तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

एच आय व्ही ग्रस्त यांनी बिनधास्त जिवन जगावे - अलका रणवीर
 विद्यार्थी यांना मिळाला मौलीक सल्ला 

 विद्यार्थी यांनी घेतली शपथ 

फुलचंद भगत
वाशिम -( जिल्हा प्रतिनिधी )दि .8 रोजी स्थानिक सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम च्या वतीने एम .एस .डब्लू .भाग दोन च्या विद्यार्थी यांना संत गाडगे बाबा विद्यापिठ अमरावती च्या वतीने विद्यार्थी यांना चौथ्या सेमिस्टर चा अभ्यास दौरा सुरू आहे .त्या अनुषंगाने प्रा .पि .एन .संधानी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी हिंगोली जिल्हा येथे कार्य करत आहेत .
         यावेळी विद्यार्थी यांनी प्रसिध्द विहान या संस्थेला भेट दिली .व आम्ही माहिती विचारत असतांना या संस्थेच्या अध्यक्ष अलका रणवीर म्हणाल्या की .समाजात वावरत असताना एच .आय .व्ही .बाधित व्यक्ती  समोर येत नाही .व ते व्यक्ती आपल्याला जडलेला आजार लपवतात , किंवा ते समोर आणत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत .ह्या समस्या निर्माण होऊ नये म्हणुन निसंकोचपणे समाजात जिवन जगावे , कुठलेही भावना मनात न ठेवता बिनधास्त जिवन जगावे असे आवाहन अध्यक्ष अलका रनवीर यांनी केले.
यावेळी विद्यार्थी प्रविण पट्टेबहादूर , प्रकाश नेतने , सूरज जयस्वाल , अंकुश ढेले , ओम सानप , साईनाथ वाघमारे , अमोल   चव्हाण , कु मंगल शिरसाठ , दैवता चाटसे या विध्यार्थीनी  या एच आय .व्ही .बाबत सखोल माहिती घेवून या गंभीर
बाबीची शपथ घेतली .

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment