तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 January 2019

ना.धनंजय मुंडे आज वडवणीत स्वाती राठोड कुटुंबियांची घेणार भेट


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.31..............विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे हे उद्या शुक्रवार दि.1 फेब्रुवारी रोजी वडवणी येथे भेट देणार असुन रोड रोमियोच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केलेल्या स्वाती राठोड कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. 

सकाळी 8 वाजता श्री.मुंडे व माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके हे वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांड्यावर जाणार आहेत. येथील स्वाती गोविंद राठोड या शाळकरी मुलीने रोड रोमियोच्या त्रालासा कंटाळुन नुकतीच आत्महत्या केलेली होती. श्री. मुंडे व सोळंके हे तिच्या कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन करणार आहेत.

 स्वाती राठोड हिच्या मृत्युच्या घटनेमुळे वडवणीतच नव्हे तर संपुर्ण बीड जिल्ह्यात व बंजारा समाजात तिव्र संतापाची लाट ऊसळली आहे. मागील काही दिवसात बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ठासळली असुन बीड मध्ये महाविद्यालयाच्या समोर झालेली हत्या, अंबाजोगाई येथील खुन आणि त्या पाठोपाठील वडवणीतील घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ठासळल्याचे स्पष्ट दिसत आहे. या पार्श्वभुमीवर मुंडे यांच्या या दौर्‍याला महत्व प्राप्त झाले असुन, ते या प्रकरणी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले  आहे.

No comments:

Post a comment