तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 January 2019

दुष्काळी पाथरी तालुक्यातीलच उसतोड करा;एक रकमी एफआरपी सह ऊस बीलद्या;भाकपा करणार तहसिल समोर धरणे आंदोलन

किरण घुंबरे पाटील
पाथरी:- शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहिर केलेला आहे. त्या मुळे उस उत्पादकांना रेणूका साखर कारखाण्याने एक रकमी एफआरपी सह बिल द्यावे आणि तालुक्यातीलच शेतक-यांचा उस तोडावा या सह इतर मागण्यां साठी 7 जानेवारी पासून भाकपा च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन येथील पाथरी  तहसील कार्यालया  समोर करणार असल्याचे निवेदन रेणूका शुगर्सच्या कार्यकारी संचालकांना दिले आहे.
ऊस  बिल  एक  रक्कमी एफआरपी नुसार तात्काळ  देण्यात  यावे व  फूले  0265  ला  14  महीने  प्रमाणे  प्रोग्राम  नुसार  तोडीची  परवानगी देण्यात  यावी,  पाथरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उस शिल्लक असतांना रेणुका शुगर्स माजलगाव तालुक्यातून उस आणून गाळप करत आहे. ही गंभिर बाब असून हे कदापी सहन केले जाणार नाही असे या निवेदनात म्हटले आहे. त्याच प्रमाणे प्रोग्राम प्रमाणे उस तोडला जात नाही असे ही या निवेदनात म्हटले आहे.या अशा प्रकारा मुळे हे धरने आंदोलन करण्यात येणार असून या मुळे जर प्रश्न मार्गी लागला नाही तर रास्ता रोको,पाथरी बंद, कारखाना गेट क्र 1 बंद अशी विविध आंदोलने करण्यात येतील .या मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कारखाना प्रशासन जबाबदार राहिल. असे या निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात उस उत्पादक शेतक-यांनी मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन कॉ न्यानेश्वर काळे, कॉ नवनाथ कोल्हे, कॉ बालासाहेब हारकाळ, कॉ श्रीनिवास वाकणकर, कॉ कालिदास कोल्हे, कॉ कल्याण आम्ले आदींनी केले आहे.

No comments:

Post a comment