तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 January 2019

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नी च्या मदतीसाठी सरसावले शेकडो हातमुलाचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारले

संकल्प राष्ट्र उभारणीचा ग्रुपचा उपक्रम

गंगाखेड (प्रतिनिधी) :- पती जाऊन पंधरवाडाही लोटला नाही, अचानक पंधरा-वीस लोकांचे टोळकॆ येतंय अन मोडक्या तोकड्या दारात उभा टाकत मदत करण्यामागची भूमिका सांगत शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्य भेट देऊन जातयं असा एक वेगळा अनुभव कर्ता पुरुष गेल्याने दुःखाच्या सागरात बुडालेल्या गंगाखेडातील भुमरे कुटुंबीयांनी अनुभवला.
याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील जनाबाई मंदिरासमोरील धनगर गल्लीतील सखाराम रोहिदास उंबरे या 35 वर्षीय शेतकऱ्यांनी पंधरा दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. घरातील कर्ता गेल्याने कुटुंबीय शोकसागरात बुडाले होते. निवडणुका तोंडावर आल्याने बऱ्याच पुढाऱ्यांनी भुमरे कुटुंबाची माहिती घेत घरी भेटी दिल्या. पण सांत्वनाचे चार शब्द पानावर पडण्याशिवाय पती गेल्याने कुटुंब प्रमुखांची जबाबदारी खांद्यावर पडलेल्या  विधवा पत्नी चौत्राबाई सखाराम भुमरे यांच्या कानावर दुसरं काहीच पडलं नाही.  महिनाभरापूर्वी झालेला लाडक्या गायीचा मृत्यू  अन् पंधरा दिवसापूर्वी पती देवाघरी जाण्याचे दुःख मनात साठवत आपल्या 2 लहान मुलांना आई आणि बाप दोघांचीही माया चौतराताई देत होत्या. भुमरे कुटुंबीयांचे दूरचे नातेवाईक असलेले येथील व्यापारी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी या कुटुंबाची व्यथा संकल्प राष्ट्र उभारणीचा या ग्रुपचे कर्तेधर्ते शामसुंदर निरस यांच्या कानावर घातली. कुटुंबाची व्यथा कानावर पडताच शामसुंदर नीरस सर हे दोन दिवसात या कुटुंबास मदतीची खरोखर गरज आहे का हे पाहण्यासाठी सखाराम बोबडे यांना घेऊन मयत शेतकर्याच्या घरी दाखल झाले. दुःख सागरत बुडालेल्या भुमरे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून शामसुंदर निरस यांनी त्याच क्षणी मयत शेतकरी सखाराम भुमरे यांच्या मोठ्या मुलास स्वतः कार्यरत असलेल्या समाज कल्याण विभागाच्या केंद्रीय विद्यालयात प्रवेश देण्याची जबाबदारी बोलून दाखवली. परभणी जिल्ह्यातील सुमारे 170 गरजु कुटुबियांना आरोग्य, शिक्षण, रोजगार अशा वेगवेगळ्या विषयावर मदत करणाऱ्या संकल्प राष्ट्रउभारणीचा या ग्रुपच्या सदस्यांनी त्यांना रोजगाराची साधनं उपलब्ध व्हावीत या हेतूने शिलाई मशीन भेट देण्याचा निर्णय घेतला. 26 जानेवारी रोजी सर्वत्र प्रजासत्ताक दिनाची धामधुम चालू होती. संकल्प राष्ट्र उभारणीचा या ग्रुपचे सदस्य मात्र आपण सेवेत असलेल्या ठिकाणचे ध्वजारोहण आटोपून परभणीहुन गंगाखेड च्या दिशेने रवाना झाले होते. दुपारी साडेबाराची वेळ होती. मोटरसायकल, ऑटो ,जीप मिळेल त्या वाहनाने या ग्रुपचे सदस्य ग्रामीण भागात सारखीच वातावरण असलेल्या धनगर गल्लीत दाखल होत होते. एकदम अनोळखी माणसं गल्लीत येतात शेजारी मात्र यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. कुटुंबातील सदस्य मुजाभाउ भुमरे यांना नविन माणसं येणार असल्याची माहिती असल्याने ते पाहूण्याची वाट पाहत थांबले होते. या ग्रुपच्या काही सदस्यांनी आपले मनोगत मोजक्या शब्दात  मदती मागची भूमिका मांडली.  आम्ही करत असलेल्या मदतीने भुमरे कुटुंबातील दुःख संपणार नसले तरी रोजगार उपलब्ध होण्यास  मदत होणार असल्याचे या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. असा प्रसंग कोणाच्या कुटुंबात दुर्दैवाने घडू नये पण घडला तर त्या कुटुंबास मदतीसाठी हजारो हात तयार व्हावेत यासाठी ही माहिती सांगावी लागत असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. भुमरे कुटुंबातील सदस्यांचा व या ग्रुपच्या सदस्यांचे एकमेकाला परिचय करून देण्याची भूमिका सखाराम बोबडे यांनी पार पाडली. यावेळी संकल्प राष्ट्र उभारणीचा या ग्रुपचे शामसुंदर निरस, कोमल गावंडे, सतीश शिंदे, धिरज सोनवणे, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी अमित घवले, दिनकर जोशी, रामदास धोंगडे, विजय पकाने, प्रकाश कांबळे, विष्णू दराडे, सुरेश सरवदे, सुनील कांबळे, मुंजाभाऊ सोंगे यांनी आर्थिक मदत जमा करून एकत्र येत  शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याची खरेदी केली होती. यावेळी यावेळी सतीश शिंदे, मंजुषा पदेवाड, संतोष शिंदे, धिरज सोनवणे, सुनील वराळे, विलास साखरे, लक्ष्मण निरस,संपत निरस, दत्ता गुरले, नारायण धनवटे, सखाराम बोबडे, धनंजय पवार,  सरपंच सीमाताई धनवटे, सौ अलकाताई बोबडे आदींची उपस्थिती होती. दुर्गा लेडीज टेलर प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख सीमाताई घनवटे यांनी चौत्राताई भुमरे यांना मोफत शिलाई मशीन चालवण्याचे प्रशिक्षण देणार असल्याचे जाहीर केले. तर शहरातील डाॅ शिवाजी निरस यांनी या कुटुंबाची मोफत आरोग्य सेवेची जबाबदारी स्वीकारली. यावेळी या कुटुंबास रोख स्वरूपात एक लाख रुपयांची मदत करणारे माजी आमदार सीताराम घनदाट मामा व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या गोविंद यादव यांचेही आभार मानण्यात आले.
 यावेळी कुटुंबाच्या वतीने मयत शेतकऱ्याचे भाऊ मुंजाभाऊ भुमरे त्यांच्यासह भुमरे परिवाराचे नातेवाईक, मित्र असलेले राम ठेबरे, मुक्तीराम आळसे, पिराजी भुमरे, मधुकर आवाड,अशिष बोबडे यां सर्वांनी पाहुण्यांचे आभार मानले. यावेळी पत्रकार बाळासाहेब स्वामी, शेख अन्वर लिंबेकर, उत्तम आवंके, सुनील कोनारडे, प्रा.पिराजी कांबळे, बाळासाहेब राखे, शिवाजी कांबळे आदीची उपस्थिती होती.

No comments:

Post a comment