तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 January 2019

राष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.

तेजन्यूजहेडलाईन्स न्यूज नेटवर्क
मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे नक्की झाल्या नंतर शुक्रवारी 4 जानेवारी रोजी राकाँ प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष खा शरद पवार यांच्या उपस्थितीत परभणी, बीड,उस्मानाबाद ,रायगड, कोल्हापूर मतदार संघातील उमेवारांची चाचपणी करण्यात आली. यात परभणी साठी राजेश विटेकर यांच्या नावाची शिफारस तिन्ही आमदार आणि सर्व पदाधिकारी यांनी केली असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली.

या वेळी लोकसभे साठी परभणी जिल्ह्यातील स्थिती राकाँच्या बाजूने असल्याची माहिती पक्षाध्यक्ष खा शरद पवार यांच्या समोर जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रानी, आ विजय भांबळे, आ मधूसूदन केंद्रे यांच्या सह, जि प अध्यक्ष ,उपाध्यक्ष,नगराध्यक्ष,जि प सदस्य, नगरसेवक, तालुकाध्यक्ष ,पदाधिकारी यांनी राजेश विटेकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती मिळाली आहे.  परभणी लोकसभे साठी माजी जि प उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर आणि माजी महापौर प्रताप देशमुख हेही इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या दोघांनाही एकाही पदाधिकारी अथवा कार्यकर्त्याचे समर्थन नसल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला उधवस्त करावयाचा असेल तर राजेश विटेकरांची उमेदवारी कशी योग्य आहे याची सविस्तर माहिती या वेळी पक्षाध्यक्ष पवार यांना देण्यात आली. आघाडीतील जागांची अंतिम चर्चा झाल्या नंतर राजेश विटेकरांचे नावच राकाँ कडून जाहिर होणार या वर आता जवळपास शिक्का मोर्तब झाल्या खात्रिशिर माहिती मिळत आहे.

No comments:

Post a comment