तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

अभिनव विद्यालयचे बाल धमाल स्पर्धेत घवघवीत यश
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
   ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालयने दै मराठवाडा साथी आयोजित बाल धमाल स्पर्धा 2019 मधिल सातव्या सत्रात सुध्दा संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली  घवघवीत यश मिळवले. 20 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान संपन्न झालेल्या समूह नृत्य स्पर्धेत माध्यमिक गटातून तालुक्यातून शहरी विभागात द्वितीय,  वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटातून तालुक्यातून शहरी विभागात द्वितीय, वेषभूषा स्पर्धेत माध्यमिक गटातून तालुक्यातून शहरी विभागात प्रथम व तृतीय तसेच प्राथमिक गटातून प्रथम, एकपात्री अभिनय स्पर्धेत माध्यमिक गटातून तालुक्यातून शहरी विभागात प्रथम, उत्कृष्ट प्रभातफेरी स्पर्धेत तालुक्यातून शहरी विभागात प्रथम, सामुहिक कवायत स्पर्धेत तालुक्यातून तृतीय, निबंध स्पर्धेत माध्यमिक गटातून तालुक्यातून शहरी विभागातून द्वितीय, क्रमांक मिळवत सर्वच स्पर्धेत आपली छाप सोडत नेत्रदीपक यश संपादन केले सर्व यशस्वी विद्यार्थी स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष राजेभाउ जब्दे, सचिव परळी भूषण साहेबराव फड, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment