तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 30 January 2019

मोप येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना निरोपसमाधान गायकवाड प्रतिनिधी रिसोड /३० जानेवारी
मोप ता.रिसोड येथील श्री.शिवाजी विद्यालय व क. महाविद्यालययातील इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.त्यानिमित्त विद्यालयात २८ जानेवारी रोजी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड.किरणराव सरनाईक तर मार्गदर्शक म्हणुन अकोला येथील उद्योजक हरेषभाई शहा व सुप्रसिध्द वक्ते विनोद बोरे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणुन शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव भिकाजी नागरे,शिवाजी किडस् वाशिमचे अध्यक्ष स्नेहदिपभैया सरनाईक,प्रा.प्रशांत गोळे,शांतीपुरी महाराज,डाॅ.रामेश्वरजी नरवाडे,जुगलकिशोर शर्मा,प्राचार्य डि.एन.अघडते,आदी उपस्थित होते.प्रतिमापुजन व स्वागत समारंभानंतर प्रा.समाधान गायकवाड,श्री.संजय नरवाडे सर,श्री.मुलकारे सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी  सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.वर्ग १२ वीच्या विद्यार्थींनी कु स्वाती मोरे व कु.प्रिती वाठोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात अॅड.सरनाईक यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची वेळ येऊ नये यासाठी वाशिम येथे शिवाजी अॅकॅडमी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती देऊन विद्यार्थांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.उद्योजक शहा यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बळावर आपले कर्तृत्त्व सिध्द करण्याचे आवाहन केले.प्रा.गायकवाड यांनी   संदेशे आते है या गितावर बसविलेले नृत्य शहा यांना खुपच आवडले व भावनिक होऊन मी ही आता असाच मिल्ट्रीचा ट्रेस घेण्याचे कबुल केले.शेवटी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या उद्योगात रोजगार देण्याची हमी  दिली.विनोद बोरे यांनी महापुरुषांच्या जीवनावर कविता सादर केल्या तसेच आपल्या नावाप्रमाणेच विनोद  करुन सभेला खळखळुन हसवले.त्यासाठी त्यांनी प्रा.समाधान गायकवाड व श्री संजय नरवाडे यांच्या नावाचा वापर केला. प्रास्ताविक अध्यक्ष डाॅ.गोपीकिसनजी सिकची व प्राचार्य डि.एन.अघडते सर यांनी केले.सुञसंचालन प्रा.शरद टेमधरे यांनी तर आभारप्रदर्शन श्री.निलेश पुंड सर यांनी केले.कार्यक्रमाला शाळेचे माजी प्राचार्य,कर्मचारी,गाव व परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्ती, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व वर्ग ९ वी व ११ वी च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a comment