तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 January 2019

संत गुलाबबाबा विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी 


संग्रामपुर [ प्रतिनिधी ]येथील संत गुलाबबाबा विद्यालय व ज्युनियर आर्ट कॉलेज मध्ये विविध उपक्रम राबवून दि ३जानेवारी रोजी सावित्री बाई फुले यांची जयंती" बालिका दिन" म्हणून  साजरा करण्यात आला
या वेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक थोटांगे तर संस्थेचे अध्यक्ष पुंडलीकराव रहाटे,नगरसेवक आनंद राजनकार,शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक अनंत वानखडे आदींची प्रमुख उपस्तिती होती            
 प्रथमतशाळेतील लहान मुलींचे हस्ते सावित्री बाईचे प्रतिमे समोर  दीप प्रज्ज्वलन करण्यात येऊन हारार्पण करण्यात आले
या निमित्त शाळे मध्ये निबंध स्पर्धा,वादविवाद स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,बेटी बचाव बेटी पढाव,भ्रूण हत्या आदी विषयावर चर्चा सत्र व फुले दाम्पत्य या विषयावर कथा कथन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले या उपक्रमांमध्ये शाळेतील बहुसंख्य विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर सावित्री बाई च्या जीवन चारित्र्यावर उपस्तीत सर्व वक्त्यांनी प्रकाश टाकून त्याची जीवन गाथा अधोरेखित केली  स्पर्धे मध्ये विजयी ठरलेल्या विध्यर्थ्यना संध्याकाळी समारोपीय कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले 
कार्यक्रमाचे प्रस्ताविकातून क्रीडा शिक्षक सुधीर मानकर यांनी सावित्रीबाई चे जीवनकार्य थोडक्यात सांगितले
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन इयत्ता ९वी मधील श्वेता संतोष वानखडे या विद्यार्थिनीने केले तर या वेळी आशिष चरखे,गो.पु.रहाटे,प्रल्हाद हागे ,लक्ष्मण लोमटे,संदीप राऊत,विजय राजनकार,सदाशिव घुगे,दीपक सदाफळे,शांतशील दामोदर,एकनाथ पाचमासे,अनिल ढोकणे, कु दीपा तायडे,सौ संजीवनी वानखडे, कु रश्मी गावंडे,समाधान उगळकार,मंगेश उमरकर,आदी शिक्षकां सह लिपिक दिनकर वानखेडे,प्रदीप उमाळे  गजानन दाते,कैलास बढे या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले
राष्ट्रवंदना गायना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

No comments:

Post a Comment