तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 30 January 2019

वाग्देव माझा वाठारचा राजा या ग्रुप तर्फे श्री समर्थ वाग्देव महाराज यात्रा काळात कुस्त्यांचे फड व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


मुंबई प्रतिनिधी 
मुंबई: श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांची पुण्यतिथी व रथ उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. श्री समर्थ वाग्देव महाराजांचा रथोत्सव हा पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा यात्रा उत्सव असतो. यात्रेच्या दरम्यान भाविकांच्या मनोरंजनासाठी वाठार स्टेशन येथील वाग्देव माझा वाठार चा राजा या ग्रुप ने यावर्षी कुस्त्यांचे जंगी मैदान भरवले होते. 
    कुस्तीच्या आखाड्यात एकूण ५१ कुस्त्या झाल्या. हे सर्व पैलवान बाहेरच्या गावातील होते, कुस्त्या ५० रुपये ते ५०००/ रुपयापर्यंत लावल्या गेल्या. शेवटची कुस्ती ५०००/ रुपयाची लावली गेली. सदरची कुस्ती वाठार स्टेशन येथील श्री. समर्थ वाग्देव महाराजांचे पाचव्या पिढीतील वंशज पैलवान श्री विठ्ठल करे यांनी जिंकली. त्यांना रोख रक्कम ५०००/ रुपये व ढाल बक्षीस त्यांच्या वस्ताद यांच्या हस्ते देण्यात आली.
 तसेच मंगळवार दिनांक २२ जानेवारी रोजी संध्याकाळी १०.वाजता गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन वाठार स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक श्री मारुती खेडकर साहेब व स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री दिगंबरशेठ आगवणे यांनी केले.
    वाग्देव माझा वाठार चा राजा या ग्रुपने आयोजित केलेल्या भंडारा उधळला वाग्देवांचा हा कार्यक्रम प्रेक्षकांना विशेष आकर्षणाचा ठरला. आणि विशेषतः ब्रह्मवाणी वाग्देवांची या चित्रपटातील स्थानिक कलाकारांनी सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच या कार्यक्रमास ५ ते ६ हजार रसिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती, सदरचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी श्री.डॉ. शिवाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाग्देव माझा वाठार चा राजा या ग्रुप मधील युवा नेते  अशोक माने,भगवान चव्हाण (भैय्यासाहेब) , राहुल तांबे  श्री चंद्रकांत बरकडे सर, सागर करे, यांनी भरपूर प्रयत्न केले, या कार्यक्रमास वाठार पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

No comments:

Post a comment