तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

स्वाती राठोड प्रकरणी गेवराईत बंजारा समाजाचा चक्का जाम
सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ११ __ टगेगिरी करणाऱ्या मुलांकडून सततच्या होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून वडवणी तालुक्यातील शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे. प्रकरण घडून पंधरा दिवस उलटून गेले तरी पोलीस प्रशासन सर्व आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरले आहे.
      पोलीस प्रशासनाच्या या उदासीनतेच्या विरोधात आणि स्वाती राठोड ला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवार दिनांक ११ फेब्रूवारी रोजी गेवराई तालुक्यातील सर्व पक्षीय व सर्व संघटनेच्या वतीने गेवराई पंचायत समिती जवळ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्वाती राठोडच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या सर्वच आरोपीस कठोर शासन करण्यात यावे, स्वाती राठोडच्या कुटूंबियाना पंचवीस लाखाची मदत करावी, स्वाती राठोडचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, स्वाती राठोडच्या प्रकरणी बंजारा समाजाकडून करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित परत घेण्यात यावे, 
बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, क्रिमीलिअरचा काळा कायदा रद्द करण्यात यावा, पाचशे लोकसंख्या असलेल्या बंजारा तांड्यावर स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन करण्यात याव्यात, वसंतराव नाईक महामंडळ व तांडा सुधार योजनेच्या अध्यक्षांची त्वरित निवड करून एक हजार कोटीचा विकासनिधी मंजूर करण्यात यावे, बंजारा समाजाच्या या व इतर प्रलंबित मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 
या आंदोलनात प्रा.पी.टी चव्हाण, अण्णासाहेब राठोड, गणेश चव्हाण, कृष्णा राठोड, लक्ष्मण चव्हाण, बी.एम.पवार, जीवन राठोड, दिनेश पवार, सर्जेराव जाधव, अंकुश राठोड, मोहन जाधव, नितीन चव्हाण, संगीता चव्हाण, रोहीदास चव्हाण, रघुनाथ राठोड, सतिश पवार,  बाबासाहेब राठोड, विनायक चव्हाण, सुदाम चव्हाण, संतोष राठोड, बाबुराव जाधव, नवनाथ आडे, अंबादास सांगळे, अनिल महाराज, राजेश पवार, विलास राठोड, पिकाजी राठोड, बालाजी पवार, भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे नेते, कार्यकर्ते, महिला, युवक युवती, विद्यार्थी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 
    पोलीस अधिकारी तडवी यांनी मागण्यांंचे निवेदन स्वीकारले. सेवालाल महाराज की जय, स्वातीला न्याय मिळालाच पाहिजे, 'हमशे जो टकरायेगा मिट्टी मेंं मिल जायेगा' अशा गगनभेदी घोषणांंनी गेवराई शहर दणाणून गेले. या वेळी बंजारा समाजाच्या अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment