तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 February 2019

पुण्यात होणार राज्यस्तरीय शिक्षण परिषद व मेळावा - नामदेवराव शिंदे


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व भव्य शिक्षक मेळावा २ मार्च रोजी बालेवाडी पुणे येथे संघाचे नेते संभाजीराव थोरात व राज्यध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे. या शिक्षण परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन नामदेवराव शिंदे यांनी केले आहे.
राज्यस्तरीय शिक्षण परिषद व भव्य शिक्षक मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे माजी कृषीमंत्री खा. शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे, शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिक्षण परिषदेमध्ये शिक्षाकांना जुनी पेंन्शन योजना लागू करणे, दि. २३ ऑक्टोबर २०१७ चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे, जिल्हा अंतर्गत बदली धोरणातील त्रुटी दूर करणे, सातव्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करणे, जिल्हातंर्गत बदलीमध्ये विस्थापित झालेल्या पती-पत्नीची सोय करणे, शिक्षकाकडील अशैक्षणीक कामे काढून घेणे या व इतर महत्वाच्या मागण्या मांडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शिक्षक बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन नामदेवराव शिंदे, विभागीय अध्यक्ष अंकुश डाके, जिल्हाध्यक्ष भगवान पवार, बाळराजे तळेकर, तात्यासाहेब मेघारे, आन्नासाहेब लोणकर, विष्णु खेत्रे, रत्नाकर वाघमारे, गणेश सुळे, भाउसाहेब जोशी, भास्कर सोलाट, नंदकिशोर खरात, आव्हाड अर्जून सुतार, शिवाजी सानप, सचिन गायकवाड, सचिन दाभाडे , जगदिश मरकड, बाबासाहेब आलगुडे, उबाळे अशोक, बापूसाहेब तारूकर, गणेश सानप, वाजेद सर, रामराव पवार, ठाकरे के.पी., श्रीमती देवकर तारा, गंगा जंवजाळ, यांंनी अवाहन केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

सिंदखेड येथील रामेश्वर विद्यालयाच्या एस. एस.सी च्या विद्यार्थ्यांना निरोप


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १ __ प.पु.गुरू गणपत बाबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रामेश्वर विद्यालय सिंदखेड या विद्यालायामध्ये एस.एस.सी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
      विद्यालयाचे सचिव तथा मुख्याध्यापक श्री.संभाजीराव करांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभास रं.भ अट्टल महाविद्यालयाचे प्रा.श्री.पाटील सर, बंकटस्वामी महाविद्यालयाचे प्रा.काळे सर व कवीवर्य तथा वात्रटीकाकार प्रा.श्री.सदोलकर सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रथमता थोर नेत्यांच्या प्रतिमेच पूजन करुन प्रमुख पाहुणे प्रा.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले ध्येय निश्चित करुन त्याचं चितंन केले तरच आपल्याला आपल्या ध्येया पर्यंत पोहचता येईल असे ते म्हणाले. प्रा.काळे सर यांनी आई वडिलांचा आदर करावा आपण ज्या मातीत बालपण शिकलो, त्या मातीची जाणीव ठेवली पाहिजे असे सांगून शुभेच्छा दिल्या. कवी व वात्रटीकाकार प्रा.सादोळकर यांनी आपल्या कवितेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. विद्यालयाचे सचिव तथा मुख्याध्यापक श्री.संभाजीराव करांडे सर यांनी शालेय जीवनामध्ये विद्यार्थी हा केवळ परीक्षार्थीं न राहता तो शिक्षणार्थी झाला पाहिजे तरच येणाऱ्या काळात त्याला यशाचे शिखर गाठता येईल असे आपल्या समारोपीय भाषणात सांगून शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयामधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
        विद्यार्थ्यांमधून. कु.जाधव प्रीती, कु.दरेकर आरती, कु.ठोसर प्रतीक्षा, भोसले लक्ष्मण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती गुजर मॅडम, श्री.किशोर शिंदे (सरपंच), श्री.दिगंबर ठोसर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.जाधव प्रतीक्षा व दरेकर वैष्णवी या विद्यार्थीनीनी केले तर अनुमोदन कु.करांडे नम्रता या विद्यार्थीनीने दिले. मान्यवर व उपस्थितांचे आभार कु.चव्हाण मनीषा या विद्यार्थीनीने मानले. निरोप समारंभ कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षकांनी मोठे परिश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

पक्षप्रमुखांनी दिलेला मैत्रीचा शब्द सार्थ करण्यासाठी शक्तीने कमला लागा - आनंदजी जाधव


व्यंकटेश शिंदे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शिवसेना बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव व जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या उपस्थितीत बैठक झाली असता त्यांनी शिवसैनिकांना संबोधताना युती झाली आहे उद्धव साहेबांनी दिलेला मैत्रीचा शब्द पूर्ण करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी शक्तीने कमला लागण्याचे अवाहन त्यांनी केले.

नव निर्वाचित जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांचा पहिला परळी दौरा दि २७ फेब्रुवारी रोजी पार पाडण्यात आला यावेळी चेंबरी विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली त्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांना चुलती शोक झाल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. बैठकवेळी मार्गदर्शन करताना आनंद जाधव व जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी शिवसैनिकांत स्फुर्ती भरली तसेच मित्रपक्षानेही शिवसैनकांना मानसन्मान ध्यायला हवा असेही त्यांनी मत व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हा समन्वयक संजय महाद्वार उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर, बाळासाहेब अंबुरे, सुशील पिंगळे विध्यार्थीसेना जिल्हा प्रमुख अतुल दुबे, जिल्हा सहसंघटक रमेश चौंडे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीचे आयोजन विधानसभा प्रमुख राजाभैया पांडे शहर प्रमुख राजेश विभूते यांनी केले होते या बैठकीत शिवसेना तालुका संघटक पदी हनुमान भरती, तालुका सचिव रामराव माने, उपतालुका प्रमुख जालिंदर गव्हाणे, पप्पू नाटकर, तर परळी शहर संघटक पदी अनिल शिंदे व सिरसाळा शहर समन्वयक पदी आश्रोबा काळे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली या बैठकीस युवासेनेचे अमर टाकळकर, संतोश चौधरी, उप शहर प्रमुख अभिजित धाकपडे, मोहन राजमाने, वैजनाथ माने, किशन बुंदेले, कैलास कावरे, कृष्णा सुरवसे, नागेश मुरकुटे, अमोल गायकवाड, शुभम जोशी, सुदर्शन यादव, अमोल म्हाळगी, बालाजी घटमल, अमित कचरे, मोहन परदेशी, गजानन कोकीळ, नवनाथ विभूते, किशोर शेलार, कृष्णा देवकर, भागवत कारपुडे, धनंजय गोतावळे, बालाजी खोशे, एकनाथ सरवदे, संजय सोमाणी सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

अभिनव विद्यालयातील विद्यार्थी भविष्यातील शास्त्रज्ञ होतील - गणेश गिरी

अभिनव विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
     ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय परळी वैजनाथ येथे राष्ट्रीय विज्ञान दिन संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गटसाधन केंद्र परळीचे गटशिक्षणअधिकारी गणेश गिरी, उद्घाटक म्हणून संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस कर्मचारी गित्ते, प्रदिप चाटे व संस्थेचे कार्यवाह सूर्यकांत कातकडे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी शाळेच्या प्रांगणात भरवलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक रमेश जाधवर यांच्या हस्ते रिबीन कापून व वैज्ञानिक चमत्कारिक नारळ फोडून करण्यात आले. सर्व मान्यवरांचे शाळेतर्फे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतूक करुन शाळासत्वार या प्रकारचे विज्ञान प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक महत्त्व पटवून देण्याचा कार्य केले आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणिधाकारी गणेश गिरी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे 21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत की, आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे सुद्धा एक विज्ञानाच्या प्रगतीचे छान उदाहरणच आहे. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे योग्य वेळेत पूर्ण करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे असे मत व्यक्त करत येणाऱ्या काळामध्ये या छोट्या छोट्या शास्त्रज्ञांची भारत देशाला गरज आहे असे प्रतिपादन केले. या विज्ञान प्रदर्शनात वर्ग पहिली ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी एकूण 80 प्रयोगाचे सादरीकरण केले होते. या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्तीने घेतला. हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करुन मुलांची विज्ञानाविषयी असलेली जिज्ञासा पाहून आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका अश्विनी मुंडे, प्रास्ताविक संतोष मुंडे, तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक अमोल मोहिते यांनी मानले. हा विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

मातोश्री चंद्रभागा आश्रमात महाशिवरात्री निमित्त परमरहस्य पारायण तथा हरिनाम संकिर्तन सोहळामहादेव गित्ते
----------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
ह.भ.प.ज्ञानोबा संभाजी लटपटे उर्फ कोन्द्रीकर माऊली महाराज यांच्या मातोश्री चंद्रभागा आश्रमात प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री निमित्त परमरहस्य पारायण व हरिनाम संकिर्तन सोहळा मित्ती माघ कृ.10  शुक्रवार दि.01  मार्च पासून प्रारंभ होत आहे. सोहळयाची सांगता मित्ती माघ कृ.14 मंगळवार दि.05 मार्च 2019 रोजी काल्याच्या किर्तनाने होत आहे. 

    परळी शहरातील वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस डोंगर तुकाई रस्त्यावर मातोश्री चंद्रभागा आश्रम आहे. या सोहळयात भावार्थ रामायण रामभक्त ह.भ.प.ज्ञानोबा माऊली उखळीकर हे तर ह.भ.प.प्रभाकर महाराज वाघचवरे व्यासपीठप्रमुख आहेत. श्री परमरहस्य पारायण नेतृत्व श्री शिवकन्या महिला भजनी मंडळ व श्री गुरूलिंग स्वामी महिला भजनी मंडळ करणार आहेत. या सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा आरती, 7 ते 10 विष्णू सहस्त्रनाम व परमरहस्य पारायण, सकाळी 10 ते 12 किर्तन, दु.3 ते 4 रामायण, 5 ते 6 हरिपाठ, रात्रौ 7 ते 9 हरिकिर्तन होणार आहेत.  सोहळयातील किर्तन महोत्सवात दि.01 रोजी ह.भ.प.सर्वश्री जगदीश महाराज सोनवणे टोकवाडीकर, विजयानंद महाराज आघाव दौनापुरकर, बंडोपंत महाराज ढाकणे,  मृदंगाचार्य ताल भुषण भरत महाराज सोडगीर, विठ्ठल महाराज कुसळवाडीकर, पंढरीनाथ महाराज भेंडेवाडीकर, प्रभाकर महाराज वाघचौरे, प्रल्हाद महाराज देशमुख , गुरूवर्य ज्ञानोबा माऊली लटपटे यांची किर्तन सेवा सादर होणार आहे.
मंगळवार दि.05 मार्च रोजी सकाळी 10 वा. ह.भ.प.बाळू महाराज लटपटे यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद झाल्यावर सोहळयाची सांगता होईल. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी  लाभ घ्यावा असे आवाहन गुरूवर्य ज्ञानोबा माऊली लटपटे संस्थापक, मातोश्री आश्रम व मातोश्री चंद्रभागा आश्रम विद्यार्थी व भक्त मंडळी परळी वैजनाथ यांनी केले आहे.

अँड.वंसतराव फड अँड.श्नीकांत कराड अँड. रमेश साखरे यांची नोटरी पदी निवड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी वकील संघाचे अँड.वंसतराव फड अँड.श्नीकांत कराड अँड.रमेश साखरे अँड.संध्या धनराज मुंडे  अँड.कल्पना सतीश देशमुख यांची बीड जिल्ह्याकरिता भारत सरकारच्या न्याय व विधी मंत्रालयाने आज नोटरीपदी नियुक्ती केली. नोटरीपदी नियुक्त झालेल्या सर्व वकीलांचे वकील संघाचे अध्यक्ष श्री. पी.एम.सातभाई सचिव अँड.उषा दौंड अँड.व्हि.बी.नागरगोजे अँड.प्रकाश मराठे अँड.जीवनराव देशमुख विधीज्ञ.अँड.हरीभाऊ गुट्टे अँड.मिर्झा अँड.माधवराव मुंडे अँड.बी.एस.मुंडे अँड.दिलीप स्वामी अँड.डि.एल.उजगरे.अँड. वंसतराव फड.अँड. आर.व्ही.गित्ते.अँड.टि.के.गोलेर अँड.डि.पी.कडबाने अँड.राजेश्वर देशमुख  अँड.प्रदिप गिराम.अँड.जगन्नाथ आंधळे अँड लक्षमण अघाव अँड.दत्तात्रय आंधळे  अँड.डि.एस.उजगरे अँड.दत्ता कराड अँँड. सचिन सोळंके अँड.कल्याण सटाले अँड.मार्तँग शिंदे अँड.लक्षमण गित्ते अँड.ज्ञानोबा मुंडे अँड.अमोल सोंळके अँड.सुभाष गित्ते अँड.गजानन पारेकर अँड. मोहन कराड अँँड. सायस मुंडे अँड.नरवणे अँड.प्रल्हाद फड.अँड.सुनिल सोनपीरअँड.अँड.वाय.आर.सय्यद. अँड.राहुल सोळंके अँड.प्रविण फड अँड.धनाजी कांबळे अँड.केशव अघाव.अँड.रूद्र कराड ईत्यादी उपस्थित होते.

कान बहिरे अन्‌ नजर तल्लख ठेवल्यास समाजाची प्रगती- पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने

माध्यमांनी जोपासावी सामाजिक बांधिलकी-इंजि.शरद तांदळे

इंजि.नवनाथ घाडगे यांना नगरभूषण, अलखैर पतसंस्थेस सद्‌भावना,तर डॉ. आनंद देशपांडे यांना युवागौरव पुरस्कार प्रदान

दै.वार्ताचा 11 वा वर्धापन दिन साजरा

महादेव गित्ते 
===============  
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
समाजातील आजचे चित्र बदलण्यासाठी आपल्या आई-वडिलांची मनोभावे सेवा करा त्यांच्या शिवाय दुसरा ईश्वर नाही.अवांतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामात सचोटी आणि सातत्य ठेवा.तसेच कान बहिरे अन्‌ नजर तल्लख ठेवली तरच प्रगती साधता येते आणि हाच खरा यशाचा मंत्र आहे. असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.तर माध्यमांनी सामाजिक  बांधिलकी जपली पाहिजे आज माध्यम जगतामध्ये जे काही चित्र आहे.ते पाहिल्यानंतर सामान्य माणसाला भिती वाटू लागली आहे.ती भिती दूर करण्याचे काम माध्यमांनी करावे,अशी अपेक्षा इंजि.शरद तांदळे यांनी व्यक्त केली.अंबाजोगाई येथे दैनिक वार्ताचा 11 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अंबाजोगाईचे भूमिपुत्र तथा मुंबई येथे बृहन्मुंबई महानगर पालिकेत कार्यकारी अभियंता असलेले इंजि. नवनाथ घाडगे पाटील यांना नगरभूषण, अंबाजोगाई येथील अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेस सद्‌भावना पुरस्कार तर पुणे येथील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ तथा अंबाजोगाईचे भूमिपुत्र डॉ.आनंद देशपांडे यांना युवागौरव पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने,इंजि. शरद तांदळे व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई येथील माजी नगराध्यक्ष तथा बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने तर प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील युथ आयकॉन शरद तांदळे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सौ.अंजलीताई घाडगे,सामाजिक कार्यकर्ते बबनराव आपेट,मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर,पुणे येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.पंकज सुगांवकर व दैनिक वार्ताचे संपादक परमेश्वर गित्ते उपस्थित होते.यावेळी  मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  या प्रसंगी बोलतांना पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी सामाजिक  प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून आजच्या मोबाईलवेड्‌या तरूण पिढींवर प्रहार केला. आज सर्वात जास्त रुग्ण हे डोळ्यांच्या आजाराचे,मानेच्या आजारांचे आणि इतर आजारांचे दिसून येत आहेत. मोबाईलचा अतिवापर झाल्याने अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. समाज हा वेगळ्या दिशेने जात असून त्यासाठी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. सामाजिक स्थान डळमळीत होईल की काय? अशी भिती वाटू लागली आहे. कारण घरातील संवाद हा कमी होत चाललेला आहे. त्यामुळे घरांमधील अंतर हे वाढत असल्याचे दिसत आहे.प्रगती साधावयाची असेल तर आपले कान बंद ठेवावे लागतील.कारण, समाजामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी पेरणारे असतात त्याकडे लक्ष जाणार नाही आणि नजर तल्लख ठेवली तर आपला उद्देश जोपर्यंत साध्य होत नाही. तोपर्यंत त्यापासून हटवायची नाही. कुटुंबामध्ये आई-वडिलांवर प्रेम करा.त्याच्याशिवाय काहीही नाही.आई-वडिलांची सेवा केल्यास खूप आनंद आणि आशीर्वाद मिळत असतात. वार्ता समुहाने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे.कारण,चांगले काम करणाऱ्याचे कोणी कौतुक केले तर त्याचे मनोबल वाढत असते म्हणून अशा उपक्रमांची देखील समाजाला गरज असते. 
यावेळी बोलतांना इंजि. शरद तांदळे म्हणाले की,माध्यम जगतांमध्ये पाहिल्यानंतर समाजाचा समतोल बिघडू लागला असल्याचे दिसत आहे. कारण टीआरपीसाठी अनाठायी गोष्टी व अनाठायी विषय लादले जात आहेत.परवाच्या वेगवेगळ्या घटनांकडे आपण कसे पाहतो? किंवा कशा पद्धतीने पाहिले पाहिजे.हे माध्यमांनी सांगितले पाहिजे.परंतु माध्यमं एवढी आक्रमक आणि पुढं असतात की त्यावरून सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांपेक्षा त्यांचाच अतिरेक व अतिउत्साहीपणा दिसून येतो.त्यामुळे माध्यम क्षेत्राची विश्वासार्हता डळमळीत होऊ लागली आहे.माध्यमांकडं पाहून जगाची आणि देशाची वाटचाल सुरू असते.दर्पण म्हणजे आरसा ज्या माणसाच्या सुंदरतेची व कुरुपतेची छबी त्या दर्पणात दिसते अशा दर्पणानेच सामान्यांची साथ सोडली तर समाज संपूर्ण भरकटेल तेव्हा माध्यमांनी सामाजिक बांधिलकी जपून आपले कर्तव्य अदा करावे, अशी अपेक्षा इंजि.शरद तांदळे यांनी व्यक्त केली.  
तर अध्यक्षीय समारोप करतांना राजकिशोर मोदी म्हणाले की,अंबाजोगाई शहर व परिसरात वार्ता समुहाचा प्रभाव आहे. सामाजिक भान राखून या वृत्तपत्राने आपली भूमिका निभावलेली आहे.सामाजिक स्तरावर वार्ता समुहाचा वेगळा वाचक वर्ग आहे. अंबाजोगाई शहराच्या राजकीय आणि सामाजिक जडण-घडणीमध्ये वार्ता समुहाचे योगदान निश्चित आहे.या वृत्तपत्राने सर्व विषयांना हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यातून सामाजिक समतेचा संदेश दिला जातो.वार्ता समुहाने पुरस्कार देऊन काम करणाऱ्या लोकांचा सन्मान केला आहे व त्यांचा उत्साह वाढवला आहे.अंबाजोगाई शहराच्या भूमिपुत्रांनी राज्यात आणि राज्याच्या बाहेर व परदेशात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवलेला आहे. ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. वार्ता समुहाने आपले कर्तव्य पार पाडत असतांना वेगवेगळ्या घटकांवर लक्ष केंद्रित केलेले आहे. त्या घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले. 

नगरभूषण पुरस्काराने वाढली जबाबदारी-इंजि. नवनाथ घाडगे पाटील
===============
    ज्या गावामध्ये येण्यासाठी माझ्याकडे साधी सायकल नव्हती. दररोज बारा कि.मी. चा प्रवास पायी पार करून शिक्षणासाठी येत होतो. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.  परंतु शिक्षणाने जगण्याचा नवा मार्ग दाखवला आणि आईवडिलांनी शिक्षणासाठी बळ दिले. गेल्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असतांना अनेक चढउतार पाहिले आणि त्यातून मार्ग काढत गेलो परंतु आज वार्ता समुहाने मला नगरभूषण पुरस्कार देऊन माझा सन्मान केला हा निश्चितच जीवनातील सर्वोच्च क्षण आहे. कारण एक अभियंता म्हणून असेल किंवा एक मराठा सेवा संघाचा पदाधिकारी म्हणून असेल राज्यभर  काम केले. पण माझ्या कामाची दखल माझ्या गावाने घ्यावी आणि त्याचा कौतुक सोहळा आयोजित करावा ही खूप मोठी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. वार्ता समुहाचा हा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर आता जबाबदारी वाढलेली आहे. परंतु तेवढीच ऊर्जा देखील मिळाली आहे. एवढं मात्र, खरे असे मत  नगरभूषण पुरस्कारप्राप्त इंजि. नवनाथ घाडगे पाटील यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.


वार्ता समुहाने दिली शाबासकीची थाप-शेख उमर फारूख
===============
अंबाजोगाई शहर आणि परिसरात अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेने समाजातील छोट्या-छोट्या घटकांना पुढे आणण्यासाठी आर्थिक बळ देण्याचे काम केले. जो मार्ग अल्लाहने दाखवला त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न अलखैर पतसंस्थेने केलेला आहे. समाजातील आर्थिक दारिद्रय संपले पाहिजे आणि उपेक्षित व वंचित घटकांना प्रवाहामध्ये आणले पाहिजे.या भूमिकेतून अलखैर संस्थेने अनेकांना अर्थसाह्य उपलब्ध करून दिलेले आहे.या कामामध्ये समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील व्यक्तींचे योगदान लाभले.त्यामुळे ही पतसंस्था नावारुपाला आली.आज साधारणतः 10 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे.ही फक्त प्रामाणिक व निःस्वार्थी सभासद, ग्राहक आणि कर्जदारांच्या नियमित फेडीमुळे होऊ शकले. हजारो गोर-गरीबांच्या व सर्वसामान्यांच्या घरामध्ये आशेचा नवा किरण अलखैरने दाखविण्याचे काम प्रामाणिक काम केलेले आहे.अशा कामाची दखल वार्ता समुहाने घेतली आहे.त्यामुळे आमच्या कामाची गती अधिक वाढण्यास मदत मिळणार आहे. 


ज्यांनी घडवले त्यांच्याकडूनच सन्मान हा भाग्याचा क्षण-डॉ.आनंद देशपांडे
-------------------------
अंबाजोगाई शहरात पहिली ते वैद्यकीय शिक्षण पार पडले.या शहराने मला शिकवण्याचे आणि घडवण्याचे काम केले. विशेष म्हणजे माझे वडील.प्रा.ए.बी. देशपांडे यांनी व माझ्या आईने चांगले संस्कार करून पुढे जाण्याचे बळ दिले.शिवाय गुरुजन वर्ग आणि या गावातील प्रत्येक माणसाने माझ्या कामाचे कौतुक केलेले आहे.त्या कामाची पावती आज खऱ्या अर्थाने मिळाली असल्याची माझी भावना आहे. पुण्यासारख्या शहरात काम करत असतांना अनेक माणसं येतात, भेटतात आपलं दुःखं सांगतात त्यांच्या निवारण्यासाठी माझा प्रयत्न असतो शिवाय अंबाजोगाई येथूनही अनेक नेत्ररुग्ण येतात आणि उपचार करून जातात ज्या शहरामध्ये मी शिकलो,घडलो त्याच शहरानं मला  युवागौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं हा माझ्यासाठी जीवनातील अमुल्य ठेवा आहे. या उंचीपर्यंत येण्यासाठी माझी पत्नी आणि माझं कुटुंब समर्थपणे माझ्या पाठीशी राहिलं शिवाय  या गावातील सर्वस्तरांतील नेतृत्वांनी माझे कौतुक करून पुढे जाण्याचे बळ दिले. त्याबद्दल मी वार्ता समुहाचा आणि तमाम अंबाजोगाईकरांचा ऋणी आहे.हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणा देणारा असणार आहे. यामुळं माझ्या कामाची गती निश्चितच वाढेल एवढं मात्र नक्की.
प्रारंभी स्व.द्रौपदीबाई गित्ते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन गोविंद महाराज केंद्रे यांनी केले प्रास्ताविक  संपादक परमेश्वर गित्ते यांनी तर आभार प्रदर्शन गजानन मुडेगांवकर यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वार्ता परिवार,अंबाजोगाई पत्रकार संघ,तालुका पत्रकार संघ अंबाजोगाई,मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार  संघ,शाखा अंबाजोगाई आणि गुड मॉर्निंग ग्रुप अंबाजोगाईने परिश्रम घेतले.या कार्यक्रमास   महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

योगेश्वरी रोटरीने तालुक्यातील 5 शाळांना दिल्या प्रत्येकी एक हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या भेट


महादेव गित्ते
===============
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-  येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योेगेश्वरीच्या वतीने तालुक्यातील कुंबेफळ , डोंगरपिंपळा,राजेवाडी, भारज आणि मांडवा पठाण या पाच शाळांना एक हजार लिटर क्षमतेच्या पाच पाण्याच्या टाक्या भेट देण्यात आल्या.ग्रामिण भागात शिकणा-या विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.


कुंबेफळ येथील जयप्रभा माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.पृथ्वीराज साठे,शिवाजी खोगरे, नगरसेवक मिलींद बाबजे,मुरलीनाना तोडकर,सुर्यकांत कसबे,अशोक सोनवणे, मुख्याध्यापक बी.एस.पवार आदींची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.एस.यादव यांनी केले तर उपस्थितांचे आभार बी.एस.मस्के यांनी मानले.भारज येथील कार्यक्रमात श्रीराम माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका एन.एल.ढाणे, अ‍ॅड.अनंतराव जगतकर,सदाशिव सोनवणे,शिक्षक टी.आर.गायकवाड, एन.डी.तिडके यांची उपस्थिती होती.
डोंगर पिंपळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात जनार्धन मुंडे,दिलीप खांडेकर, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत साबळे , सहशिक्षक अनंत निकते,बालासाहेब भणगे हे उपस्थित होते. तसेच राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगीराज गडकर तर यावेळी अशोक गडकर, परमेश्वर गडकर, बालासाहेब गडकर, कृष्णा कदम,प्रविण काशिद,शिक्षक बळीराम गायके, बिभीषण सोमवंशी, पांडुरंग नरवडे, विजयकुमार रापतवार, बालासाहेब माने, श्रीनिवास मोरे आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील मांडवा पठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.रुपालीताई राजेमाने तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक बबनराव लोमटे, सुधाकर जोगदंड, एस.जे.पवार, मुख्याध्यापक आर.एस.तट, पी.जे.चव्हाण,शालेय समिती सदस्य अफरोज पठाण,ईरे,मिलींद जोगदंड,अखिल पठाण, मोटे मामा,रूद्राक्ष, जाधव आदी उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचे अध्यक्ष पांडुरंग पाखरे,सचिव सर्जेराव मोरे,नियोजित अध्यक्ष,सदाशिव सोनवणे,माजी अध्यक्ष श्रीरंग चौधरी,सदस्य जनार्धन मुंडे,धनराज मोरे,अ‍ॅड.अनंतराव जगतकर,मनोहर कदम, पुरूषोत्तम वाघ, धैर्यशील गायकवाड आदींसहीत इतरांनी पुढाकार घेतला.

विद्यावर्धिनी विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात साजराथोर वैज्ञानिक सी.वी.रमन यांच्या प्रतिमेचे पुजन; विद्यार्थ्यांना सांगितले प्रयोगाचे महत्व

परळी वैजनाथ दि.28 (प्रतिनिधी) :-

नविन शक्तीकुंज वसाहतीतील विद्यावर्धिनी विद्यालयात आज गुरूवार दि.28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

विद्यावर्धिनी विद्यालय येथे आज गुरूवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी थोर वैज्ञानिक सी.वी.रमन यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यावर्धिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक उन्मेष मातेकर यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी विज्ञान विषयाचे शिक्षक राजेश्वर निला, बालासाहेब हंगरगे, संजय कराड, तीळकरी, राजेश मुंडे,आत्माराम मुंडे, ज्ञानेश्वर चिक्षे, दादाराव सुर्यवंशी,  स्वप्नील हंगे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर भाषणांना सुरुवात झाली.विज्ञान विषयाचे शिक्षक निला यांनी विज्ञानाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच मुलांना वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल माहिती सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रयोगाचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. या प्रयोगाच्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण  होऊन प्रयोगाबद्दल गोडी लागण्यास मदत झाली. मुख्याध्यापक उन्मेष मातेकर यांनी वेगवेगळ्या थोर शास्त्रज्ञांबद्दल व त्यांच्या प्रयोगाबद्दल माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालासाहेब हंगरगे यंानी तर आभार प्रदर्शन इयत्ता 9 वी चा विद्यार्थी प्रभाकर माणिक गित्ते याने केले.

संजयकुमार सोनवणे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


महादेव गित्ते
------------------------------
लोणी (प्रतिनिधी) :- 
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील रहिवासी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव ता.जामखेड या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक संजयकुमार सोनवणे यांना त्यांचे शैक्षणिक,सामाजिक व धार्मिक कार्य बघून ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
संजयकुमार सोनवणे हे मूळचे संगमनेर तालुक्यातील शेडगाव चे रहिवाशी आहेत.नोकरीच्या निमित्ताने ते लोणी खुर्द येथे स्थायिक झाले आहे.आता पर्यंत त्यांनी राहाता, संगमनेर, जामखेड या तालुक्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदुर्खी खुर्द व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हार बु.येथे कार्यरत असतांना अनेक सामाजिक उपक्रम पार पाडले. डिजिटल वर्ग तयार केले.अपंगांसाठी असलेल्या 100 टक्के योजना राबविल्या,शालेय पोषण योजना यशस्वीपणे राबविली,स्वच्छ व सुंदर शाळा अ श्रेणीत आणली,शाळा सिद्धी श्रेणीत शाळा अ श्रेणीत आणली,लोक सहभागातून स्टेज निर्मिती केली,संगणक कक्ष स्थापन केला.ज्ञान रचनावादी वर्ग तयार केले,शालेय परिसरात डिजिटल कॅमेरे बसविले, गरीब विद्यार्थ्यांना स्व खर्चाने शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.चौदाव्या वित्त आयोगातून पाठपुरावा करून ग्रामपंचायत कडून मोठा निधी उपलब्ध करून शालेय विकास कामे केली.सहल, विज्ञान प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम, बाल आनंद मेळावे,विविध गुणदर्शन स्पर्धा,स्कॉलरशिप,टॅलेंट सर्च चित्रकला व रंगभरण, एक गाव एक गणपती इत्यादी सामाजिक व शालेय उपक्रम 100 टक्के राबविले.या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष तुषार दाभाडे,
उपाध्यक्ष देविदास बनकर,कार्यप्रमुख अर्जुन राऊत यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.पुरस्काराबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील,नामदार बाळासाहेब थोरात,नामदार शालिनीताई विखे पाटील,सुजय विखे पाटील, जि. प.अहमदनगर चे सीईओ विश्वजित माने, शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे, गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, पोपटराव काळे,यांनी अभिनंदन केले.श्री सोनवणे सध्या जि.प.प्राथमिक शाळा नायगाव ता.जामखेड येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

संत तुकाराम विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न अष्टपैलू विद्यार्थ्यांचेच भवितव्य उज्वल― प्रा टी पी मुंडे
सांस्कृतिक चळवळीतून कलाकार घडतात― प्राचार्य बंग

महादेव गित्ते
----------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
शिक्षणाबरोबरच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात चमकणाऱ्या अष्टपैलू विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मुंडे सर यांनी केले तर शालेय जीवनात स्नेहसंमेलना सारख्या सांस्कृतिक चळवळीतून चांगले  कलाकार घडतात असे मत वैद्यनाथ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ के आर बंग यांनी केले नागपूर कॅम्प येथील संत तुकाराम विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन उभय मान्यवर बोलत होते


       विद्यार्थी व पालकांची संवाद साधताना प्रा टी पी मुंडे सर यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळावर व सांस्कृतिक गुण आत्मसात करण्यावर भर द्यावा स्पर्धेच्या युगात असे अष्टपैलू विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले भवितव्य उज्वल करू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांना मोबाईल गेम सारख्या घातक प्रवर्ती पासून दूर ठेवण्याची जबाबदारी पालकांची असल्याचेही ते म्हणाले कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य के आर बंग यांनी सांस्कृतिक चळवळ ही विद्यार्थ्याचा दृष्टिकोन व्यापक करते यातूनच कलाकार घडतात असे सांगितले


     यावेळी प्रा नरहरी काकडे संस्थेचे सचिव तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भिसाराम  राठोड सर युवक नेते मंगेश गोवर्धन मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शंकर सोळंके यांनी व्यक्त करताना प्रा टी पी मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विकासाचा चढता आलेख विशद केला


       यावेळी नागनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष पुंडलिक आप्पा साळुंके नेते प्रभू आप्पा एस्के मोतीराम बापू सोळंके जि प सदस्य प्रदीप भैय्या मुंडे परळी मार्केट कमिटीचे संचालक रामकिशन घाडगे माणिकराव आप्पा सोळंके माणिकराव मुंडे बहादुरवाडी सुधाकर गायके रावसाहेब बनसोडे काशिनाथ पारवे बाबासाहेब गिरी माणिक बनसोडे आधी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रा टी पी मुंडे सर व अन्य मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धा व परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणारे रोहन शिरसागर कोमल पारवे सोपान धावते आकांक्षा मुळे गोविंद सोळंके अंजली सोळंके करण मुंडे सागर मुसळे मंजुषा सोमासे रामभाऊ मुंडे पूजा राठोड स्वप्निल बंडेवार महानंदा टेकाळे प्रियंका मुंडे प्रतिभा धावते दिपक घुगे आधी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तत्पूर्वी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली


       उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक शंकर सोळंके तसेच सहशिक्षक सुगंध गुट्टे नरहरी मुंडे वसंत डोंगरदिवे शंकर पवार अनिल पांचाळ ज्ञानोबा गडदे शिवकुमार लुले मनोज एस्के चंद्रकांत स्वामी मधुकर राडकर श्रीमंत कांगणे आदींनी केले उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा संदिपान मुंडे यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रतिभा धावते कुमारी गीतांजली मुंडे यांनी केले.

प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षण परिषद व मेळावा - भगवान पवार


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व भव्य शिक्षक मेळावा २ मार्च रोजी बालेवाडी पुणे येथे संघाचे नेते संभाजीराव थोरात व राज्यध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे. या शिक्षण परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष भगवान पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये जाहीर केेले आहे.
राज्यस्तरीय शिक्षण परिषद व भव्य शिक्षक मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे माजी कृषीमंत्री खा. शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे, शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिक्षण परिषदेमध्ये शिक्षाकांना जुनी पेंन्शन योजना लागू करणे, दि. २३ ऑक्टोबर २०१७ चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे, जिल्हा अंतर्गत बदली धोरणातील त्रुटी दूर करणे, सातव्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करणे, जिल्हातंर्गत बदलीमध्ये विस्थापित झालेल्या पती-पत्नीची सोय करणे, शिक्षकाकडील अशैक्षणीक कामे काढून घेणे या व इतर महत्वाच्या मागण्या मांडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शिक्षक बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष अंकुश डाके, जिल्हाध्यक्ष भगवान पवार, बाळराजे तळेकर, तात्यासाहेब मेघारे, नामदेव शिंदे, आन्नासाहेब लोणकर, विष्णु खेत्रे, रत्नाकर वाघमारे, गणेश सुळे, भाउसाहेब जोशी, भास्कर सोलाट, नंदकिशोर खरात, आव्हाड अर्जून सुतार, शिवाजी सानप, सचिन गायकवाड, सचिन दाभाडे , जगदिश मरकड, बाबासाहेब आलगुडे, उबाळे अशोक, बापूसाहेब तारूकर, गणेश सानप, वाजेद सर, रामराव पवार, ठाकरे के.पी., श्रीमती देवकर तारा, गंगा जंवजाळ, यांंनी अवाहन केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

ग्रामविकासा बरोबरच सर्व घटकांच्या विकासाला चालना देणारा अंतरिम अर्थसंकल्प ना. पंकजाताई मुंडेग्रामपंचायत इमारती, अंगणवाडी, रस्ते, पाणी पुरवठा योजनेसाठी भरीव तरतूद

महादेव गित्ते
--------------------------------------
मुंबई, (प्रतिनिधी) :- दि. २७ ------ राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करुन राज्यातील सर्व घटकांच्या विकासाला चालना देणारा, ग्रामविकासाला बळकटी देणारा आणि राज्य कुपोषणमुक्त करण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करणारा असा आज वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अंतरीम अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्याच्या ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली.

अंतरीम अर्थसंकल्पात पोषण आहारासाठी एक हजार ९७ कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यामुळे राज्याला कुपोषणमुक्त करण्याचे ध्येय लवकरच साध्य होऊ शकेल. कृषी विकास, सिंचन, आरोग्य, प्रधानमंत्री आवास योजना यांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. 

आजच्या अंतरीम अर्थसंकल्पात ओबीसी विभागासाठी २ हजार ८२९ कोटी रुपयांचा तर महिला व बालविकास विभागासाठी २ हजार ९२१ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. नवतेजस्विनी योजनेतून महिला उद्योजकांना सहाय्य करण्यात येणार आहे. समाजातील वंचित घटकांस सहाय्यभूत अशा विविध कल्याणकारी योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम, आदर्श अंगणवाड्यांची निर्मिती, ग्रामीण रस्ते, जलसंधारण, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा यासाठीही चांगली आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यातून ग्रामविकास चळवळीला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

वित्त मंत्र्यांनी आज २०१९-२० या वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. पुढील अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईपर्यंत आवश्यक असणाऱ्या खर्चाची तरतूद या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

परवानग्या नव्हत्या तर पंतप्रधानांनी जलपूजन कशाला केले... हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे...


छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक बांधकामावरून धनंजय मुंडे आक्रमक...


मुंबई (प्रतिनिधी) :-  दि. २७ फेब्रुवारी - देशाच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे... युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मुळात परवानग्या नव्हत्या तर पंतप्रधानांनी जलपूजन कशाला केले असा सवाल करतानाच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर या चर्चेत सहभाग घेताना धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या समितीचे प्रमुख विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना आठ पानी पत्र लिहीले होते त्यात सुद्धा त्यांनी या स्मारकाचे कंत्राट कशाप्रकारे चुकीचे दिले आहे हे सांगितले आहे. याचा खुलासा सभागृहात व्हायला हवा अशी मागणी मुंडे यांनी केली.

हे सरकार परवानग्या घेत नाही. छत्रपतींचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारले जाते आहे साधा पुतळा उभारला जात नाहीय हे लक्षात घ्या. सरकार स्मारकाची उंची कमी करते याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. सरकार याबाबत का भूमिका स्पष्ट करत नाही अशी विचारणाही धनंजय मुंडे यांनी सरकारला केली. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत विनायक मेटे यांनी दिलेल्या पत्राचा आणि कामाला स्थगिती का आली आहे याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. आमदार सतीश चव्हाण यांनीही यावेळी भूमिका मांडली. यावर सरकारतर्फे भूमिका मांडली जात नसल्याने विरोधी आमदारांनी गोंधळ घातल्याने सभापतीनी सभागृहाचे कामकाज तहकुब केले.

धनंजय मुंडेंनी पुन्हा पंकजाताई मुंडेंना नमवले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 25-15 योजनेचा ग्रामपंचायतींचा निधी बांधकाम खात्याला वर्ग करण्याचा निर्णय करावा लागला रद्दपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.27 ..........ग्रामविकास विभागाच्या 25-15 योजनेअंतर्गत परळी तालुक्यातील ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी द्यावयाचा निधी बांधकाम विभागाला वर्ग करण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही रद्द ठरवल्याने अखेर हा निर्णय रद्द करण्याची नामुष्की ग्रामविकास विभागावर आली आहे. त्यामुळे राजकीय सुडबुध्दीने विरोधकांच्या ग्रामपंचायतींना निधी न देण्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कृतीला पुन्हा एकदा चपराक बसली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामीण भागात मुलभूत विकास कामांसाठी ग्रामविकास विभागाच्या 25-15 योजनेतून ग्रामपंचायतींना रस्ते, नाल्या अशा किरकोळ कामासाठी निधी दिला जातो. दिनांक 28 डिसेंबर, 2016 रोजीच्या एका शासन निर्णया अन्वये ग्रामविकास खात्याने परळी तालुक्यातील 206 कामांसाठी 6 कोटी 52 लक्ष रूपयांचा निधी मंजूर करून तो बीड जिल्हा परिषदेला वर्ग केला होता. यातील 43 कामांच्या वर्क ऑर्डर झाल्या असताना 18 कामे पुर्ण झाल्यावर व उर्वरित कामे प्रगतीपथावर असताना व हे कामे करण्याची संबंधित ग्रामपंचायतींनी  तयारी दर्शविली असतानाही तब्बल एका वर्षानंतर ग्रामविकास विभागाने दि.30 डिसेंबर, 201% रोजी पुन्हा एक शासन निर्णय काढून यातील 101 कामे (3 कोटी 40 लाख) सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली होती.

    शासनाच्या या निर्णयाविरूध्द परळी तालुक्यातील वागबेट व इतर 6 ग्रामपंचायतींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 359/2018 अन्वये याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर न्यायमुर्ती बोर्डे व न्यायमुर्ती सोनवणे यांच्यासमोर सुनावणी होऊन दि.04 मे, 2018 रोजी निकाल राखीव ठेवण्यात आला होता. न्यायालयीन सुट्टीनंतर दि.05 जून रोजी या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने बांधकाम खात्याला निधी वर्ग करण्याचा ग्रामविकास विभागाचा दि.30/12/2017 चा शासन निर्णय रद्द ठरवला. हा निकाल देताना शासनाने ग्रामविकास विभागावर अतिशय तिव्र शब्दात ताशेरे ओढले असून, त्यात हा निर्णय पारदर्शक वाटत नाही तर अपारदर्शक आणि अनियंत्रित आहे, कायद्याच्या मुळ गाभ्यास बगल देऊन असा निर्णय  घेता येत नाही. 206 पैकी 101 कामेच का निवडली ? 3 लाखांपर्यंतची किरकोळ कामे असताना राज्यस्तरीय मोठे प्रकल्प करणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही कामे का वर्ग केली ? अंमलबजावणी करणारी यंत्रणा का बदलली ? असे अनेक प्रश्न उपस्थित करतानाच राजकीय हेतून हा निर्णय घेतलेला असल्याने त्याचे न्यायालयीन पुर्नविलोकन करणे क्रमप्राप्त ठरते असे आपल्या निकालात म्हटले होते.
    दिनांक 30 डिसेंबर, 2017 चा शासन निर्णय घ्यावा लागला होता, न्यायालयाच्या निकालानंतरही ग्रामविकास विभागाने निकालाप्रमाणे कारवाई न करता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

         सर्वोच्च न्यायालयाने या संबंधी 22 जानेवारी, 2019 रोजी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल कायम ठेवला. उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने ही चपराक लगावल्याने अखेर ग्रामविकास विभागाला दि.14 फेब्रुवारी 2019 रोजी आपले दि.30/12/2017 चे शुध्दीपत्रक रद्द करावे लागले. त्यामुळे ही कामे आता ग्रामपंचायतीमार्फतच करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

          सातत्याने पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतींसारख्या संस्थांना बळकटी देण्याऐवजी राजकीय द्वेषापोटी त्या कमकुवत करण्याचा हा प्रयत्न हाणुन पाडला असून, पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी न्यायालयीन लढाईत बाजी मारत पंकजाताईंना नमवले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्या- धनंजय मुंडेंची विधान परिषदेत मागणी


मुंबई (प्रतिनिधी) :- दि. 27 ----- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांनाही भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी आज विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.

भारतरत्न पुरस्कार प्राप्त माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसेच सामाजिक कार्यकर्ते स्व. नानाजी देशमुख,  प्रख्यात संगितकार स्व. भुपेन हजारीका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलतांना त्यांनी ही मागणी केली.  

या प्रस्तावावर बोलतांना सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वातंत्र
वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली.  त्याचा धागा पकडत मुंडे यांनी फुले दाम्पत्यांना हा पुरस्कार द्यावा अशी मागणी करतांना यासाठी आम्ही  अनेकवेळा मागणी केली, त्यासाठी सातत्याने भांडत आहोत.  परंतू भारतरत्न मिळण्यात क्रांतीसुर्य कमी पडत आहे की आमचे प्रयत्न की पडत आहेत असा प्रश्न उपस्थित केला. 

राष्ट्रपती होईपर्यंत काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत असणारे प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर मात्र मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असे कधीही वक्तव्य केलेले नाही.  त्यांनी कायम शिष्टाचार पाळला.  या देशातील काही राज्यपालांना मात्र याचा विसर पडतो आहे आणि ते उघडपणे मी पक्षाचा एखाद्या संघटनेच्या विचार सरणीचा कार्यकर्ता असल्याचे जाहीररित्या बोलत असल्याचा चिमटा त्यांनी काढला.  नागपूरमध्ये संघ कार्यक्रमात जाऊन त्यांनी सांगितलेल्या पाच मोलाच्या गोष्टीही त्यांनी वाचून दाखविल्या तसेच त्यांचा गौरव म्हणजे काँग्रेसचा विचारांचा नरेंद्र मोदी सरकारने केलेला गौरव आहे असा उल्लेख केला. 

आर.एस.एस. चे स्वयंसेवक असूनही नानाजी देशमुख हे पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञानवादी विचारांचे होते याकडे धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले तर भूपेन हजारीका हे शब्दांचे सौंदर्य आपल्या गाण्यातून मांडणारे महान व्यक्तीमत्व होते.  त्यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार हा त्यांचा सांगितीक कारकिर्दीचा गौरव असल्याचे उदगार काढले. 

या तीनही भारतरत्नांनी केलेले कार्य, दिलेले विचार खुप महान आहेत.  त्यांचे विचार त्यांनी सुरु केलेल्या सामाजिक कार्यातून यापुढेही सुरु राहील असा विश्वास मुंडे यांनी बोलतांना व्यक्त केला.

उपाययोजना, धनगर आरक्षण, प्रशांत परिचारक निलंबनाच्या मुद्यावर धनंजय मुंडे आक्रमकदेशाच्या संरक्षणापेक्षा भाजपाला निवडणुका महत्वाच्या वाटतात - धनंजय मुंडे यांची टीका

मुंबई, (प्रतिनिधी) दि. २८ :- देशाचं हित व राज्यातील जनतेची सुरक्षा विचारात घेऊन विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यास आम्ही सहमती दिली. परंतु सरकार आणि भाजप देशहिताला तिलांजली देत आहेत. पाकिस्तानविरुद्ध लढण्यासाठी लष्कराची आणि राज्यांतर्गत सुरक्षेसाठी पोलीसांची तयारी सुरु असताना, देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे मंत्री  मात्र "मेरा बुथ, सबसे मजबूत"चे कार्यक्रम घेत निवडणुकीच्या तयारीत गुंग आहेत. देशाच्या संरक्षणापेक्षा, युद्धातल्या विजयापेक्षा भाजपला निवडणुकीतला पराभव वाचवणं महत्वाचं वाटत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. 


विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रकार परिषदेत बोलताना श्री. धनंजय मुंडे यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप सरकारच्या खोटारडेपणावर कडाडून हल्ला चढवला. 

राज्याच्या अर्थथसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक, वंचित, उपेक्षित, दुर्बल, महिला, विद्यार्थी, युवक, व्यापारी, उद्योजक अशा कुठल्याही घटकाला न्याय मिळालेला नाही.  हा अर्थसंकल्प वस्तुस्थितीशी विसंगत आहे. शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी काय केले पाहिजे यासंदर्भातील आमच्या मागण्या, सूचना, शिफारशी आम्ही सभागृहाच्या पटलावर ठेवल्या आहेत. सरकारने त्यावर विचार करुन अंमलबजावणी करावी व त्यासंदर्भात आम्हाला कळवावे, असे आपण सभागृहात मांडल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.

या अधिवेशनात दुष्काळावर चर्चा होणे अपेक्षित होते. दुष्काळी उपाययोजना, शेतकरी कर्जमाफी, पिकविम्याचे अनुदान, केंद्राची मदत, जलयुक्त शिवार, टँकरने पाणीपुरवठा असे अनेक मुद्दे चर्चेला घ्यायचे होते, परंतु ते येऊ शकले नाहीत. त्यासंदर्भात आपण स्वतंत्रपणे सरकारशी लढणार आहोत, असे श्री. मुंडे म्हणाले. 

धनगर बांधवांना आरक्षण मिळण्याबाबतचा अशासकीय ठराव आपण सभागृहात मांडला. अधिवेशन चालू राहिलं असतं तर हा ठराव चर्चेला येऊन धनगर बांधवांना न्याय मिळण्यास मदत झाली असती. परंतु सरकार या मुद्यावर चालढकल का करते आहे ? 'टीस'चा अहवाल का दाबून ठेवण्यात आला ? धनगर आरक्षणावर सरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे, असं सांगण्यात आलं. परंतु यासंदर्भात कुठल्याच न्यायालयात प्रकरण नसताना, सरकार प्रतिज्ञापत्र कुठल्या न्यायालयात देणार आहे, हे स्पष्ट करावं, अशी मागणीही श्री. मुंडे यांनी केली.

देशाचा सैनिक आज सीमेवर लढत आहे, त्याच सैनिकांबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्ल अभद्र वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय शासनाकडून आज सभागृहात होतो, हे दुर्दैवी आहे. कामकाजाच्या शेवटच्या क्षणी आमदार परिचारक निलंबन रद्द करण्याच्या कृतीला विरोधी पक्ष म्हणून आम्ही कडाडून विरोध केला. परिचारकांचं निलंबन रद्द होणं हा सैनिकांचा अपमान असल्यानं आम्ही अखेरपर्यंत या निर्णयाला विरोध करु, असा निर्धार श्री. धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला.


श्री. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, भारतीय हवाई दलानं पीओके आणि पाकिस्तानमधल्या दहशतावादी तळांवर हल्ला करुन पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. त्याबद्दल सर्व विरोधी पक्षानी भारतीय सैनिकांचं अभिनंदन केलं.

 पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईत संपूर्ण देश भारतीय सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, याची ग्वाही आम्ही दिली. या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा होत्या. परंतु त्या पूर्ण करण्यात अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे. याचा पुनरुच्चारही श्री. मुंडे यांनी केला.

धनादेश अनादर प्रकरणात सहा महीने कारावास व दंडाची शिक्षा


सुभाष मुळे..
----------------
गेवराई,दि. २८ __ जय भवानी साखर कारखान्यास ऊस तोड़ वाहतूकदार जालींदर देवकर रा.दिमाखवाडी यांनी दिलेला धनादेश न वटल्याने व साक्षपुुराव्यात आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने गेवराई न्यायालयातील मा. न्या. एम. पी.एखे मॅडम यांनी आरोपी जालींंदर देवकर यास सहा महीने कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावली.
       याबाबत सविस्तर माहीती अशी की, जयभवानी साखर कारखान्यास सन. २०१० - २०११ या गाळप हंगामात जालींदर नामदेव देवकर यांनी जयभवानी कारखान्या सोबत ऊसतोड वाहतुकीचा करार केला होता व जयभवानी कारखान्याकडून सदर करारापोटी 3.००,०००/- रुपये उचल घेतली होती, परंतु आरोपी जालींदर देवकर हा करारा प्रमाणे जयभवानी कारखान्यावर कामास आला नाही व आरोपीने जयभवानी कारखान्याची फसवणूक केली. त्यानंतर जयभवानी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी  आरोपी जालींदर देवकर यांच्या मागे त्यांनी उचल घेतलेल्या रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावल्यानंतर जालिंदर देवकर यांनी जयभवानी साखर कारखान्यास ३,२९,०००/-रुपयाचा धनादेश दिला होता. नंतर जयभवानी कारखान्याने सदर धनादेश वटविण्यासाठी बँकेत जमा केला असता आरोपी जालींदर देवकर यांच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे सदरचा धनादेश अनादरीत झाला होता. त्यानंतर जयभवानी कारखान्याने आरोपी जालींदर देवकर यांच्या विरुद्ध मा.गेवराई न्यायालयात चलनक्षम दस्तऐवज अधिनियमाचे कलम १३८ अन्वये एस.सी.सी नंबर - २५/२०११ ही केस दाखल केली होती. सदर प्रकरणात आरोपी जालींदर देवकर विरुध्द साक्षीपुराव्यानूसार गुन्हा सिध्द झाल्याने गेवराई न्यायालयातील मा.न्या. एम.पी.एखे मॅडम यांनी आरोपी जालिंदर देवकर यास चलनक्षम दस्तऐवज अधिनियमाचे कलम १३८ अन्वये दोषी धरुन दिनांक २७ फेब्रुवारी २०१९ रोजी सहा महीन्याच्या कारावासाची शिक्षा व धनादेशाचे ३,२९,०००/- रुपये व नुकसान भरपाईचे १०,०००/- असे मिळून ३,३९,०००/- रुपये हे एक महीन्याच्या आत फिर्यादी जयभवानी साखर कारखान्यास देण्याची शिक्षा सुनावली आहे. 
      सदर निकालामुळे खोटे चेक देणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहेत. सदर प्रकरणात फिर्यादी जयभवानी साखर कारखान्याच्या वतीने गेवराई येथील अॅड. डि. एम. कुलकर्णी, शरद कुलकर्णी यांनी काम पाहीले व सदर प्रकरणात त्यांना अॅड. जयश्री कुलकर्णी, आंबादास कुलकर्णी व अॅड. बी.ई.निकम यांनी सहकार्य केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

पाथरीत आज श्रीराम मंदिराचा भूमीपुजन सोहळा


किरण घुंबरे पाटील
पाथरी:-कोणी निंदा कोणी वंदा राजकीय जिवनात मला सर्व धर्मीयांनी मनोभावे साथ दिल्याने माझे कर्तव्य आहे की जातिपाती च्या पलीकडे जाऊन मी माझे कर्तव्य केले पाहीजे हेच धोरण अंगिकारत हिंदू जनतेच्या मागणी नुसार आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या स्थानिक विकास निधितून पंचविस लक्ष रुपये खर्च करून शहरातील जुन्या पाणी टाकी जवळील श्रीराम मंदिराचा जिर्नोद्धार आणि भव्य अशा सभा मंडपाचा भुमीपुजन समारंभ व श्रीराम कथेचे प्रवचन आज १ मार्च शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता संपन्न होणार आहे.
या वेळी प.पु. परिव्राजकाचार्य श्री श्री १००८ स्वामी हरिषचैतन्यानंद सरस्वती महाराज   वेदान्ताचार्य एम.ए तत्वज्ञान काशी. यांच्या हस्ते या मंदिराच्या बांधकामाचे भुमीपूजन आणि रामकथेचे प्रवचन संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आ बाबाजानी दुर्रानी हे असणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून जि प चे माजी अध्यक्ष राजेश दादा विटेकर राहाणार आहेत. पाथरी शहरातील हे दुसरे राम मंदिर असून पहिल्या राममंदिरा साठी ही आ दुर्रानी यांनी सभामंडप बांधून दिला आहे. शहरातील अनेक ठिकाणच्या मंदिरांना ही आ दुर्रांनी यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत सभामंडप बांधून देत भाविकांच्या इच्छा पुर्ण केल्या आहेत.देश पातळीवर आयोध्येच्या श्रीराम मंदिराचा मुद्दा  गेली तीस वर्षा पासून निवडणुका जवळ आल्याकी हिंदू-मुस्लीम  वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतांना इथे पाथरीत मात्र हिंदू-मुस्लीम  या दोन्ही समाजात भाईचारा असून या श्रीराम मंदिराच्या जिर्नोद्धारा मुळे आ बाबाजानी दुर्रांनी यांचे हिंदू धर्मीयां मधून कौतूक होत आहे. काही मंडळी आ दुर्रानीच्या या कामगिरी मुळे नाक मुरडत असली तरी या मुळे मला काही फरक पडत नाही कारण गेली पस्तीस वर्ष पाथरीची सर्व जनता माझ्या पाठीशी खंबिर पणे उभी असल्या मुळेच मी राजकारणात यशस्वी झालो आणि शहरा सह तालुक्याचा विकास करण्या साठी प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रीया आ बाबाजानी दुर्रांनी यांनी व्यक्त केली. सर्व धर्मियांना समान न्याय मिळाला पाहिजे हेच माझे प्रथम कर्तव्य असल्याचे ही ते सांगतात.या वेळी महाप्रसाद होणार असून यात गावरान तुपाच्या लाडूची मिठाई ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमा साठी प्रमुख उपस्थिती म्हणून रा काँचे जेष्ठ नेते मुंंजाजी भाले पाटील, नगराध्यक्षा मिनाताई भोरे, उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्रानी, भावनाताई नखाते, मिराताई टेंगसे, दादासाहेब टेंगसे, सुभाष आबा कोल्हे, महादेवराव जोगदंड, मनुगुरू कानशुक्ले, तारेख खान दुर्रांनी, अॅड कालिदासराव  चौधरी, न प गट नेते जुनेदखान दुर्रानी, सभापती शिवकन्या ढगे, राकाँ तालुकाध्यक्ष एकनाथराव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष कल्याण चौधरी, नगरसेवक मंगलताई रिंकू पाटील, अर्पिताताई अलोक चौधरी, महादेवराव खारकर, गुंफाताई भाले आणि मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमा साठी मोठ्या संखेने उपस्थित राहाण्याचे आवाहन गजानन उंबरकर, प्रशांत चिद्रवार, विष्णू ढेरे, संजय हराळे, अरुन जोशी, पांडूरंग क्षिरसागर, पिंटू चिकने, प्रविण पाठक, अजय वांगिकर यांनी केले आहे.

किंगसन ग्लोबल शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. २८ __ यावेळी शाळेचे संचालक श्री.श्याम चाळक सर यांच्या हस्ते भारताला पहिला नोबेल पुरस्कार मिळवून देणारा विज्ञान आविष्कार चंद्रशेखर व्यंकट रमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गेवराई शहरातील किंगसन ग्लोबल स्कूल गेवराई मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. 
        यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चाळक सर यांनी विज्ञानाच्या अभ्यासातून काहीतरी शिकून त्याचा रोजच्या जीवनात अंमल करणे म्हणजे खऱ्या अर्थाने विज्ञान युगात जगणे होय. विज्ञान म्हणजे केवळ शाळेतील शिक्षकांचे प्रयोगवहीतील शेरे नव्हेत किंवा परीक्षेत मार्क मिळवण्याचा सोपा मार्ग नव्हे. विज्ञानाच्या अभ्यासातून काहीतरी शिकून त्याचा रोजच्या जीवनात अंमल करणे म्हणजे खऱ्या अर्थाने विज्ञान युगात जगणे होय. 'राष्ट्रीय विज्ञान दिना'च्या निमित्ताने विज्ञानाच्या वापरातून स्वतःचे आयुष्य सुखकर करणे होय. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना जेव्हा पुढे आली तेव्हा सरकारने त्या वेळचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. वसंतराव गोवारीकरांकडे यासाठी सुयोग्य दिवस कोणता याची चौकशी केली. डॉ. गोवारीकरांनी कोणाचा जन्मदिन-मृत्युदिन न निवडता भारताला पहिला नोबेल पुरस्कार मिळवून देणारा विज्ञान आविष्कार ज्या दिवशी सर चंद्रशेखर व्यंकट रामनांनी जगासमोर मांडला तो दिवस निवडला तोच तो आजचा विज्ञान दिन २८ फेब्रुवारी असे प्रतिपादन श्री. श्याम चाळक सर यांनी केले. 
    कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती दुर्गा पारीख  यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीमती कुलकर्णी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

Wednesday, 27 February 2019

युध्दजन्य सीमेवरील तणाव परिस्थिती असल्यामुळे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आज गुंडाळणार?


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : दि.२८ मुंबईला जारी करण्यात आलेला हाय अॅलर्ट यामुळे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवारीच संपवण्याचा विचार सुरू आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून त्याबरोबरच महत्त्वाचे व्यापारी-नौदलाचे बंदर आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची अशी अनेक आस्थापने आहेत.
 हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनी बुधवारी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. अधिवेशनामुळे विधान भवन परिसरात मोठा बंदोबस्तआहे. शिवाय अधिवेशन काळातील मोर्चांमुळे आझाद मैदान परिसरातही पाच ते सहा हजार पोलीस अडकून पडले आहेत. पोलिसांवरील हा ताण पोलीस अधिकार्यांनी  मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.  
 युद्धजन्य परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये दत्ता पडसलगीकर आणि सुबोध जैस्वाल यांनी सद्य परिस्थितीची माहिती दिली. त्यावर विधिमंडळाचे अधिवेशन लवकर संपवण्याबाबत चर्चा झाली. 
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यक्रम शनिवारपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. आज लेखानुदान मंजूर करून अधिवेशन गुंडाळले जाण्याची शक्यता असून, गुरुवारी सकाळी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.

एकल संघटनेच्या कार्यकर्त्या रुक्मीनी नागापुरे यांच्या बैठका सुरू
सुभाष मुळे..
----------------
बीड, दि. २८ ( प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील एकल संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रक्मीनी नागापुरे यांनी बीड तालुक्यामध्ये झंझावती दौरा सुरू झाला आहे.
       यामध्ये कुमशी, पाली, पालवन, वासनवाडी, तळेगाव, कळेगाव, आंबेसावली, उमरी नेकनुर तसेच बीड परिसरातील विविध गावामध्ये महिलांंच्या प्रश्नासाठी गाव भेटी अभियान सुरू केले असुन या अभियानमध्ये महिलांच्या राशनकार्ड, घरकुल, संजय गांधी, श्रावणबाळ या योजनेतील अडचणी जाणुन घेण्यासाठी संपर्क अभियान राबविले असुन या अभियानास प्रत्येक गावांंमध्ये प्रतिसाद मिळत असुन एकल संघटनेच्या जिल्हाध्यक्ष रक्मीनी नागापुरे या सर्व स्तरातील महिलांच्या अडीअङचणी जाणुन घेत आहेत. विशेषत गेल्या आठवड्यात न्यु दिल्लीतील मोर्चा मधील पेंंशन वाढीव संदर्भात चर्चा जास्त प्रमाणात होत असल्याचे जानवत आहे.
       यावेळी या अभियानामध्ये मिना कोल्हे, वैष्णवी कोल्हे, मंदा जाधव, सुनिता कापसे, कमल सोनवणे, सुनिता सोनवणे इत्यादी महिला कार्यकर्त्या व एकल संघटनेच्या कार्यकर्त्या रुक्मीनी नागापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. याबाबत रक्मीनी नागापुरे यांनी
सांगितले की, आमच्या संघटनेची पदाधिकारी यांच्या निवडणूका पुढील महिन्यात होणार असून येणाऱ्या २३ ऑक्टोबर रोजी एकल महिलांना या निवडणूका विषयी पारदर्शक माहिती होणार असुन यात गोरगरिबांना व महिलांच्या प्रश्नासाठी शेवटपर्यँत सोबत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

स्व नितिन महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा


प्रतिनिधी
पाथरी:-येथील स्व नितिन कला व विज्ञान वरीष्ठ महाविद्यालयात गुरूवार २८ फेब्रुवारी रोजी सी व्ही रमन यांची जयंती राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख पाहुने म्हणून प्रा डॉ मारोती खेडेकर, प्रा डॉ भारत निर्वळ, प्रा डॉ हरी काळे, प्रा विरकर, प्रा खवल, प्रा नाईकनवरे, प्रा शिंदे मॅडम, प्रा उदावंत मॅडम यांची या वेळी उपस्थिती होती.या वेळी आयुर्वेदीक वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.त्याच बरोबर विज्ञान दिना निमित्त घेण्यात आलेल्या परिक्षेचे बक्षिस वितरण या वेळी करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा रंजित गायके यांनी केले तर आभार प्रा डॉ गायकवाड यांनी मानले या कार्यक्रमा साठी महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा अभिनय हा सान्निध्यातूनच निर्माण होतो असतो - रेणुका शहाणे


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. २७ ( प्रतिनिधी ) लहान मुलांमध्ये उपजत कलागुण असतात, त्यामुळे शाळेने अभ्यासाशिवाय लहान व मोठे कार्यक्रम घेतले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेह संमेलनाचे आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध ज्यूनियर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी येथे बोलताना केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या स्नेह संमेलनात त्या बोलत होत्या.
       व्यासपीठावर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिल आईटवार, पत्रकार सुभाष सुतार, राम महासाहेब , शाळेच्या संचालिका सौ. सिता महासाहेब यांची उपस्थिती होती.
शहरातील महासाहेब बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री बाल संस्कार केन्द्रातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आयोजित करण्यात आलेल्या स्नेह संमेलनात सहभाग घेऊन विविध प्रकारच्या बालगितांवर अभिनय, फॅन्सी ड्रेस व बहारदार नृत्य करून धमाल केली. चिमुकले विद्यार्थी छत्रपती संभाजी राजे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, वासुदेव, भाजीवाली, परी, सैनिकांच्या वेशभूषा आदी आकर्षणाचा विषय ठरला. पाहुणे कलाकार व  प्रसिद्ध लावणी नृत्य कलेत गोल्ड मेडल विजेते इंगळे यांनी...नटले तुमच्या साठी आणि इच्चार काय हाय..तुमचा पाहुणं, या दोन ठेका धरायला लावणार्‍या  ठसकेबाज लावणीवर नृत्य करून कार्यक्रमात रंगत आणली. महिला प्रेक्षकांनी लावणी नृत्याला मोठी दाद दिली. शाळेतील विना रणबावळे, कांबळे सायली, कांबीकर यतार्थ, लोखंडे सोनाक्षी, कदरे मयुर, मोमीन मायरा, लोकरे अनन्या, मयूर जाधव आराध्या , आराध्या सावंत, घिघे मयूर, तेजू चव्हाण, राठोड शुभम, चव्हाण स्वप्नील, चव्हाण गायत्री, पवार गिरिदुर्ग, भोसले देवेश, ऋतुराज आडगावकर, गिरी स्वराज , सोनाग्रा हर्षू, भिसे आराधना , पंडित देवराज ,शिवराज सोनाग्रा, आराध्या कांबळे, करांडे वेदांत,  स्वरा देशमुख, सुरेंद्र भोसले , देवेश गायत्री ,चव्हाण पवार,  पवार सुरेश, आसाद मनियार, गिरिदुर्ग भोसले, देवेश ऋतुराज , गिरीजा देशमुख, श्रेयस पवार या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. बहारदार संचलन दीक्षा सावंत यांनी करून आभार राम महासाहेब यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायत्री बाल  संस्कार शाळेच्या शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

तालुक्यातील समस्या सोडवा अन्यथा आंदोलन. भारिप बमस ने दिले तहसीलदार यांना निवेदनसंग्रामपूर  [प्रतिनिधी] विविध समस्या सोडविण्यात याव्या अशी मांगणी भारिप बहुजन महासंघच्या वतीने तहसीलदार संग्रामपुर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे या निवेदनामध्ये नमुद आहे कि संग्रामपुर तालुक्यातील लाभार्थ्यांनी नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज दिलेले आहे त्यांना नविन शिधापत्रिकेचे वाटप त्वरित करण्यात यावे, दुष्काळी मदत ची हेक्टरी मर्यादा वाढविण्यात यावी, तालुक्यामध्ये अवैध रेतीवाहतुक बंद करुन घरकुल लाभार्थ्यांना 8 ते 10 ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्यात यावी , सध्या दुष्काळ असल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे म्हणुन रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावपातळीवर त्वरीत कामे सुरू करण्यात यावी यासह आदी मागण्यासाठी निवेदन देण्यात आले असून शासनाने याची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला , निवेदनावर, ता अ उत्तम उमाळे , जि. महासचिव हमीध पाशा, जि. सचिव गणेश वहितकार, जि. सहसंघटक आत्मराम वसुलकार, मतदारसंघ प्रमुख शरद बनकर,  सदाशिव भिलंगे,  टि के वानखडे, अमोल वानखडे , पंकज शेगोकार , सह आदी कार्यकर्त्यांचे स्वाक्षऱ्या आहेत.

वरवट बकाल येथे शिवसेनेच्या वतीने वायुदलाच्या कारवाईचे कौतुक पेढे वाटुन फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा


संग्रामपुर [ प्रतिनिधी] आतंकवाद्याने जम्मु काश्मीर येथील पुलवामा हल्ल्यात शहिद जवानाच्या बदला घेत भारतीय वायुसेनेने पाकिस्तान वर केलेल्या कारवाईचा शिवसेनेच्या वतीने वायुसेनेच्या सैनिकांचे कौतुक करीत  वरवट बकाल येथील शिवाजी चौक येथे  शिवसैनिकांनी  बसस्थानक परिसरात पेढे वाटुन फटाके फोडून जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला  शिवाजी महाराज चौकात नागरिक प्रवाशी शिवसैनिकांनी  एकत्र येऊन पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान झिंदाबाद चे नारे दिले यावेळी भाजपाचे राजेन्द्र ठाकरे , शिवसेनेचे युवानेते  प्रल्हाद अस्वार, अमोल बकाल, चेतन देशमुख, विठ्ठल बकाल, बबलू काकड, अनंत वानेरे, गोपाल देशमुख, मनोज बकाल, संतोष देउकार, दयावंत इंगळे, नितीन बकाल सह नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते .

कारंजा येथे मराठी भाषादिन कार्यक्रम साजरा


संस्कृती जोपासण्यासाठी मराठी भाषा टिकविण्याची गरज असल्याचा मान्यवरांच्या मनोगतातून उमटला सूर

फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)
वाशिम-कारंजा आगाराच्या वतीने कारंजा येथील बसस्थानकात 27 फेबु्रवारी रोजी दुपारी 11 वाजता मराठी भाषादिन कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आगारप्रमुख एम आर नावकर, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अनुप नांदगावकर, सामाजिक न्यायविभाग वाशिमच्या सुजाता शिंगारे, कारंजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल पाटील भोयर, प्रा कृष्णकांत लाहोटी, दैनिक लोकमत प्रतिनीधी प्रफुल्ल बांनगावकर, गुरूदेव सेवा समितीचे आजीवन प्रचारक अरूणभाउु सालोडकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष विजय काळे, पालक अधिकारी किरण इंगळे, यांची उपस्थिती हेाती. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आपण आपली मातृभाषा मराठी विसरू नये तसेच संस्कृती जोपासण्यासाठी मराठी भाषेची गजर असल्याच्या उद्देशाने राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष ना. दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून 27 फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिन राज्यातील विविध आगाराच्या वतीने साजरा केल्या जातो. या दिवसाला “मायबोली मराठी भाषा दिन”, “मराठी भाषा गौरव दिन”, “जागतिक मराठी राजभाषा दिन ” अशा विविध नावांनी संबोधिल्या जाते. याच अनुषंगाने कारंजा आगाराने देखील या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कवीवर्य वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषादिन म्हणून साजरा केल्या जातो. मराठी माणूस आता जगाच्या कानाकोपÚ्यात पोहचला आहे.  कोणी शिक्षणासाठी, व्यवसायासाठी तर कोणी नोकरी साठी. आपली मुले हिंदी, इंग्रजी आणि दुसÚया भाषेमधील चित्रपट, कार्यक्रम पाहतात. दुसÚ्या भाषेची पुस्तके, मॅगझीन वाचतात, या सर्वांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. ही वस्तुस्थिती आहे परंतू भविष्यात भारतीय परंपरा व संस्कृतीचे जतन करण्यासाठी मराठी भाषेचा वापर होणे गरजेचे असल्याने या दिवसाच्या माध्यमातून मराठी भाषेचे महत्व जनतेपर्यंत पोहचल्या जाते. कारंजा आगाराच्या वतीने आयोजित मराठी भाषादिन कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून काळाच्या ओघात आजही मराठी भाषेचा गोडवा कायम आहे. त्यामुळे संस्कृती जोपासण्यासाठी मराठी भाषा टिकविण्याची गरज असल्याचा सूर उमटला. यावेळी एस टी कर्मचारी प्रदिप येसनकर, यांनी मराठीतील काही कविता साद र करून उपस्थितांनी वाहवा मिळविली. कार्यक्रमानंतर प्रवाशांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी मिठाईचे देखील वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शैलेश राठोड यांनी केले. कार्यक्रमाला प्रवाशांसहीत एस टी कर्मचायांची उपस्थिती होती. 

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी तरूणांनी पुढे यावे - व्हि.एल.कोळी

किरण घुंबरे पाटील

शिवजयंतीनिमित्त खेर्डा येथे शहिदांच्या कुटुंबियांना मदत व रक्तदान शिबिर संपन्न


पाथरी- शिवजयंती निमित्त खेर्डा येथे शहिदांच्या कुटुंबीयांना मदत व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शहिदांच्या कुटुंबीयांना मदती साठी तरूणांनी पुढे यावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व्हि.एल.कोळी यांनी केले.
           याकार्यक्रमाचे उद् घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी व्हि.एल.कोळी हे उपस्थित होते.तर अध्यक्षस्थानी पाथरी तहसिलचे नायब तहसिलदार मा.श्री.अशोकराव नवगिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे तालुका समन्वयक मा.श्री.तुकाराम पौळ,हुजुर साहेब ब्लड बॅकेचे मा.श्री.ज्ञानेश्वर खटींग,मा.श्री.विजयकुमार सिताफळे,मधुकरराव सिताफळे,अविनाश आम्ले,डाॅ.विलास सिताफळे,दगडू आम्ले आदी उपस्थित होते. 
            कार्यक्रमाची सुरुवात छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद सिताफळे यांनी केले.यानंतर शहिद जवान शुभम मस्तापुरे यांच्या आई सौ.सुनिता सुर्यकांत मस्तापुरे व विशाल गोंडगे यांना मान्यवरांच्या हस्ते रोख विस हजारांची मदत करण्यात आली.पुलवामा दहशतवादी हल्ल्यात विरमरण आलेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित सर्व मा.श्री.तुकाराम पौळ,मा.श्री.ज्ञानेश्वर खटींग यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षिय समारोपात मा.श्री.अशोकराव नवगिरे यांनी युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन करुन त्यांनी स्वःत रक्तदान केले.रक्तदान शिबिरामध्ये पंधरा युवकांनी रक्तदान केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णुप्रसाद सिताफळे यांनी तर आभार प्रदर्शन शरद सिताफळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालासाहेब लांडगे,निळकंठ पावडे,डाॅ.परमेश्वर जाधव,बाळासाहेब आम्ले,नारायण सिताफळे,संतोष व-हाडे,दत्ता मस्के,प्रविण सिताफळे,बाबाराव गायके,सुरेश सिताफळे, शंकर आम्ले,गणेश सिताफळे,गोपाल आम्ले,अशोक गायके आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास गावातील विद्यार्थी,युवक व पुरूष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असंघटित कामगारांसाठी ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना सुरू


बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी 
मुंबई :दि. २७ केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेनुसार मंत्रालयात अंतिम अर्थसंकल्पात या पेन्शन योजनेची घोषणा झाली आहे. त्यानुसार आता वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना दर महिना तीन हजार रुपयांची पेन्शन मिळेल,
असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू झाली आहे. यासाठी कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) कार्यालयांमध्ये अर्जदारांसाठी एक खिडकी उघडली जाणार आहे. असंघटित कामगार मध्ये घर कामगार, धोबी, भूमिहीन मजूर, शेतमजूर, रिक्षाचालक, बांधकाम मजूर, बिडी कामगार, हातमाग कामगार, चर्मकार, आॅडियो-व्हीडियो कामगार , तसेच बांधकाम क्षेत्रातील मजूर  व अन्य व्यवसायातील कामगार ज्यांचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपये व त्यापेक्षा कमी आहे ते पात्र ठरतील.
खालील योजनांचा सदस्य नको.
पात्र व्यक्ती ही नवी पेन्शन योजना, कर्मचारी राज्य विमा योजना किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा सदस्य नको. पात्र व्यक्ती करदाताही असायला नको.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे 
कॉमन सर्व्हिस सेंटर’मध्ये (सीएससी) खालील पैकी कागद पत्रे घेऊन नोंदणी करू शकता 
आधार कार्ड, बँकेचे खाते, जनधन खाते  आणि मोबाईल फोन असणे आवश्यक आहे

इ. दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप आणि शुभेच्छा समारंभबाळू राऊत प्रतिनिधी 
कर्जत : दि.२५ श्री भैरवनाथ विद्यालय निमगाव गांगर्डा येथे दि.25/02/19 रोजी इ. दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप आणि शुभेच्छा समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री माणिकराव बापू अनभुले हे होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी काटे उपनिरीक्षक डेक्कन पुणे हे  होते यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करून साहेबांनी 10 वी च्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा तसेच इ.10 वी नंतर असणाऱ्या विविध क्षेत्रातील संधी याविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्या. श्री दळवी सर यांनी केले .याप्रसंगी इ.10 वी च्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण घेत असतानाचे विद्यालयातील अनुभव कथन केले, यावेळी उत्कर्ष रवी पाटील याने देखील उत्कृष्ठ भाषण करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या,
यावेळी नायब सुभेदार मेजर नितीन शेलार हे देखील कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते त्यांनी देखिल विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच 10 वी मध्ये प्रथम क्रमांकास रु1000 व द्वितीय क्रमांकास रु500 बक्षिस जाहीर केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .यावेळी पंचायत समिती सदस्य श्री बाबासाहेब गांगर्डे ,स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष श्री आनंदराव गांगर्डे मेजर एकनाथ गांगर्डे ,बबन पाटील,श्री पाटील सर, ग्रा. स. श्री दादासाहेब अनभुले ,राहुल गांगर्डे तसेच गायकवाड दुकानदार ,दत्तात्रय गांगर्डे ,शरद गांगर्डे तसेच मांदळी चे प्रा. शिंदे सर ,उद्योजक विजय गांगर्डे ,मेजर छबूराव गांगर्डे,श्री शेलार सर ,श्री गायकवाड सर ,श्री दादासाहेब कांबळे तसेच महिला पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा समारोप आणि पाहुण्यांचे आभार श्री साबळे सर यांनी मानले.
 या सर्व कार्यक्रमासाठी श्री भैरवनाथ विद्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.