तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 January 2019

परळीच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकार कटिबद्ध- ना.पंकजाताई मुंडे


परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- परळीच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकार कटिबद्ध असून राज्य सरकारच्या विशेष रस्ता योजनेतून आज 5 कोटी रु. रस्ता कामांचे भूमिपूजन मी केले आहे. भविष्यात कोणालाही न घाबरता स्वच्छ परळी, सुंदर परळी आणि निर्भय परळीसाठी मला परळीकरांनी साथ द्यावी असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.सौ.पंकजाताई मुंडे यांनी केले.

परळी शहरात आज विविध ठिकाणी ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते 5 कोटी रु.रस्ता कामांचे भूमिपूजन करण्यात आले. रात्री मोंढा मैदान रस्त्यावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात बोलतांना ना.पंकजाताई यांनी आगामी लोकसभा निवडणूकांचे रणसिंग फुंकले. लोकसभे अगोदर परळीकरांशी हा माझा संवाद असून या निमित्ताने परळीकरांनी मला साथ द्यावी. युती शासनाच्या काळात बीड जिल्ह्याला विकासाचा निधी आला होता. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतांना एक दमडीही आलेली नाही. सध्या केंद्र व राज्यात आमचे सरकार असून मी पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक निधी आलेला आहे. ग्रामीण भागात प्रत्येक खेडेगावाचा चेहरा मोहरा 25/15 च्या निधी बरोबरच अनेक प्रकारच्या निधीतून बदलत आहे. परळी शहरातही विकास करण्याची माझी इच्छा होती. परंतु मागील 4 वर्षात शहरात विकास करण्यासाठी मला परवानगी मिळत नव्हती. आज भुमिपूजन केलेले 5 कोटींचे रस्ते हे खास मुख्यमंत्र्यांना विनंती करुन विशेष रस्ता निधीतून घेतले असल्याने यात नगर पालिकेचा कुठलाही संबंध नाही. येणारा काळ हा निवडणूकीचा असून या निवडणूकीमध्ये विरोधकांकडून माझ्यावर अनेक आरोप केले जातील. परंतु या आरोपांना लक्ष न देता, आपण मला साथ द्यावी तसेच परळीतील गुंडगिरी संपविण्यासाठी शहरातील व्यापारी व सर्व सामान्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे असून समोरुन येणारा वार अगोदर मी माझ्या खांद्यावर झेलेल. यामुळे येणार्‍या काळात परळीकरांनी निर्भयपणे जगावे असे आवाहन केले. तसेच यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आपण केलेल्या विकास कामाबाबत बोलतांना आम्ही केवळ विकासाचे राजकारण करतो, आम्हाला स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांची शिकवण असून त्या शिकविणी नुसार भविष्यात राजकारण करणार असल्याचे सांगितले. 

यावेळी आ.सुरेश दस, आ.आर.टी.देशमुख, आ.संगिता ठोंबरे, दत्ताप्पा ईटके, विकासराव डुबे,  प्रकाश सामत, रमेश आडसकर, चेअरमन अशोक जैन, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे,  धम्मानंद मुंडे, वैजनाथ जगतकर, दिलीप बिडगर, भास्कर रोडे, विजय वाकेकर, अरूण टाक, अरुण पाठक, प्रा.पवन मुंडे, आदींनी भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी मानले. 

परळी-अंबाजोगाई रस्ता होणारच 

मी करत असलेल्या विकास कामामध्ये अडथळे आणण्याचे काम केले जात आहे. परळी-अंबाजोगाई रस्त्याच्या कामाबाबतही हाच प्रकार घडला. सुरुवातीच्या गुत्तेदारास धमक्यादेवून पळून नेण्यापर्यंत कोणी केल्या. हे सर्वांना माहित आहे. परंतु या रस्त्यासाठी आता मी लक्ष घातले असून दिल्ली येथून बोलणी करुन या रस्त्यासाठी नवीन गुत्तेदार नेमला. रस्ता आडवण्यासाठी कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड व त्यांची टिम सक्षम असून त्यांना कोणीजर विरोध करत असलेल तर तो विरोध मी खपून घेणार नाही. असे सांगून हा रस्ता लवकरच पुर्ण होणार असल्याचे ना.पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

No comments:

Post a Comment