तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 January 2019

सर्व शिक्षण सेवामंचचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर


परभणी : प्रतिनिधी
   येथील सामाजिक,सांस्कृतीक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व शिक्षण सेवा मंचच्या वर्धापन दिनानिमीत्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाºयांना त्यांच्या कार्याची दखल घेत जीवन गौरव पुरस्कार ०५ जानेवारी शनिवार सायं. ७ .०० वा. बी.रघूनाथ सभागृह येथे प्रदान करण्यात येणार आहे.
    यावेळी संस्थेच्या वतीने पालमच्या नगराध्यक्षा सौ.अनिता हत्तीअंबीरे, जिजाऊ ज्ञानतीर्थचे नितीन लोहट, मनपा सदस्य गुलमीर खान, सिने फाईट निर्माते रशीद मास्टर यांचा नागरी सत्त्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
    या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी डॉ.शोभा काबरा (वैद्यकीय क्षेत्र) डॉ. धर्मराज चव्हाण,ब्रम्हराज एस.टी. (शैक्षणिक क्षेत्र) मोहम्मद फारूख कादरी ,डॉ. सुरेश देशमाने, सय्यद अनवर, अन्सारी जावेद अहेमद, डॉ.खाजा खान, सुभाष पांचाळ, विठ्ठल रणबावरे, शेख निसार अहेमद पेंटर, रिझवाना परवीन, शेख गौस, आदर्श रोहीदास नाटकर, अखलाख काजी, हे ठरले आहे.
    सदरील कार्यक्रमात माजीराज्यमंत्री फौजीया खान, महापौर मिना वरपूडकर, नगराध्यक्षा अनिता हत्तीअंबीरे, नितीन लोहट,मोहम्मद गौस (झैन), इंजी.आर.डी.मगर, गुलमीर खान, डॉ. समीउल्लाखान, अ‍ॅड. इम्तीयाज खान, सत्तार इनामदार, डॉ. सुरेश देशमाने, मनसुर खान, बशीर अहेमद, हफीजउर रहेमान आदी उपस्थित राहणार आहेत.  सदरील कार्यक्रमास परभणीतील सर्व नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महेमुद खान,सचिव सय्यद अयुब, प्रा.अरुण पडघन,मधुकर उमरीकर आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment