तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 January 2019

मुकनायक’आंबेडकरी चळवळींचा आवाज


मुकनायकदिनी कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे प्रतिपादन

बीड,दि.31(प्रतिनिधी)ः-त्या काळच्या भारतात धर्म संस्कृतिच्या नावाखाली माणसाला माणुस असूनही समान हक्क आणि अधिकार दिले जात नव्हते. विषमतावादी प्रवाहाकडून जातीची उतरंड निर्माण करून माणसा-माणसांमध्ये भेद केला जात असे. अशा काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक पाक्षिकातून मुक्यांना आपल्या हक्क, अधिकार आणि समतेसाठी बोलके केले.त्यामुळे मुकनायक हा आंबेडकरी चळवळींचा खरा आवाज असून मुकनायकदिन मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे. असल्याचे प्रतिपादन कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांनी व्यक्त केले.

  मुकनायक दिनानिमित्त बहूजन पत्रकार संघाकडून गुरूवार (दि.31) जानेवारी रोजी शहरातील तुलसी संगणक शास्त्र महाविद्यालय बीड येथे मुकनायक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून मुप्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून प्रा.लक्ष्मण गुंजाळ, द्वारकादास फटाले, बबन वडमारे, डी.जी.वानखेडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

 उपस्थिताना संबोधित करताना संजय कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते’.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 साली मुकनायक हे पक्षिक सुरू केले होते.या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणिव निर्माण करून दिली. त्याला आज 99 वर्ष होत आहेत. पुढच्या वर्षी मुकनायकाला एक शतक होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुकनायक दिन साजरा झाला पाहिजे. असल्याचे मनोगत संजय कांबळे यांयासह मान्यवरांनी व्यक्त केले.  

 या मुकनायक दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन  पत्रकार सुनिल डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार अनिल मगर यांनी व्यक्त केले. यावेळी बहूजन पत्रकार संघाचे उत्तम हजारे, गलाब भावसार, सुधाकर सोनवणे, बालाजी जगतकर, नाना कांबळे, अनिल ससाणे,  सुरेश पाटोळे, पत्रकार बांधव यांच्यासह तुलसी संगणक शास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंदाने मोलचे सहकार्य केले. यावेळी समतेची विचारधारा घेऊन निघालेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.मूकनायकाच्या पहिल्या 

अंकातला मजकूर

हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोर्‍याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही.

No comments:

Post a comment