तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

बाल धमाल स्पर्धा 2019 मध्ये संस्कारचा दबदबा; सर्वाधिक बक्षीसांची लयलुटपरळी वैजनाथ दि. 05 (प्रतिनिधी) :-  दै. मराठवाडा साथीच्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बाल धमाल 2019 मधील सर्व स्पर्धांवर संस्कार प्राथमिक शाळेचा दबदबा कायम राहिला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्कार प्राथमिक शाळेने सर्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेले संघ व विद्यार्थ्यांनी आपले कला नैपूण्य दाखवित सर्वाधिक बक्षीसांची लयलुट केली. या आयोजित स्पर्धेत संस्कार प्राथमिक शाळेने 13 बक्षिसे मिळविले व आपले सांस्कृति कला अधिराज्य गाजविले.
दै. मराठवाडा साथीच्या बर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत परळी शहर आणि तालुक्यातील हजारो विद्यार्थी सहभागी होतात. सामुहिक नृत्य स्पर्धेत दरवर्षी प्रथम क्रमांक मिळवुन इतिहास घडविला चिञकला रंगभरण स्पर्धेत व्दितीय कु. वैष्णवी गोविंद कंकाळ, वैयक्तिक नृत्यस्पर्धा कु. प्राची भद्रे, उत्तेजनार्थ समुह नृत्य स्पर्धा संस्कार प्राथमिक शाळा व्दितीय (शहरी गटातर्फे) संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती प्रथम (शहरी गट 5 वी ते 7 वी), संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर तृतीय, वैयक्तिक गायन स्पर्धे कु. प्रिती सराफ व्दितीय (शहरी 1 ते 4 थी) व्दितीय निबंध स्पर्धा कु. आस्मिता गौरव आघाव द्वितीय वेशभुषा स्पर्धा चि. प्रतिक सुरवसे द्वितीय (5 ते 10 गट) एकपाञी अभिनय चि. प्रथमेश नव्हाडे - व्दितीय, चिरंजीव गौरव खाडे - तृतीय, कु. वैष्णवी दौंड-तृतीय अशा प्रकारे बक्षिसे मिळविले आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दिपकजी तांदळे, परळी भुषण पुरस्कार प्राप्त तथा संस्कार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीती गित्ते पी.आर. यांनी अभिनंदन केले. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment