हणून सौ मिराताई दादासाहेब टेंगसे यांनी यावर्षीचा मकरसंक्रातीनिमित्त होणारा खर्च मदत म्हणून दिला आहे.
          सौ मिराताई टेंगसे यांनी महाराष्ट्रातील सर्व महिलांना यानिमित्ताने चांगला आदर्श घालून दिला आहे,त्यामूळे त्यांच्या या उपक्रमाचे  सर्व स्तरातून कौतुक होत आहे, यासाठी त्यांना   ''क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री रत्न" हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

एखाद्याचअधिकाऱ्यांचाच होतो आगळा वेगळा जन्मदिन साजराश्री राम बोरगावकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य

जिंतूर
शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, जिंतूर मार्गदर्शक राम बोरगावकर (माजी तहसीलदार,जिंतूर)यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालेगाव (तांडा)ता.जिंतूर येथे शेख शकिल यांच्या सौजन्याने शालेय विद्यार्थ्यांना पाणी बाॅटल वाटप करुन आगळावेगळा साजरा करण्यात आला. प्रसंगी अरुण शहाणे, डाॅ. दुर्गादास कान्हडकर, अॅड. मनोज सारडा, अनुप सोळंके एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचा जन्मदिन असल्या प्रकारे साजरा होतो म्हणजे त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याची पावती म्हणावी लागेल

काय झाले स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मारकाचे ? वारसा सांगणारे त्यांचा घात का अपघात याचा जाब का विचारत नाहीत ? -धनंजय मुंडे यांचा सवाल


कर्जत ( अहमदनगर )  (प्रतिनिधी) :- दि 31 ------- साडे चार वर्षे झाली, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या निधनाला. सरकारच्या वतीने औरंगाबाद मध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात येणार होते , काय झाले त्या स्मारकाचे ? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या तिसऱ्या टप्यातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील आजच्या सभेत ते बोलत होते. सभेला या भागातील ऊसतोड मजुरांची मोठी संख्या होती त्यांच्या भावना लक्षात घेत धनंजय मुंडे यांनी ऊसतोड मजुरांच्या महामंडळाचा विषय उपस्थित केला.

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने ऊस मजुरांचे महामंडळ काढण्याचे सरकारने योजले होते, तेही त्यांनीच रद्द केले. औरंगाबाद येथे मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी जागा देणार होते. कुठे आहे जागा? कुठे आहे स्मारक? नुसत्या हवेत गप्पा. हा मुंडे साहेबांचा अपमान आहे असे ते म्हणाले. 

अमेरिकेच्या हँकरने ईव्हीएमसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नाही. आम्ही मात्र हा घात आहे की अपघात ते सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा दिला.

देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक. हा दावा मी नाही राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयच करतंय. मोदीजी तुमच्या नोटबंदीनं काय साध्य केलं? देशातील तरूणांना रोजगार देणं तर सोडाच, ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांच्या पोटावरसुद्धा तुम्ही पाय दिला म्हणत बेरोजगारांच्या प्रश्नाला हात घातला. 

सरकारने शेतकऱ्यांना तूर लावण्यास सांगूनही तूरीला भाव दिला नाही. सुभाष देशमुख यांनी तूर डाळीत केलेला भ्रष्टाचार आम्ही उघड केला. त्याची साधी चौकशी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली नाही. या घोटाळ्यामुळेच शेतकऱ्यांना तूरीसाठी योग्य भाव मिळाला नसल्याचा दावा मुंडे यांनी केला.

तीन लाख रुपयांच्या कर्जबाजारीपणामुळे व दुष्काळी परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्येतून नगर जिल्ह्यातील शिऊर येथे एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी नांदेड येथे शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केली. पाषाण ह्रदयी सरकारला पाझर फुटत नसेल तर मग हे सरकार हवे कशाला? म्हणत परिवर्तन करण्याचे आवाहन केले.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी  काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, युवा नेते रोहित पवार,नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके-पाटील, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंडपाटील आदींसह कर्जत, जामखेड येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

श्री गुरुबुद्धिस्वामी महविद्यालय पूर्णा चे ग्रंथालय परिचर श्री उत्तम दगडाप्पा देवणे आज सेवानिवृत


प्रा पुंडलीक जोगदंड

पूर्णा :श्री गुरुबुद्धिस्वामी महविद्यालय पूर्णा चे ग्रंथालय  परिचर श्री उत्तम दगडाप्पा देवणे हे प्रदीर्घ सेवेनंतर आज शासन नियमा नुसार सेवानिवृत झाले .
त्यानिमित्त आज महाविद्यालयांमध्ये त्यांचा सह कुटूंब 
सत्कार अयोजित करण्यात आला .
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन संस्थेचे कार्याध्यक्ष सिताराम अप्पा एकलारे प्रमुख पाहुणे म्हणुन सचिव उत्तमराव कदम ,साहेबराव कदम ,भुजंगराव कदम ,
सहसचिव अमृतराज कदम ,कोषाध्यक्ष प्रा .गोविंदराव कदम ,प्राचार्य .डॉ .के .राजकुमार हे व्यासपिठावर उपस्थित होते .
कार्याध्यक्ष सिताराम अप्पा एकलारे व सचिव उत्तमराव 
कदम यांच्या हस्ते श्री उत्तम देवणे व सौ .लीलावती  देवणे यांचा शाल ,पुष्पहार व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .संतोष एकलारे यांची विशेष उपस्थिती होती .
या प्रसंगी महाविद्यालयांतील प्राध्यापक डॉ पांडुरंग  भुताले  .डॉ .वेंकट कदम 
 ,प्रा .बलाप्रसाद परडे , विद्यार्थीयांनी मनोगत व्यक्त करुन देवणे च्या कार्याला 
उजाळा दिला .त्यांच्या कार्याची सर्वांनी प्रशंसा केली .
त्या प्रसंगी महाविद्यालयांतील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते .
सुत्रसंचलन प्रा .पुडलिक जोगदंड यांनी केले .तर आभार प्रदर्शन पर्वेक्षक प्रा .शिवदास थगनर यांनी केले .

Wednesday, 30 January 2019

मोप येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना निरोप
प्रतिनिधी रिसोड महेंद्रकुमार महाजन जैन

मोप ता.रिसोड येथील श्री.शिवाजी विद्यालय व क. महाविद्यालययातील इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.त्यानिमित्त विद्यालयात २८ जानेवारी रोजी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड.किरणराव सरनाईक तर मार्गदर्शक म्हणुन अकोला येथील उद्योजक हरेषभाई शहा व सुप्रसिध्द वक्ते विनोद बोरे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणुन शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव भिकाजी नागरे,शिवाजी किडस् वाशिमचे अध्यक्ष स्नेहदिपभैया सरनाईक,प्रा.प्रशांत गोळे,शांतीपुरी महाराज,डाॅ.रामेश्वरजी नरवाडे,जुगलकिशोर शर्मा,प्राचार्य डि.एन.अघडते,आदी उपस्थित होते.प्रतिमापुजन व स्वागत समारंभानंतर प्रा.समाधान गायकवाड,श्री.संजय नरवाडे सर,श्री.मुलकारे सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी  सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.वर्ग १२ वीच्या विद्यार्थींनी कु स्वाती मोरे व कु.प्रिती वाठोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात अॅड.सरनाईक यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची वेळ येऊ नये यासाठी वाशिम येथे शिवाजी अॅकॅडमी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती देऊन विद्यार्थांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.उद्योजक शहा यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बळावर आपले कर्तृत्त्व सिध्द करण्याचे आवाहन केले.प्रा.गायकवाड यांनी   संदेशे आते है या गितावर बसविलेले नृत्य शहा यांना खुपच आवडले व भावनिक होऊन मी ही आता असाच मिल्ट्रीचा ट्रेस घेण्याचे कबुल केले.शेवटी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या उद्योगात रोजगार देण्याची हमी  दिली.विनोद बोरे यांनी महापुरुषांच्या जीवनावर कविता सादर केल्या तसेच आपल्या नावाप्रमाणेच विनोद  करुन सभेला खळखळुन हसवले.त्यासाठी त्यांनी प्रा.समाधान गायकवाड व श्री संजय नरवाडे यांच्या नावाचा वापर केला. प्रास्ताविक अध्यक्ष डाॅ.गोपीकिसनजी सिकची व प्राचार्य डि.एन.अघडते सर यांनी केले.सुञसंचालन प्रा.शरद टेमधरे यांनी तर आभारप्रदर्शन श्री.निलेश पुंड सर यांनी केले.कार्यक्रमाला शाळेचे माजी प्राचार्य,कर्मचारी,गाव व परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्ती, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व वर्ग ९ वी व ११ वी च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

महेंद्रकुमार महाजन जैन 
9960292121
9420352121

कर्जबाजारीपणाला कंटाळून पौळ पिंपरीत शेतकऱ्याची आत्महत्यापरळी वैजनाथ (प्रतिनिधी)
सुधाकर किसन काळे (वय 58) यांनी रात्रीच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतात जाणाऱ्या वाटसरूंना सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ याबाबत सिरसाळा पोलीस स्टेशनला कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
परळी तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथील शेतकरी सुधाकर किसन काळे (वय 58) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. रात्रीच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. विविध बँकांचे त्यांच्याकडे कर्ज होते. सततची नापिकी आणि दुष्काळ यामुळे हे कर्ज आता फिटणार कसे? या विवंचनेत ते होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिट्टीत लिहून ठेवल्याचे कळले आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्राला 4700 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतरही ही राज्यातली पहिली आत्महत्या आहे. मयत सुधाकर काळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

प्रा. पि. टी. चव्हाण यांना मुप्टाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदानसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३० __ फुले-शाहु- आंबेडकर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव, माजी जि. प. सदस्य  आणि गढी येथील  जयभवानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. पी. टी. चव्हाण यांना बीड येथील मूप्टा संघटनेच्या वतीने क्रांतीबा ज्योतीबा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 
        बीड येथील मूप्टा संघटनेच्या वतीने क्रांतीबा ज्योतीबा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  प्रा. पि. टी. चव्हाण यांना घोषित करण्यात आला आहे. संघटनेचे प्रा. प्रदिप रोडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. मागील अनेक वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, संत भगवानबाबा, संत सेवालाल महाराज, संत सावता महाराज, मौलाना अबूल कलाम आझाद, संत नरहरी सोनार, संत सेना महाराज या बहुजन समाजातील महापुरुषांच्या विचाराचा जागर तांडा, वस्ती, वाडी, पालापर्यंत घेऊन जाणारे आणि समाजातील वंचित, शोषित बांधवांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, प्रसंगी रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करणारे भटक्या विमुक्तांचा बुलंद आवाज असणारे प्रा. पि. टी. चव्हाण यांच्या कार्याची दखल घेऊन मुप्टा संघटनेने या पुरस्काराची घोषणा केली. सदरील पुरस्कार वितरण सोहळा बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दि. २७ जानेवारी २०१९ रोजी साहित्य, शैक्षणिक व फुले शाहू आंबेडकर चळवळीतील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
      क्रांतीबा ज्योतीबा राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  प्रा. पि. टी. चव्हाण यांना मिळाल्याबद्दल राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष उद्योगपती किसनभाऊ राठोड, माजी मंत्री मा. शिवाजीराव दादा पंडित, प्राचार्य डॉ. एस. डी. पटेल, राष्टीय प्रवक्ता मा. मधुकर जाठोत, तरूणाच्या गळ्यातील ताईत व यशस्वी युवा उद्योजक अॅड. पंडितभाऊ राठोड, महंत रमेश महाराज, सुनील महाराज, जितेंद्र महाराज, राष्ट्रीय सचिव इंजि.सुभाष राठोड, प्रवक्ता डाॅ.कृष्णा राठोड, राष्ट्रीय संघटक विलासभाऊ राठोड, गोर प्रकाश राठोड, प्रा.खुशाल राठोड, शालिकभाऊ पवार, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत राठोड, उपाध्यक्ष जीवनभाऊ राठोड, बीड जिल्हा अध्यक्ष रमेशभाऊ पवार, प्रा.डाॅ.साहेब राठोड, जेष्ठ विचारवंत डाॅ.अशोक पवार ,पत्रकार सुधीरभाऊ राठोड (मुंबई), विलास पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मा. प्रल्हाद चव्हाण, रविराज राठोड, यशपालभाऊ जाधव, शामभाऊ राठोड, भारतीय बंजारा समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी.जे.राठोड, वसंत राठोड, पी.एम.राठोड, कार्याध्यक्ष अंकुश चव्हाण, बबन राठोड, सर्जेराव जाधव, अण्णासाहेब राठोड, कृष्णा राठोड, गणेश चव्हाण, विनायक चव्हाण व ईतरांनी प्रा.पी.टी.चव्हाण यांना राज्य स्तरीय क्रांतीबा जोतीबा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

।।।
╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

पालम येथे महिला कॉंग्रेस कमिटीच्या संपर्क अभियानाचा कार्यक्रम संपन्न  


अरुणा शर्मा

पालम :- येथे दि. 30 जानेवारी रोजी कॉग्रेस कार्यालयात महिला कॉंग्रेसच्या संपर्क अभियानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
   कार्यक्रमाच्या अध्यक्ष परभणी महिला कॉग्रेस जिल्हाध्यक्षा   जयश्रीताई खोबे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणुन मिडीया जिल्हा प्रमुख जयश्रीताई जाधव, पालम ता. अध्यक्ष गुलाबराव सिरस्कर उपस्थित होते. यावेळी खोबेताई म्हणाल्या कि,सत्ताधारयांनी सर्वांचीच फसवणूक केली असून हे सरकार बदलण्याची गरज असल्याचे सांगीतले. महिलानी जागरूक रहावे व येणाऱ्या निवडनुकित भाजप सरकारला धडा शिकवावा हे सरकार फसवे आसुन फक्त खोटे आश्वाशन देत आहे. या सरकार मुळे सर्वात जास्त महिला त्रस्त आहेत. तसेच नोट बंदीच्या काळात आनेक महिलाची निराशा झाली. व आदी विषया वर हाला चढवला. असे त्या या कार्यक्रमा प्रंसगी म्हणाल्या.  
तसेच या बैठकित पालम महिला शहर आध्यक्ष साकिना शेख यांची निवड करण्यात आली. यावेळी परभणी जिल्हा माहिला कॉग्रेसच्या अध्यक्षा चा व मान्यवराचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालम तालुका अध्यक्षा सौ. अरुणा शर्मा, अहमद भाई, बाळुकाका देशमुख,  रामप्रसाद कदम, साबेर खुरेशी अगबरखाँ पठाण, माधव फाजगे, गोपीनाथ देशमुख, गादगे व असंख्य महिला ऊपस्थित होत्या.

मोप येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना निरोपसमाधान गायकवाड प्रतिनिधी रिसोड /३० जानेवारी
मोप ता.रिसोड येथील श्री.शिवाजी विद्यालय व क. महाविद्यालययातील इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.त्यानिमित्त विद्यालयात २८ जानेवारी रोजी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड.किरणराव सरनाईक तर मार्गदर्शक म्हणुन अकोला येथील उद्योजक हरेषभाई शहा व सुप्रसिध्द वक्ते विनोद बोरे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणुन शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव भिकाजी नागरे,शिवाजी किडस् वाशिमचे अध्यक्ष स्नेहदिपभैया सरनाईक,प्रा.प्रशांत गोळे,शांतीपुरी महाराज,डाॅ.रामेश्वरजी नरवाडे,जुगलकिशोर शर्मा,प्राचार्य डि.एन.अघडते,आदी उपस्थित होते.प्रतिमापुजन व स्वागत समारंभानंतर प्रा.समाधान गायकवाड,श्री.संजय नरवाडे सर,श्री.मुलकारे सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी  सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.वर्ग १२ वीच्या विद्यार्थींनी कु स्वाती मोरे व कु.प्रिती वाठोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात अॅड.सरनाईक यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची वेळ येऊ नये यासाठी वाशिम येथे शिवाजी अॅकॅडमी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती देऊन विद्यार्थांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.उद्योजक शहा यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बळावर आपले कर्तृत्त्व सिध्द करण्याचे आवाहन केले.प्रा.गायकवाड यांनी   संदेशे आते है या गितावर बसविलेले नृत्य शहा यांना खुपच आवडले व भावनिक होऊन मी ही आता असाच मिल्ट्रीचा ट्रेस घेण्याचे कबुल केले.शेवटी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या उद्योगात रोजगार देण्याची हमी  दिली.विनोद बोरे यांनी महापुरुषांच्या जीवनावर कविता सादर केल्या तसेच आपल्या नावाप्रमाणेच विनोद  करुन सभेला खळखळुन हसवले.त्यासाठी त्यांनी प्रा.समाधान गायकवाड व श्री संजय नरवाडे यांच्या नावाचा वापर केला. प्रास्ताविक अध्यक्ष डाॅ.गोपीकिसनजी सिकची व प्राचार्य डि.एन.अघडते सर यांनी केले.सुञसंचालन प्रा.शरद टेमधरे यांनी तर आभारप्रदर्शन श्री.निलेश पुंड सर यांनी केले.कार्यक्रमाला शाळेचे माजी प्राचार्य,कर्मचारी,गाव व परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्ती, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व वर्ग ९ वी व ११ वी च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील किसनराव शेळके यांचे निधनसुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि. ३० __ तालुक्यातील धारवंटा येथील आदर्शदायी व कर्तुत्ववान व्यक्तिमत्व किसनराव सखाराम शेळके यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
     याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व धारवंटा येथील रहिवासी असलेले किसनराव सखाराम शेळके यांचे मंगळवार दिनांक २९ जानेवारी २०१९ रोजी दुपारी दोन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी साडेपाच वाजता सिंदफना नदी लगत असलेल्या त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात अंकुशराव व लहुराव हे दोन मुले तसेच दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
      या अंत्यविधी प्रसंगी प्रकाशराव सुस्कर, राजेंद्र झोडगे, विष्णुपंतराव शिंदे, मुकुंदराव कदम, भुजंगराव काकडे, अंकुशराव लाखे, सरपंच सतीशराव शेळके, विठ्ठलराव शेळके, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलिपराव शिंदे, डॉक्टर लक्ष्मणराव ढाकणे आदींसह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घडलेल्या या दुःखद घटनेनंतर परिसरामध्ये शोककळा पसरली होती. शेळके परिवारावर कोसळलेल्या या दुःखात दैनिक झुंजार नेता परिवार सहभागी आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील किसनराव शेळके यांचे निधनसुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि. ३० __ तालुक्यातील धारवंटा येथील आदर्शदायी व कर्तुत्ववान व्यक्तिमत्व किसनराव सखाराम शेळके यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
     याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व धारवंटा येथील रहिवासी असलेले किसनराव सखाराम शेळके यांचे मंगळवार दिनांक २९ जानेवारी २०१९ रोजी दुपारी दोन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी साडेपाच वाजता सिंदफना नदी लगत असलेल्या त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात अंकुशराव व लहुराव हे दोन मुले तसेच दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
      या अंत्यविधी प्रसंगी प्रकाशराव सुस्कर, राजेंद्र झोडगे, विष्णुपंतराव शिंदे, मुकुंदराव कदम, भुजंगराव काकडे, अंकुशराव लाखे, सरपंच सतीशराव शेळके, विठ्ठलराव शेळके, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलिपराव शिंदे, डॉक्टर लक्ष्मणराव ढाकणे आदींसह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घडलेल्या या दुःखद घटनेनंतर परिसरामध्ये शोककळा पसरली होती. शेळके परिवारावर कोसळलेल्या या दुःखात दैनिक झुंजार नेता परिवार सहभागी आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

पालम तालुक्यातील 65 गाव पाणीपुरवठा योजनेचा - भव्य उद्घाटन शुभारंभ
आरूणा शर्मा


पालम :- पालम तालुक्यातील 65 गाव ग्रीड पाणीपरवठा योजनेचा भव्य उद्घाटन दि. 31 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. लिंबोटी धरणातून पालम तालुक्यातील 65 गावांना शुद्ध पाणीपुरवठा करणार आहे. तसेच या पाणीपुरवठा योजनेद्वारे तालुक्यातील सर्व जनतेस फिल्टरचे शुद्ध पाणी मिळणार आहे. यामुळे तालुक्यातील गंभीर पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. तसेच रोगराई पासून तालुका मुक्त होईल. व आपल्याला चांगले आरोग्य लाभेल. हि योजना मा.श्री. गणेशराव रोकडे दादा यांच्या अथक परिश्रमातून व
मा.ना. बबनरावजी लोणीकर साहेब यांनी जि.प.निवडणूक चाटोरी येथे दिलेल्या आश्वासनाची  पूर्तता करण्यात येत आहे. 
   कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब (मंत्री अर्थ, नियोजन व वनमंत्री महाराष्ट्र राज्य) उपस्थित राहणार आहे. व उदघाटक बबनरावजी लोणीकर साहेब (मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता तथा संपर्कमंत्री परभणी जिल्हा) तर प्रमुख पाहुणे मा.आ. मोहनभाऊ फड (पाथरी विधानसभा), मा.आ. विजयरावजी गव्हाणे (मा.आमदार परभणी), मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर (मा.आमदार जिंतूर), मा.प्रा. भाई ज्ञानोबाजी मुंढे (प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा भाजपा), मा. अभय चाटे (जिल्हाध्यक्ष भाजपा परभणी), मा. राहुल भैय्या लोणीकर (उपाध्यक्ष जि.प.जालना), मा. मेघनादिदी बोर्डीकर (मा.जि.प.सदस्या), मा. आनंतरावजी भरोसे (जिल्हाध्यक्ष, परभणी भाजपा महानगर), मा. रामप्रभुजी मुंढे (विधानसभा प्रमुख गंगाखेड भाजपा), मा.शामसुंदरजी मुंढे (मा.जिल्हाध्यक्ष, भाजपा), मा. श्रीनिवास मुंढे (सभापती कृषि, पशुसवर्धन जि.प.परभणी), मा. विठ्ठलरावजी रबदडे मामा (प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा), मा. बालाजीराव देसाई ( प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा), मा. अॅड.व्यंकटराव तादंळे (प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा), मा.डॉ. सुभाष कदम (जि.प.सदस्य,परभणी), मा. विशाखा विश्वनाथ सोळंके (जि.प.सदस्य,परभणी), मा.राजेश देशमुख (जि.प.सदस्य,परभणी), मा. लिंबाजीराव भोसले (कार्य.सदस्य वनामकृवी, परभणी), मा. रामकिशनजी रोदंळे (प्रदेश सरचिटणीस भ.वि.आ.भाजपा), मा.बाबासाहेब जामगे (जि.सरचिटणीस भाजपा परभणी), मा. बाबासाहेब फले (जि.सरचिटणीस भाजपा परभणी), मा. शशिकांत देशपांडे (जि.सरचिटणीस भाजपा परभणी), मा. संजय साडेगांवकर (जि.सरचिटणीस भाजपा परभणी), मा. सुरेशरावजी भूमरे (जि.उपाध्यक्ष भाजपा परभणी), मा.एस.एस. इनामदार (जि.उपाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा भाजपा परभणी), मा.बाबा पठाण (जि.अध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा भाजपा परभणी), आदि उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील 65 गावे ग्रीड पाणी पुरवठा योजना मध्ये पेठपिंपळगाव, तांबुळ्गांव, मुदखेड, सिपेगाव, पुयणी, खोरस, उमरां, वरखेड, सायळा, खड़ी, तेलजापूर, वनभुजवाडी, गणेशवाडी, आडगांव, कापसी, सिरपुर, पेठशिवणी, शेखराजूर, केरवाडी, वाडी (बु.), वाडी (खु.), खरबधानोरा, सरफराजपूर, वानवाडी, सेलू, पेंडु (बु.), पेंडु (खु.), केजगीरवाडी, सादलापूर, मानगीरवाडी, पारवा, सातेगांव, कोळवाडी, चाटोरी, आनंदवाडी, नाव्हा तांडा, कांदलगांव, कोनेरवाडी, बंदरवाडी, बोरगांव खु., बोरगांव बु., उक्कडगांव, सिरसम, पोखर्णी देवी, तांदुळवाडी, महादेववाडी, जोगलगांव, मार्तंडवाडी, लांडकवाडी, सादगीरवाडी, भालकुडकी, नाव्हलगांव, राणीसावरगांव, बनवस, रामापुर तांडा रामापुर, गिरधरवाडी, लोभानाईक तांडा, संभाजीनगर, तावजीवाडी, फत्तुनाईक तांडा, फुटाळा, मोजमाबाद, मोजमाबाद तांडा, चोरवड  या गावांचे नांवे समाविष्ट केले आहे. या कार्यक्रमास पालम तालुक्यातील सर्व जनतेने व सर्व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनी उपस्थित रहावे असे मा. गणेशराव रोकडे (दादा) प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा संचालक जि.म.सह.बँक परभणी, मा. अण्णासाहेब किरडे पं.स. सदस्य पालम, मा. माधवराव गिनगिणे पं.स. सदस्य पालम, भागवत बाजगीर भाजपा तालुकाध्यक्ष पालम यांनी आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचे स्थळ पालम तहसिल कार्यालया समोर ठेवन्यात आले आहे.

घाटकोपर पश्चिम राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वाहण्यात आली श्रद्धांजलीबाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई :दि.३०अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा  गांधींच्या 71व्या  पुण्यतिथी निमित्त घाटकोपर पश्चिम राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना राष्ट्रवादी काँगेस पार्टी कार्यालय , चिरागनगर, घाटकोपर पश्चिम, येथे सकाळी ११ वाजून ०२ मिनिटांनी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली 
गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या  बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली.
या कार्यक्रमाला घाटकोपर पश्चिम तालुक्यातील नेते मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार ,राष्ट्रीय सचिव सालिंम पठाण, तालुका अध्यक्ष सुरेश भालेराव ,वसिंम  खान , बलराज तालापली , हुसेन शेख ,रौफ मोगे ,वार्ड अध्यक्ष आसिफ शेख, शंकर महाडिक, राजेंद्र केदारे, संतोष पोळ, सचिन गुप्ता, तालुका उपाध्यक्ष सुनील चव्हाण, विरेंद्र सहानी, राजेंद्र शिनलकर, वाशीम शेख, सय्यद कादर,रमझान खान, भीमन्ना मेटी  , व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वाग्देव माझा वाठारचा राजा या ग्रुप तर्फे श्री समर्थ वाग्देव महाराज यात्रा काळात कुस्त्यांचे फड व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


मुंबई प्रतिनिधी 
मुंबई: श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांची पुण्यतिथी व रथ उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. श्री समर्थ वाग्देव महाराजांचा रथोत्सव हा पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा यात्रा उत्सव असतो. यात्रेच्या दरम्यान भाविकांच्या मनोरंजनासाठी वाठार स्टेशन येथील वाग्देव माझा वाठार चा राजा या ग्रुप ने यावर्षी कुस्त्यांचे जंगी मैदान भरवले होते. 
    कुस्तीच्या आखाड्यात एकूण ५१ कुस्त्या झाल्या. हे सर्व पैलवान बाहेरच्या गावातील होते, कुस्त्या ५० रुपये ते ५०००/ रुपयापर्यंत लावल्या गेल्या. शेवटची कुस्ती ५०००/ रुपयाची लावली गेली. सदरची कुस्ती वाठार स्टेशन येथील श्री. समर्थ वाग्देव महाराजांचे पाचव्या पिढीतील वंशज पैलवान श्री विठ्ठल करे यांनी जिंकली. त्यांना रोख रक्कम ५०००/ रुपये व ढाल बक्षीस त्यांच्या वस्ताद यांच्या हस्ते देण्यात आली.
 तसेच मंगळवार दिनांक २२ जानेवारी रोजी संध्याकाळी १०.वाजता गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन वाठार स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक श्री मारुती खेडकर साहेब व स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री दिगंबरशेठ आगवणे यांनी केले.
    वाग्देव माझा वाठार चा राजा या ग्रुपने आयोजित केलेल्या भंडारा उधळला वाग्देवांचा हा कार्यक्रम प्रेक्षकांना विशेष आकर्षणाचा ठरला. आणि विशेषतः ब्रह्मवाणी वाग्देवांची या चित्रपटातील स्थानिक कलाकारांनी सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच या कार्यक्रमास ५ ते ६ हजार रसिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती, सदरचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी श्री.डॉ. शिवाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाग्देव माझा वाठार चा राजा या ग्रुप मधील युवा नेते  अशोक माने,भगवान चव्हाण (भैय्यासाहेब) , राहुल तांबे  श्री चंद्रकांत बरकडे सर, सागर करे, यांनी भरपूर प्रयत्न केले, या कार्यक्रमास वाठार पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

विद्यार्थ्यांच्या ध्येयासाठी केंब्रिज स्कूलची झेप - सुभाष मुळे

गेवराई, दि. ३० ( प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोणातून आटोकाट प्रयत्न करणारे डॉ. श्री व सौ मोटे यांच्या प्रयत्नातून गेवराई येथे सुरू झालेली केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी शाळा ध्येयाच्या दिशेने झेपावत असल्याचे लक्षात येते असे प्रतिपादन पत्रकार सुभाष मुळे यांनी केले.
        गेवराई येथील गोदावरी स्पन पाईप फॅक्टरी समोर द केंब्रिज व्हँली इंटरनॅशनल गणराज्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पत्रकार सुभाष मुळे हे बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे विक्रमराव गंगाधर, संजय नाना चाळक, भैय्यासाहेब खरात, सुरेंद्र रुकर, प्रहार संघटनेचे सुनील ठोसर तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य फुलचंद बोरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. पुढे बोलताना सुभाष मुळे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांना यश गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यशासाठी धडपडणार्‍या या चिमुकल्या विद्यार्थ्यां करिता केम्ब्रीज शाळेने पुढाकार घेतला ही अभिमानास्पद बाब लक्षात येते. डॉ. बी. आर. मोटे व त्यांच्या पत्नी डॉ. सौ. मोटे यांच्या प्रयत्नातून द केम्बरीज व्हँली इंटरनॅशनल स्कूलने अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थी देखील या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकले. तांडा, वस्ती आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून उचललेले पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. प्रत्येकाने अडचणीवर मात करत पर्याय निवडला पाहिजे आणि जो पर्याय निवडतो तो हमखास यश प्राप्त करतो असे प्रतिपादन सुभाष मुळे यांनी एका बोधकथेच्या माध्यमातून सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य फुलचंद बोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदित्य जोशी यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. सय्यद सर यांनी केले. या कार्यक्रमास भागातील नागरिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   ▌