तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 February 2019

स्पार्किग ने आग लागून ऊसासह ट्रॅक्टर जळून खाक


पाथरी तालूक्यातील देवेगाव गलबे येथील घटना

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-ऊस भरलेल्या ट्रॅक्टर च्या हेड मधील वायरींगमध्ये अचानक बिघाड झाल्याने स्पार्किग होऊन लागलेल्या आगीत टूॅक्टर सह ऊसाने भरलेली ट्रॉली जळून खाक झाल्याची घटना बुधवार १३ फेबुवारी रोजी तालूक्यातील गलबे देवेगाव येथे सकाळी साडेदहा आकराच्या सुमारास  घडली असुन यात शेतकऱ्याच्या ऊसासह ट्रॅक्टरचे ६ लाख २० हजाराचे नुकसान झाले असुन सदरील घटनेचा पंचनामा करून चौकशी करण्याची मागणी तक्रारी द्वारे शेतकऱ्याने पोलिस ठाण्यात केली आहे. वेळीच पाथरी न प च्या आग्नीशमन दलाच्या गाडीने आग आटोक्यात आनली त्यामुळे पुढील अनर्थ टळून मोठे नुकसान टळले.
      पाथरी तालूक्यातील देवेगाव (गलबे ) येथील शेतकरी विकास राधाकिशन गलबे यांची देवेगाव शिवारात एकून १८ एकर शेती असुन यातील गट नं .२२७ मध्ये ६ एकर मध्ये ऊसाची लागवड करण्यात आली असुन या ६ एकरातील ३ एकर ऊस यापूर्वी पाथरी तालूक्यातील रेणूका शुगर्स साखर कारखान्यास घालण्यात आला होता. उर्वरीत ३ एकर ऊस हा बुधवार १३ फेब्रुवारी रोजी जालना जिल्हयातील समृध्दी साखर कारखान्यास तोडी करून ट्रॅक्टर द्वारे जात असतांना बुधवार १३ फेब्रुवारी रोजी या ऊसाची तोड सुरु होती सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान कामगारांनी ऊस तोडून  ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये भरत असतांना एक ट्रॉली भरल्यानंतर दुसरी भरत असतांना अचानक ट्रॅक्टरच्या हेडमध्ये वायरींग मध्ये बिघाड होऊन झालेल्या स्पार्किंगने ट्रॅक्टरच्या हेडला आग लागली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले.या घटनेत काही वेळातच हेड आगीच्या भक्षस्थानी सापडल्यानंतर त्यास जोडलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीनेही ऊसासह पेट घेतल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ पाथरी न प च्या अग्नीशमन गाडीस पाचारण करताच काही क्षणात गाडी घटनास्थळावर पोहचली यावेळी शेतकरी व अग्नीशमन दलाचे कर्मचारी फायर अधिकारी निखिलेश वाडेकर , फायरमन शारेफ खान, शेरू शेख, बळीराम गावडे यांनी अथक परिश्रम घेत आग आटोक्यात आनली. मात्र या घटनेत शेतकऱ्याचा  ऊस जळून जवळपास १ लाख २० हजाराचे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली तर ट्रॅक्टर चे हेडसह ट्रॉलीची टायर जळून ५ लाखा जवळ नुकसान झाले परंतू आग तात्काळ आटोक्यात आल्याने शेतातील उभा ऊस वाचवता आला व पुढील अनर्थटळला. या प्रकरणी शेतकऱ्याने पाथरी पोलीसात तक्रार देऊन सदरील घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

1 comment: