तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 January 2019

खान अब्दूल गफार खान विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती ऊत्साहात

प्रतिनिधी
पाथरी:-महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी संचलित भारतरत्न खान अब्दुल गफार खान मराठी माध्यमिक विद्यालय हुले  नगर ,पाथरी येथे आज 03 जानेवारी. रोजी क्रांतीज्योती, थोर समाज सुधारक आदर्श शिक्षिका,विद्येची देवता, स्त्री शिक्षण ना ची जननी, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळी विद्याथ्यांची , शिक्षकांची उपस्थिती होती. या वेळी  कु. गिता डुकरे, कु.गिता गोंगे, कु. विद्या वाकडे  अनेक विद्यार्थीनीनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक गणेश पितळे सर ,पोपळघट सर, कोकड मॅडम, बनकर सर, झाडे सर, वैद्य सर, मोरे सर, चिद्रवार मॅडम, उपस्थित होते.

स्व नितिन महाविद्यालयात अभिवादन
विद्येची देवता मानल्या जाणा-या सावित्री माईंना जयंती दिनी स्व नितिन महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख पाहुने म्हणून प्रा डॉ सौ गायकवाड उप प्राचार्या प्रा अर्चना बदने यांची उपस्थिती होती या वेळी सावित्री माईंच्या कार्यावर प्रा डॉ जगन्नाथ बोचरे यांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमा साठी महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment