तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 January 2019

वन्यजीव छायाचित्रण स्पर्धेत जिंतूर येथील हौशी छायाचित्रकार विजय ढाकणे प्रथम

जिंतूर :
    सहाव्या पक्षी महोत्सवाचे औचित्य साधून वन विभाग औरंगाबाद, वन्यजीव विभाग औरंगाबाद, औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन आणि इन्व्हायरनमेंटलं रिसर्च फौंडेशन एज्युकेशन अकॅडमी यांचे संयुक्त विद्यमाने दि 30 डिसेंबर 2018 रोजी पैठण येथील जायकवाडी पक्षी अभयारण्य येथे "ऑन द स्पॉट" फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त वन्यजीव छायाचित्रकार मा बैजू पाटील हे होते तर मानद वन्यजीव रक्षक मा. डाॅ. दिलीप यार्दी, वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मा. रत्नाकर नागापूरकर आणि निसर्ग मित्र मंडळ आणि ग्रीन इक्सप्लोरचे मा. किरण परदेशी आणि कुणाल विभांडीक हे होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळपास 60 वन्यजीव छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवला होता.  एकूण 350 छायाचित्र स्पर्धेत होते. सदरील स्पर्धा ही व्यावसायिक छायाचित्रकार गट आणि हौशी छायाचित्रकार गट या दोन गटात घेण्यात आली होती.
    या स्पर्धेत जिंतूर (जि.परभणी) येथील निसर्गप्रेमी युवक तथा वन्यजीव छायाचित्रकार विजय ढाकणे यांच्या *कल्लेदार सुरय या पक्ष्याने मासा पकडून हवेत उडत असताना टिपलेल्या छायाचित्राला हौशी गटातून प्रथम क्रमांक मिळवला. सर्व विजयी स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त वन्यजीव छायाचित्रकार मा. बैजू पाटील,जिल्हाधिकारी औरंगाबाद श्री उदय चौधरी व मानद वन्य जीवरक्षक मा श्री दिलीप यार्दी यांचे हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मा बैजू पाटील यांची प्रकट मुलाखत वन्यजीव छायाचित्रकार मा श्री किरण परदेशी सर यांनी घेतली तेव्हा त्यांनी आता पर्यतचा सर्व प्रवास सांगितला अनेक थरारक प्रसंग सांगितले तेव्हा संपूर्ण सभागृह एकचित्त होऊन ऐकत होते. या कार्यक्रमास व्यासपीठावर एम आय टी  चे एम डी मुनिश शर्मा , एम टी डी सी चे शंकर जैस्वाल, वनविभागाचे आर आर काळे वन परिक्षेत्र अधिकारी व इतर अधिकारी एम आय टी चे प्राध्यापक, विध्यार्धी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    विजय ढाकणे यांच्या यशाबद्दल डॉ.दुर्गादास कान्हडकर, डॉ.विवेक थिटे, डॉ.दिलीप शृंगारपुतळे, डॉ.सुमेर मोहरे, प्रा. बाळू बुधवंत, अनिल उरटवाड, कमलकिशोर जैस्वाल, ज्योतिराम भोसले, अनुप सोळंके, शहजाद पठाण, शेख शकील शेख अहेमद, अॅड. गोपाळ रोकडे, अॅड. विनोद राठोड, विनोद
पाचपिले, ग्रंथमिञ भास्कर पिंपळकर, शब्दसह्याद्री परिवार तसेच जिंतूर डॉक्टर्स असोसिएशन च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

' फोटो आपण प्रत्येक जण काढतो, प्रत्येकाकडे एक नजर असते. ती लक्षभेदी होवो. छोटी सुरुवात आहे, वन्यजीव छायाचित्र स्पर्धेचे हे पहिले पारितोषिक डॉ.दुर्गादास कान्हडकर यांच्या प्रोत्साहनपर मार्गदर्शनामुळे मिळाले. माणसाला प्रगतीचा आलेख उंचावत न्यावयाचा असेल तर मार्गदर्शक भक्कम हवा

No comments:

Post a Comment