तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 January 2019

पालम तालुक्यातील जांभूळ बेटावर पूर्णा तालुक्यातील लोकप्रतिनिधीचा डोळा विभागीय आयुक्तांची दिशाभूल

करण्याचा प्रयत्न  राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

अरुणा शर्मा

पालम :- पालम शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमेश्वर येथील गोदावरी पात्रात असलेले व पालम तालुक्याचे निसर्गरम्य जांभूळ बेट पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी महसूल विभागाकडून पाहणी करण्यात आली. असून पूर्णा तालुक्यातील काही लोकप्रतिनिधीकडून जांभुळबेट पूर्णा तालुक्यात असल्याचा जावईशोध लावून महसूल विभागाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जांबुबेट हे आमच्या पालम महसूल विभागाच्या हक्काचे असून हक्काबाबत काही फेरबदल केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतराव सिरस्कर यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना तहसीलदार पालम यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. तालुक्यातील सोमेश्वर येथे गोदावरीच्या मध्यभागात जांभूळ बेट असून या दोन्ही बाजूने पाणी वाहत आहे. पावसाळयाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे बेटांचे मोठे नुकसान झाले असून बेटाच्या तटबंदी साठी शासनाकडून किती खर्च लागेल यासाठी अनेक वेळा वरिष्ठ अधिकार्‍याकडून पाहणी करण्यात आली. जांभूळ बेट वर अनेक फळांचे व वन औषदीची झाडे असून त्या बेटावर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर राहत आहेत. शासनाकडून जांभूळ बेटाच्या विकासासाठी मोठा निधी मिळणार आहे. जांभूळ बेटावर विविध विकास कामे करण्यासाठी महसूल विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. यामुळे या बेटावर पूर्णा तालुक्यातील काही नागरिकांचा डोळा असून आपल्या तालुक्यात जांभुळबेट असल्याचा कांगावा चालू केला आहे. तसेच जाभुंळबेट पुर्णा महसुल मध्ये नोंदवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आज पर्यंत जो काही निधी मिळाला आहे. तो निधी पालम तालुक्याच्या नावावर मिळाला आहे. त्यामुळे निसर्गरम्य जांभुळबेट हे पालम तालुक्यातील महसूल विभागाच्या हक्काचे असून त्याबाबत फेरबदल करू नये तसे प्रयत्न झाल्यास पालम तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व सर्व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा ईशाराचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतराव सिरस्कर, उपसभापती रत्नाकरराव शिंदे, जि.प. सदस्य शकंरराव वाघमारे, कादरभाई गुळखंडकर, अर्जुन ढवळे, केशवराव कराळे, मारोतराव कराळे, जिया पठाण, भैया सिरस्कर, अतुल सिरस्कर, ज्ञानोबा घोरपडे, शहाबुद्दीन चेंडवल, सदानंद हतीअबिंरे, संजय शेळके, आदींनी दिला आहे.

No comments:

Post a comment