तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 January 2019

वेळ अमावस्येचा हाकार्‍यामाळ येथे आज यात्रोत्सव केदारीमहाराज तपस्थळीवर लोटणार भाविकांची गर्दी


परळी वैजनाथ/प्रतिनिधी
    परळी पंचक्रोशीतील वारकरी परंपरेचे प्रासारक व याभागातील गुरुस्थानी असलेले श्री संत केदारी महाराज यांच्या पावनस्पर्शाने पुणीत झालेल्या व केदारी महाराज यांचे तपसथळ म्हणुन प्रसिध्द असलेल्या वैजवाडी जवळील हाकार्‍या पुकार्‍या माळ येथील पारंपारिक वेळ अमावस्येचा यात्रोत्सव आज दि.05 जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्ताने केदारी महाराज तपस्थळ समाधीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातुन मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होणार आहे.
    परळी पासुन जवळच असलेल्या वैजवाडी येथील हाकार्‍या पुकार्‍या माळ येथे गेल्या अनेक वर्षापासुन दर वेळ अमावस्येला मोठी यात्रा भरते. हे ठिकाण श्री संत केदारी महाराज यांचे तपस्थळ म्हणुन ओळखले जाते. या यात्रेच्या निमित्ताने येथे अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन महोत्सव सुरु आहे. या सप्ताहाची सांगता या यात्रेने होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभुमीवर श्री क्षेत्र उखळी (बु) येथुन श्री संत केदारी महाराज पालखी सोहळा हाकार्‍या माळावर टाळमृदंगाच्या घोषात येणार आहे. या यात्रेदिवशी मोठ्या प्रमाणावर पंचक्र्रोशीतील भाविक दाखल होतात. भाविकांच्या अतिशय श्रध्देचे हे ठिकाण असुन अनेक जण याठिाकणी नवस बोलतात यात्रेदिवशी  मनोकामना पुर्ण झालेले भाविक नवस फेडतात. नवसाची मुले शिखरावरुन झोळीत टाकण्याची याठिकाणी गेल्या अनेक वर्षाच्या परंपरा दिसुन येते.
    या यात्रोत्सव व सप्ताह काळात भाविकांच्या वतीने गावकरी, वैजवाडी केदारेश्वर मित्र मंडळ वैजवाडी यांच्या वतीने सोय करण्यात येते.

काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता
    दरम्यान गेल्या सात दिवसापासुन सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सांगता ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment