तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 January 2019

"अस्थी कलश" जिल्हाअधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना

आकाश लष्करे
उस्मानाबाद
प्रतिनिधी

उस्मानाबाद दिनांक ४-११-२०१८रोजी मनसेची सत्ता आसलेली एकमेव ग्रामपंचायत तावरजखेडा येथील दोन शेतकर्यानी सलग दोन दिवसात दोन आत्महत्या केल्या असून तरीही प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही ना गावाला भेट दिली नाही म्हणून संतप्त आत्महत्या केलेल्या शेतकरी यांचे लहान भाऊ यांनी जिल्हा सचिव दादा कांबळे व सरपंच मुरली देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अस्थी कलश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पाठवली व निवेदन देऊन शासनाचा निषेध व्यक्त करण्यात उस्मानाबाद मनसेच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकरी यांच्या "अस्थी कलश" मुख्यमंत्रीे यांना पाठवून शासनाचा निषेध केला यावेळी अधिकारी यांनी "अस्थी कलश" घेण्यास नकार दिला "अस्थी कलश" बघून अधिकारी यांना घाम फुटला होता,यावेळी जिल्हा सचिव दादा कांबळे,सरपंच मुरली देशमुख,मारूती सागर,प्रेमचंद सुरवसे,बबन कोळी,सौरभ देशमुख,संजय पवार,आदी कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment