तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

आयटकच्या अंगणवाडी सेविकांचे वैजापूर तहसीलला विविध मागण्यांचे निवेदन, बुधवारी औरंगाबादेत जेलभरो आंदोलन.......
गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन वैजापूर तहसीलला देण्यात आले.   देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढीची घोषणा केंद्र सरकारने चार महिन्यांपूर्वी केली होती. तसे आदेशही सर्व राज्य शासनास पाठवण्यात आले होते. मात्र, आश्वासन देऊनही महाराष्ट्र शासनाने अद्यापही या संदर्भात शासन निर्णय पारित केला नसल्याने तसेच प्रादेशिक उपयुक्तांच्या अखत्यारीत असलेल्या प्रलंबित मागण्या, राज्य शासनाच्या अखत्यारीतील प्रलंबित मागण्या अपूर्ण असल्याने या विरोधात राज्यातील आयटकसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांच्या कृती समितीच्या वतीने ११ ते १३ दरम्यान राज्यव्यापी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. 

याच आंदोलनाचा भाग म्हणून औरंगाबाद येथे बुधवार दि १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदे समोर मोर्चा व जेलभरो आंदोलन होणार असून यात अंगणवाडी कर्मचारी स्वतःला अटक करून घेणार आहेत. दरम्यान, मंगळवारी (ता.१२) रोजी वैजापूर आयटकच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वैजापूर तहसील कार्यालयात आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तहसीलदार कार्यालयात हजर नसल्याने नायब तहसीलदार भालेराव यांनी सेविकांचे निवेदन स्वीकारले. औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेत होणाऱ्या जेलभरो आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी मोठ्या संख्यने सहभागी होऊन लढा यशस्वी करावा असे आवाहन यावेळी राज्य कौन्सिल सदस्या कॉम्रेड शालिनी पगारे यांनी केले.

No comments:

Post a Comment