तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 30 January 2019

विद्यार्थ्यांच्या ध्येयासाठी केंब्रिज स्कूलची झेप - सुभाष मुळे

गेवराई, दि. ३० ( प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोणातून आटोकाट प्रयत्न करणारे डॉ. श्री व सौ मोटे यांच्या प्रयत्नातून गेवराई येथे सुरू झालेली केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी शाळा ध्येयाच्या दिशेने झेपावत असल्याचे लक्षात येते असे प्रतिपादन पत्रकार सुभाष मुळे यांनी केले.
        गेवराई येथील गोदावरी स्पन पाईप फॅक्टरी समोर द केंब्रिज व्हँली इंटरनॅशनल गणराज्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पत्रकार सुभाष मुळे हे बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे विक्रमराव गंगाधर, संजय नाना चाळक, भैय्यासाहेब खरात, सुरेंद्र रुकर, प्रहार संघटनेचे सुनील ठोसर तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य फुलचंद बोरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. पुढे बोलताना सुभाष मुळे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांना यश गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यशासाठी धडपडणार्‍या या चिमुकल्या विद्यार्थ्यां करिता केम्ब्रीज शाळेने पुढाकार घेतला ही अभिमानास्पद बाब लक्षात येते. डॉ. बी. आर. मोटे व त्यांच्या पत्नी डॉ. सौ. मोटे यांच्या प्रयत्नातून द केम्बरीज व्हँली इंटरनॅशनल स्कूलने अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थी देखील या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकले. तांडा, वस्ती आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून उचललेले पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. प्रत्येकाने अडचणीवर मात करत पर्याय निवडला पाहिजे आणि जो पर्याय निवडतो तो हमखास यश प्राप्त करतो असे प्रतिपादन सुभाष मुळे यांनी एका बोधकथेच्या माध्यमातून सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य फुलचंद बोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदित्य जोशी यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. सय्यद सर यांनी केले. या कार्यक्रमास भागातील नागरिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   ▌

No comments:

Post a comment