तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 January 2019

परळीत ५ कोटी रू. खर्चून होणाऱ्या 26 अंतर्गत रस्ते कामांचा पालकमंत्री ना.पंकजाताईच्यां हस्ते दि.4 जानेवारीला


शुभारंभ.
141कांमासाठी 20कोटी मंजुर तर अधिकचे मिळणार 10कोटी.

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)  पांच कोटी रूपये खर्च करून शहरातील विविध वाॅर्डात    चकाचक होत असलेल्या अंतर्गत 26 सिमेंट क्राकींट रस्त्याच्यां कामाचा शुभारंभ  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ४ जानेवारी शुक्रवार रोजी  होणार आहे.

     शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी नगरविकास विभागाकडून विशेष रस्ता अनुदान अंतर्गत पांच कोटी रूपयांचा निधी कांही दिवसांपूर्वी मंजूर करून घेतला होता. या निधीतून विविध वाॅर्डात सिमेंट रस्त्याची चांगली26 कामे होणार आहेत. येत्या शुक्रवारी दुपारी ४ वा. मोंढा विभागात होणा-या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. आर. टी. देशमुख,  आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, ज्येष्ठ नेते रमेश आडसकर उपस्थित राहणार आहेत.

    कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकसेठ सामत, फुलचंद कराड, दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, विनोद सामत,  नामदेवराव आघाव, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, डाॅ. शालिनी कराड,  शांतीलाल जैन, अरूण टाक, वृक्षराज निर्मळ, सुधाकर पौळ, सुरेश माने, श्रीराम मुंडे, वैजनाथ जगतकर, धम्मानंद मुंडे, शेख अब्दुल करीम, वहाजुद्दीन मुल्ला, केशव माळी, रमेश गायकवाड, राजाभाऊ दहिवाळ, विजय वाकेकर, सचिन कागदे, नारायण सातपुते, डाॅ. राजाराम मुंडे, माधवराव मुंडे, सुरेखा मेनकुदळे, उमाताई समशेट्टे, भारती कुलकर्णी, रमेश कराड, सुनील फड, पवन मुंडे,  दत्तात्रय देशमुख, दासू वाघमारे, प्रकाश जोशी, अनिल तांदळे, महेश्वर निर्मळे, संदीप लाहोटी, वैजनाथ ताटीपामल, उमेश खाडे, योगेश मेनकुदळे, मोहन जोशी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

              
                    चौकट
शहरात होणारी 26रस्त्याची कामे व त्यावरील होणारा खर्च.
1)ताजोद्दीन यांचे घर ते बशीर यांच्या घरापर्यंत खुदबेनगर(15लाख) 2)सावता माळी मंदिर ते गोविंदराव लोखंडे यांचे घरा पर्यंत(15लाख) 3) चंद्रकांत कुळकर्णी यांचे घर ते शाम सातपुते यांचे घरापर्यंत (18लाख) 4)गणेश मंदिर ते काळरात्री मंदिर पर्यंत(22लाख) 5) बाबुराव शिंदे यांचे घर ते संत नरहरी मंदिर पर्यंत(8लाख)6)यादीया हाऊस ते पदमावती हनुमान मंदिर पर्यंत(9लाख)
7)भातांर्बेकरसर यांचे घर ते हांगेसर यांच्या घरा पर्यंत(8लाख) 8)राठोड मेडीकल ते बशीर हाँटेल पर्यंत(22लाख)
9)आझादनगर मस्जीद समोरील रस्ता (16लाख) 10)पदमावती हाँटेल ते जगताप मेडीकल पर्यंत(8लाख)11)जगताप मेडीकल ते नगर पालिका वाचनालया पर्यंत(11लाख
12)औद्योगिक विकास केद्रं संरक्षण भिंती मागे (भाग 1)लोढा यांचे घर ते थोरात यांचे घर ते माणिकनगर सा.बा.रस्ता इनामदार यांच्या घरा पर्यंत
(12लाख) 13)औद्योगिक विकास केद्रं संरक्षण भिंती मागे (भाग2) माणिकनगर मध्ये राठोड यांचे घर ते क्षीरसागर यांचे घर ते पाण्याची टाकी ते नाल्यापर्यंत(12लाख)14)कन्या शाळा ते
किर्तीनगर पर्यंत(23लाख)15) संत श्री भगवानबाबा मंदिर समोरील रस्ता (20लाख)16)वल्लभनगर भाग 1 (22लाख) 17) वल्लभनगर भाग 2 (16लाख)18)नरवाडे यांचे घर ते मिरा कुळकर्णी यांच्या घरापर्यंत(30लाख)
19)शिवाजी शिरसाठ यांचे घर ते झुंजे पाटील यांचे घरापर्यंत(20लाख)
20)ओझा यांचे घर ते वैद्यनाथ बँकेपर्यंत(10लाख)21)गुरूनानक आँटोमोबाईल समोरील रस्ता(10लाख)
22)महर्षी कनाद विद्यालय समोरील रस्ता (13लाख) 23)नांदुरवेस ते उखळवेस भाग 1(15लाख) 24) नांदुरवेस ते उखळवेस भाग 2 (23लाख)
25)आयुष काँलनी मस्जीद ते हुसैनभाई यांचे घरापर्यंत(9लाख) 26)काळरात्री मंदिर समोरील रस्ता (20लाख) अशी सिमेंट क्राकींट रस्त्यांची कामे होणार असुन सदर कामाचे टेडंर,परभणी येथील त्रिपाठी कन्ट्रँक्शनला मिळालेले असुन सदर काम हे सा.बा.विभागाच्या देखरेखी खाली होणार आहे.

No comments:

Post a comment