तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 January 2019

स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचा शेलगाव बाजार येथे तालुका स्तरीय शुभारंभ

           मोताळा (प्रतिनिधी) आज दि.३ जानेवारी रोजी क्रांती ज्योती सवित्रीबाई फुले यांची जयंती ग्राम संसद शेलगाव बाजार येथे साजरी करण्यात आली. याचेच औचित्य साधून दुग्धशर्करा योग  म्हणजेच देशभर रबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचा तालुकास्तरीय शुभारंभ मोताळा तालुक्यातील ग्राम शेलगाव बाजार येथे मोताळा गटविकास अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सदर शेलगाव बाजार येथे शौचालय स्पर्धेमध्ये शासकीय व वैयक्तिक स्तरावरील शौचालयाची रंग रंगोटी व साफ सफाई करण्यात आली. येथे अनेक शौचालयांवर स्वच्छतेचे संदेश रगविण्यात आले. तसेच स्वच्छतेची जनजागृती करण्साठी विविध संकल्पना मांडण्यात आल्या. यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन आपआपले शौचालय कल्पकतेने रंगवून स्पर्धेत आपण ठसा उमटवण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी उपस्थित गटविकास अधिकारी संजय पाटील, विस्तार अधिकारी पंचायत श्री माडीवाले, विस्तार अधिकारी आरोग्य श्री झणके, गट समन्वयक श्री तायडे, सरपंच सौ.सरला अमित खर्चे, उपसरपंच योगेश खंडारे , सचिव कु.गोसावी मॅडम, मुख्याध्यापक पाटील सर, सर्वश्री ग्रा.पं सदस्य तथा समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment