तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 January 2019

जिल्ह्यातील सर्व गावांना 10 रुपयात एक हजार लिटर फिल्टर चे पाणी देऊ बबनराव लोणीकर

अरुणा शर्मा


पालम :- केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून जिल्ह्यात प्रत्येक गावात फिल्टरचे पाणी देण्यासाठी लागेल तेवढा निधी आणून जिल्ह्यातील सर्व गावांना 10 रुपयात एक हजार लिटर फिल्टर चे पाणी देऊ यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पालम येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी 65 गाव पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. व्यासपीठावर जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, माजी आमदार विजय गव्हाणे, राहुल भैया लोणीकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे, मेघनादीदी बोर्डीकर, रामप्रभू मुंढे, शामसुंदर मुंडे, विठ्ठलराव रबदडे, अँड.व्यंकटराव तांदळे ,डॉक्टर सुभाष कदम, बाबासाहेब फले, सुरेश भुमरे, सूर्यकांत कुलकर्णी, भागवत, लक्ष्मणराव रोकडे, राजश्री जामगे, संगीताताई जामगे, रामकिसन रौंदळे, लिंबांअना भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना बबणराव लोणीकर म्हणाले की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने राज्यातील आठ हजार गावच्या पाणीपुरवठा योजना अपूर्ण ठेवल्या होत्या. त्या योजना आमच्या सरकारने सहा हजार कोटी रुपये खर्च करून पूर्ण केल्या आहेत. मागील सरकारने सिंचनावर 70 हजार रुपये कोटी रुपये खर्च करूनही पिण्याचे पाणी सरकार देऊ शकले नाही. तसेच राज्यावर पाच लाख 52 हजार कोटीचे कर्ज करून ठेवले होते. परंतु सर्व गोष्टीवर मात करीत राज्य सरकारने पिण्याच्या पाण्यासाठी सर्व पाणीपुरवठा योजना पूर्ण केल्या आहेत.मागील चार वर्षापासून सतत दुष्काळ पडत आहे परंतु सरकार संपूर्णपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे असून संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. असे सांगून दुष्काळाची मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी केले.त्यांनी तालुक्यातील विविध प्रश्न मांडून तात्काळ तालुक्याच्या विकासासाठी मदत करण्याचे आव्हान केले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर, माजी आमदार विजय गव्हाणे, राहुल भैया लोणीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चाटोरी येथे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 65 गाव पाणीपुरवठा योजनेच्या कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पालम नगरपंचायत च्या तीन कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे मंत्रीमहोदयांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगर पं.चे उपाघ्यक्ष बालासाहेब रोकडे तालुका अध्यक्ष भागवत बारगीर, तुकाराम पाटील, लक्ष्मणराव रोकडे, डॉक्टर शेख बडेसाब, शिवाजीराव दीवटे, डॉ. रामराव ऊंदरे, दत्तराव घोरपडे, गणेश घोरपडे, पदुदेवा जोशी, सोपान कराळे, अण्णासाहेब किरडे, विनोद किरडे, गजानंद राेकडे, चंद्रकांत गायकवाड, ताराबाई कराळे, सुनिल छाजेड, विलास जोंधळे, वामन बरडे, जळबाजी फुले, प्रल्हाद कराळे, सुनील भैया दुधाटे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a comment