तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 January 2019

गेवराई शहरात दर्पण दिनाचे आयोजन

सुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि. ४ (वार्ताहर) प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी गेवराई तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात दर्पणदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन गेवराई तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
     दर्पणकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवार दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन येथे दर्पण दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आ.लक्ष्मणराव पवार, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आ.अमरसिह पंडित, सभापती अजस्मिता पंडित, पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, तहसिलदार सखाराम मंडावगडे, नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव नागरिकांनी उपस्थिती रहावे असे आवाहन गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, उपाध्यक्ष संतोष भोसले, दिनकर शिंदे, सचिव सुभाष मुळे, सहसचिव प्रा.राजेंद्र बरकसे, सदस्य अय्युब बागवान, गणेश क्षीरसागर, सुभाष सुतार, सखाराम शिंदे, भागवत जाधव, जुनेद बागवान, वैजीनाथ जाधव, सय्यद सिराज, प्रसाद कुलकर्णी, शेख ईर्शाद, अनंत कलाल, भास्कर सोळंके, सतिष शिंदे, दत्ता वाघमारे, लक्ष्मण राऊत, अलताफ कुरेशी, अजहर ईनामदार, लक्ष्मण आहेर, भरत खरात, गोपाल चव्हाण, मनोज आहेर, धंनजय बजगुडे, रामकिसन तळेकर, विजय नाटकर आंदीने केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment