तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

विद्यापूर्ती इंग्लिश स्कूल चे साहवे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न.जिंतूर
विद्यापूर्ती इंग्लिश स्कूल चे साहवे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न. झाले
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी विध्यार्थ्यांच्या  कला गुणांना वाव देण्यासाठी त्याना एक हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी जिंतूर येथील विद्यापूर्ती इंग्लिश स्कूल जिंतूर चे साहवे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित  करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रतापराव देशमुख मा. न. प अध्यक्ष जिंतूर  तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री  गजानन वाघमारे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी परभणी, श्री उपेंद्र दुधगावकर मु. अ. सिध्देश्वर वि. जिंतूर, श्री विजय चोरडीया  जिंतूर पंकज तिवारी विधीतज्ञ व श्री भाऊराव देवकर  हे होते . चिमुकल्या विध्यार्थी यांनी विविध प्रकारचे नृत्य, नाटक, मुख अभिनय सादर करून प्रेक्षकांचे मने जिंकली.त्यामध्ये भरतनाट्यम, नाटिका मध्ये मोबाईल मुले होणारे दुष्परिणाम,शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी  शेतकऱ्यांनी केलेली एकजुटी असे विविध उपक्रम दाखून प्रेक्षकांचे मन वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी देशमुख व रोहिणी पारसेवार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment