तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 January 2019

मोप येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा वनपरिक्षेञ येथे अभ्यास दौरा


५/जानेवारी
समाधान गायकवाड प्रतिनिधी
मोप ता.रिसोड

श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मोप येथील वर्ग ११ वी व वर्ग १२ वी कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना शनिवार ५ जानेवारी रोजी मोहजाबंदी वनपरिक्षेञ येथे एक दिवसीय अभ्यास दौर्‍यासाठी रवाना करण्यात आले.
                   यावेळी अभ्यास दौर्‍याला जाणार्‍या विद्यार्थीं व प्राध्यापक यांना रवाना करण्यासाठी व शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्व.आप्पासाहेब सरनाईक यांच्या जल्मोत्सवाचे औचित्य साधुन त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन निसर्गअभ्यासासाठी जाणार्‍या गाड्यांचे प्रवास सुखरुप होण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री डि.एन.अघडते सर नारळ फोडुन प्रार्थना केली.
            प्राध्यापक व विद्यार्थी यांचा अभ्यास दौरा यशस्वी होण्यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष डाॅ.गोपीकिसन सिकची साहेबयांनी तसेच शाळेचे प्राचार्य अघडते सर,पर्यवेक्षक एस.एस.जाधव सर यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
              अभ्यास दौर्‍यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.एस.के.टेमधरे सर,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.एस.पी.गायकवाड व प्रा.एस.एस.मोरे यांनी नियोजन केले.आपल्या ११ वी व १२ वी कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमाचाच एक भाग 'प्रकल्प' यासाठीच त्यांना मदत व्हावी प्रकल्प लिखाणाचे काम सोपे व यशस्वी होऊन त्यांना प्रत्यक्ष अनुभव यावा याच हेतुने एक दिवसाची मोहजाबंदी वनपरिक्षेञ येथे क्षेञभेटीचे नियोजन श्री.शिवाजी कनिष्ट महाविद्यालय मोपच्या वतीने करण्यात आले होते.  एक दिवसीय क्षेञभेट यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा.एस.के टेमधरे सर पर्यवेक्षक,प्रा.जे.बी.आदमने मॅडम,प्रा.एस.पी.गायकवाड,प्रा.
आर.एन.टाक,प्रा.व्हि.एन.सोनुने,प्रा.एस.एस.मोरे,प्रा.एस.पी.देवकर मॅडम व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment