तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 January 2019

फटाके कशाला ! राष्ट्रवादीचा प्रत्येक नेता तोफ आहे - धनंजय मुंडे यांच्या भाषणाला पारनेर मध्ये तुफान प्रतिसाद
पारनेर  (प्रतिनिधी) :- दि 31 -------- अरे सभेस्थानी फटाके कशाला वाजवता,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक नेता एक तोफ आहे त्यामुळे सभेच्या ठिकाणी असे छोटे मोठे फटके बाजवून वेळ घालवू नका असे वक्तव्य करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पारनेर येथील सभेत तुफान प्रतिसाद मिळवला.

परिवर्तन यात्रे दरम्यान आज पारनेर येथील शिवसेनेचे नेते निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला त्यावेळी मुंडे बोलत होते. 

यावेळी बोलताना मुंडे यांनी राज्यातील इतर घडामोडींनाही हात घातला. कांद्याला ५ रुपये अनुदान पाहिजे होते सरकारने दिले फक्त २ रुपये तेही ऑक्टोबरपर्यंत. या सत्ताधाऱ्यांना सरकार चालवायची अक्कल नाही अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार आले तर पारनेरचा पाण्याचा प्रश्न पहिला सोडवला जाईल असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. 

आमदार विजय औटी यांचे नाव न घेता इशारा

इथले आमदार फार दहशत पसरवतात मी आमदाराला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसला दहशत दाखवू नका. तुमचे फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत हे लक्षात ठेवा. सभेची गर्दी पाहता आता तुमची दहशत त्यांनी पाळली अशा शब्दात कार्यकर्त्यांना बळ दिले.

No comments:

Post a comment