तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

‘संत विचार अंगीकारा, आचरणात आणा’ - स्वामी.डॉ.तुळशीराम गुट्टे महाराजधर्मापुरी | अर्जुन फड
दि.12 फेब्रुवारी २०१९

मनुष्य म्हणून जन्माला आल्यास मानवी देहाचे कार्य काय आहे हे प्रत्येकाला कळणे गरजेचे आहे. मृत्यूलोकात माणूस स्वार्थासाठी जागा आहे. आणि याच मानवी देहातील स्वार्थ, अज्ञान, अहंकार दूर करण्याचे कार्य श्री संत मीराबाई आईसाहेब व संतांनी सोप्या साध्या कणखर विचारातून केले. म्हणूनच संतांचे विचार आजही सूर्यासारखे प्रखर आहेत. या संत विचारांचे सर्वांकडून आचरण होणे हाच खरा परमार्थ असल्याचा उपदेश डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी केला
           भाविकांचे श्रद्धास्थान संत मीराबाई संस्थान महासांगवी येथे संत मीराबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या किर्तनसेवेत बोलताना 
संत नामदेव महाराजांच्या “भक्तीविण मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हाथ उभारोनी” या अंभगाचे निरुपण स्वामी डॉ.गुट्टे महाराजांनी केले. ते म्हणाले की, माणसाने काही गोष्टी विचारल्या, तर सांगाव्यात, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नयेत आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात, हे तत्त्वज्ञान प्रत्येकाला कळावे, यासाठी संत विचार आहेत. समाजातील लोकांचे अज्ञान दूर करण्याचे कार्य सर्व संतांनी केले. समाजाला त्यांच्या हितासाठी उपदेश केला. कारण अज्ञानी माणसाला उपदेश करण्याचा अधिकार संतांना होता. संतांनी केलेला उपदेश लोकांच्या भल्यासाठीच आहे, म्हणून ‘संत विचार अंगिकारा, आचरणात आणा’ असे प्रतिपादन सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन चे संस्थापक तथा संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी केले महाराजांनी केले. 
       यावेळी महंत राधताई सानप आईसाहेब, मान्यवर व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment