तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

मी 16 मंत्र्यांची भ्रष्ट्राचाराची प्रकरणे काढली म्हणून मला अडचणीत आणण्याचा प्रयन्त - धनंजय मुंडेपंकजाताईंसाठी मीच 2009 ला आमदारकी सोडल्याचा दावा

मुंबई (प्रतिनिधी) :-  दि 6 --देवेन्द्र फडणवीस सरकारमधील १६ मंत्र्यांचे मी घोटाळे पुराव्यानीशी बाहेर काढले त्यामुळे मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी सरकारचे अपयश, मंत्र्यांचे घोटाळे, राज्यातील परिस्थिती, स्व. मुंडे साहेब यांच्या मृत्यूचे प्रकरण, बीडचे राजकारण आणि स्वतःवर होणा-या आरोपानाही बिनधास्त उत्तरे दिली.

विरोधीपक्ष जेव्हा सरकारवर हावी होतो, तेव्हाच विरोधी पक्षातील व्यक्तींना बदनाम करण्याचं काम केलं जाते. आरोप करायचाच असेल तर तो सिद्ध करून दाखवा असे आव्हान त्यांनी दिले.

ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी माझ्यासाठी राजकारण सोडलं असतं असं वक्तव्य केले होते त्याला उत्तर देताना त्यांनी राजकारण सोडले असते  की नाही हे माहीत नाही. मात्र २००९ साली मी निवडणूक लढवावी अशी लोकभावना असतानाही  ताईंसाठी मी मात्र आमदारकी सोडली होती. बहिणीच्या प्रचारावेळी घोषणा देणारा मी पहिला होतो अशी आठवण करून दिली.

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचे निधन, अपघात की घात? हा मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे. साहाजिकच माझ्या मनातही शंका आहे. सामान्य लोकांना सीबीआयचा अहवाल मान्य नाही. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचे समाधान हे सरकार करणार आहे का? असा प्रश्न मुंडे यांनी विचारला.

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकची पार्टी आहे. स्थानिक पातळीवर मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. जनतेचा पाठिंबा आणि विश्वास आमच्या बाजूने आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीलाच अग्रस्थान मिळणार हे निश्चित मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा लढावणार की विधानसभा या प्रश्नावर, विधानसभा लढवण्यासाठी उत्सुक असलो तरी पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळणार. कुठल्याही पदासाठी नाही तर, परिवर्तनासाठी लढत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

No comments:

Post a Comment