तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे पत्रकारांचा म. फुले जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश



पत्रकारांच्या निवृत्ती वेतनाचा अध्यादेशही निर्गमित

बीड (प्रतिनिधी) :- दि. ०६ ----- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील पत्रकारांना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू झाली असून ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतनही मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या दोन्ही बाबी मंजूर करण्यात आल्या आहेत. 

    महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत  पत्रकारांचा समावेश करावा आणि त्यांना निवृत्ती वेतनही द्यावे अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिका-यांनी     ना. पंकजाताई मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून दिले होते. या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  हया दोन्ही मागण्या मंजूर करण्यात आल्या असून तसे अध्यादेशही सरकारने काढले आहेत. 

महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश झाल्यामुळे पत्रकारांना आता सवलतीच्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. अधिस्विकृती धारक पत्रकार, प्रमुख व्यवसाय पत्रकारिता असणारे तसेच नियमित व कंत्राटी तत्वावर काम करणारे, संपादक, उपसंपादक, वार्ताहर, प्रतिनिधी या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतंर्गत ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्यासंबंधीचा अध्यादेशही सरकारने काढला आहे. वृत्तपत्र आणि इतर प्रसार माध्यमांचे संपादक, पत्रकारिता क्षेत्रात ३० वर्षे काम केलेले तसेच वय वर्षे ६० पुर्ण केलेले पत्रकार यासाठी पात्र असणार आहेत. ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या या प्रयत्नांबद्दल बीड जिल्हयातील पत्रकारांनी त्यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment