तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 February 2019

जमिन हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टाक यांच्या विरुद्ध गुन्हानगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगेसह सोमनाथअप्पांचे उपोषण
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-  कावेरी प्लाझा ते गार्डनरोड दरम्यान जुन्या न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या जागेवरुनवाद निर्माण झाला असून या जागेवर आम्हाला न विचारता मार्कआउट टाकून हडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे व सोमनाथअप्पा हालगे यांनी करत या विरोधात त्या जागेवर उपोषण सुरु केले. याबाबत रात्री परळी शहर पोलीस ठाण्यात रवी अरुण टाक व इतर अनोळखी तीघांविरुद्ध  परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत प्राप्त माहिती अशी की, कावेरी प्लाझा ते जिजामाता उद्यान रोड लगत जुन्या न्यायालयाच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवरुन सध्या वाद सुरु आहे. सर्वे नं.40/1 मधील ही जागा आपलीच असून आम्हाला न सांगता या जागेवर मार्कआउट टाकुन साफ सफाई करण्यात येत असल्याने यासाठी कुठलीच परवानगी नसून आमच्यावर अन्याय होत असल्याच्या कारणावरुन परळीच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे व त्यांचे पती नगरसेवक सोमनाथअप्पा हालगे हे सदरील जागेवरच उपोषणास बसले होते. रात्री 9.00 च्या सुमारास त्यांनी उपोषण स्थळ सोडून पोलीस ठाण्यात धाव घेतली. व याप्रकरणी रवि अरुण टाक यांच्या विरोधात परळी शहर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment