तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 30 January 2019

गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील किसनराव शेळके यांचे निधनसुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि. ३० __ तालुक्यातील धारवंटा येथील आदर्शदायी व कर्तुत्ववान व्यक्तिमत्व किसनराव सखाराम शेळके यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
     याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व धारवंटा येथील रहिवासी असलेले किसनराव सखाराम शेळके यांचे मंगळवार दिनांक २९ जानेवारी २०१९ रोजी दुपारी दोन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी साडेपाच वाजता सिंदफना नदी लगत असलेल्या त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात अंकुशराव व लहुराव हे दोन मुले तसेच दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
      या अंत्यविधी प्रसंगी प्रकाशराव सुस्कर, राजेंद्र झोडगे, विष्णुपंतराव शिंदे, मुकुंदराव कदम, भुजंगराव काकडे, अंकुशराव लाखे, सरपंच सतीशराव शेळके, विठ्ठलराव शेळके, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलिपराव शिंदे, डॉक्टर लक्ष्मणराव ढाकणे आदींसह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घडलेल्या या दुःखद घटनेनंतर परिसरामध्ये शोककळा पसरली होती. शेळके परिवारावर कोसळलेल्या या दुःखात दैनिक झुंजार नेता परिवार सहभागी आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment