तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 January 2019

आमदार दुर्रांनींनी वर्तमान पत्रात दिलेली जाहिरात ठरलीय चर्चेचा विषय

प्रतिनिधी
पाथरी-परभणी जिल्ह्यात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप यश आलेलं नाही. त्यातच यंदा ही जागा कुठल्याही परिस्थतीत जिंकायची असा आदेश पक्षा कडून आहेत. त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी अनोखी शक्कल लढवली आहे.
बाबाजानी दुर्राणी यांनी वृत्तपत्रात नववर्षाच्या जाहिरात जनतेला खासदार बदलण्याचे आवाहन केलं आहे. 'खासदार बदला, जिल्हा बदलेल. वेळ आहे परिवर्तनाची, गरज आहे विकासाची' या मथळ्याखाली ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. शिवसेनेने आज पर्यंत केवळ जातीय तेढच निर्माण केल्याचा आरोप त्यांनी या जाहिराती मधून केला आहे.
सतत शिवसेनेचा खासदार निवडून दिल्याने जिल्ह्याची अवस्था बकाल झाली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीचा विकास ठप्प झाला आहे. त्यामुळे शिवसेनेला हरवून राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून आणल्या शिवाय परभणीचा विकास शक्य नाही, असं जाहिरातीत म्हटलं आहे. ही जाहिरात सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाली आहे.

No comments:

Post a Comment