तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

आगाऊ आलेले दोन लाख रुपये इंडिया बँकेला केले परत;कान्सूरच्या शेतक-याचा प्रामाणिक पणा


किरण घुंबरे पाटील
पाथरी:-सद्याच्या युगात बेईमानी, फसवनूक, लबाडी,लूट चोरीच्या घटना पावलेपावली घडतांना दिसून येतात एखाद वेळी पैशाच्या देवाणन घेवानीत कमीजास्त पणा होत ही असतो. अशा वेळी वादविवाद होण्याच्या घटना दैनंदिन व्यवहारात नियमित होत असतात.मात्र याला अपवाद ठरली ती मंगळवारची पाथरी येथिल स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेतील घटना दिड लाखाचा विड्रॉल भरून दिल्या नंतर रोखपाला कडून चुकीने साडेतीन लाखाची रक्कम शेतक-याला देण्यात आली. मात्र ही बाब शेतक-याच्या लक्षात येताच त्यांनी  दोन लाख रुपये प्रामाणिक पणे परत करत मनाचा मोठे पणा दाखऊन देत शेतकरी कतीही मजबुरीत जगत असला तरी प्रामाणिक पणा सोडत नसल्याची जानिव करून दिली. रक्कम परत केल्या नंतर बँकेत पेढे वाटून आनंद साजरा केला गेला.
या विषयी थोडक्यात माहिती अशी की, पाथरी तालूक्यातील कान्सूर गावचे गोकूळ रतनराव शिंदे आणि त्यांचे बंधू धनंजय रतनराव शिंदे हे मंगळवार 5 फेब्रुवारी रोजी येथिल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे काढण्या साठी गेले. या वेळी गोकूळ यांनी त्यांच्या बँक खात्यातून दिडलाख रुपये काढण्या साठी विड्रॉल स्लीप भरून दिली. या वेळी येथील रोखपाल उदीत तिवारी यांच्या कडून नजर चूकीने दोन हजाराच्या नोटा साडेतीन लाख रुपये गोकूळ यांना देण्यात आले. परभणी येथे कोर्टात तारीख असल्याने गडबडीत गोकूळ यांनी ही रक्कम घेऊन बँके बाहेर आले. या रकमेतील एक लाख रुपये दुस-या व्यक्तीला द्यावयाचे असल्याने त्यांनी त्यातून एकलाख रुपये काढले आणि झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला. या वेळी गोकूळ शिंदे यांनी कॉ दिपक लिपने यांना फोनवरून हा प्रकार सांगितला आणि मला घाई असल्याने परभणीला कोर्टाच्या कामा साठी जायचे आहे. बँकेचे दोनलाख रुपये आगाऊ आलेले तुम्ही परत करा मी ठेऊन जातो असा निरोप दिला. या वेळी कॉ लिपने तीथे नसल्याने शिंदे यांनी गोपेगाव येथील ट्रँक्टर ड्रायव्हर सिद्धेश्वर गिराम यांच्या कडे रक्कम देउन कॉ लिपने यांच्या कडे देण्यास सांगितले. सायंकाळी पाच वाजन्याच्या सुमारास कॉ लिंबाजी कचरे, कॉ दिपक लिपने,कॉ शरद कोल्हे, कॉ दिपक कोल्हे, कल्यान जाधव,पत्रकार किरण घुंबरे पाटील यांच्या उपस्थितीत बँक व्यवस्थापक मंगेश नवसालकर, रोखपाल उदीत तिवारी यांना दोन लाखरूपयांची रक्कम कॉ लिंबाजी कचरे यांच्या हस्ते परत करण्यात आली या वेळी बँकेत पेढे वाटून आनंद साजरा करत शिंदे यांचे बँक व्यवस्थापक आणि रोखपाल यांनी मनस्वी आभार मानले अशा क्वचित घटना घडतात की ग्राहक आगाऊ आलेले पैसे स्वत:हून परत करतात अशी प्रतिक्रीया दिली. गोकूळ शिंदे यांचा लवकरच बँक शाखेच्या वतीने सत्कार करणार असल्याचे ही नवसालकर यांनी सांगितले. गोकुळ शिंदेंच्या या प्रामाणिकते बद्दल सर्वत्र कैतूकांचा वर्षाव होत आहे.

3 comments:

  1. इंसानियात जिंदा है

    ReplyDelete
  2. पहिल्या पासुनच शेतकऱ्यांनी ईमानदारी सोडली नाही.
    ईतर लोकांनी शेतकऱ्यांना लुबाडायचे ससोडले नाही.
    शेतकरी सुखी तर जग सुखी.

    ReplyDelete