तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 February 2019

व्यंकटेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल


परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- 
 शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे झालेल्या बैठकीत शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हनुमान नगर येथील युवकांनी भगवा खांद्यावर घेऊन शिवसेनेत प्रवेश केला.

दि ८फेब्रुवारी रोजी सायं ७ वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते भारतीय विद्यार्थी सेने चे जिल्हा प्रमुख प्रा अतुल दुबे, उपशहर प्रमुख अभिजित धाकपडे, युवा नेते संतोष चौधरी, कृष्णा सुरवसे, सुदर्शन यादव, दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातील धडाडीचे युवक गणेश कुंभार यांच्या सह अभिजित कस्तुरे, शाम बावणे, गोपाळ बोबडे, मुकेश गवते, आकाश बावणे, बबलू मोरे, विकास बावणे, मंगेश हुशारे, भागवत तिडके, नवनाथ भोकरे, गजानन डाके, राजू कापसे अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी बोलताना व्यंकटेश शिंदे यांनी युवकांना मार्गदर्शन करत असताना हिंदुत्वाचा भगवा सदैव फडकत राहण्यासाठी व गरजु जनतेला मदतीचा हात देण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तरुणांच्या मनावर बिंबवण्याचे कार्य येनाऱ्या काळात करू अशी शपथ ही गणेश कुंभार यांच्या सह इतर शिवसैनिकांनी घेतली.

No comments:

Post a Comment