तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष लाखे


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १२ (प्रतिनिधी) तालुक्यातील एरंडगाव येथील उपसरपंच तथा युवा नेते संतोष लाखे यांची नुकतीच भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
     भाजपच्या वतीने पक्ष वाढीसाठी व तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्षाचे विचार पोहचवण्यासाठी नियोजनबद्ध ध्येय धोरण ठरवून तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विविध पदाच्या माध्यमातून सन्मान करत त्यांना काम करण्याची संधी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांच्या निवडी करण्यात येत आहे. गेवराई तालुक्यात गेल्या अनेक वर्षपासून स्व.मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी उत्तम पार पडल्यानंतर युवा नेते संतोष लाखे यांच्यावर आता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही निवड ना.पंकजाताई मुंडे, खा.प्रीतमताई मुंडे व आ.लक्ष्मणराव पवार यांच्या आदेशावरून भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली. आ.लक्ष्मणराव पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आ.पवार व सभापती अरुणराव मस्के यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment