तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

सामाजिक बांधीलकी व भारतीय संस्कृती जोपसण्यासाठी शिबीर महत्त्वाचे - रमाकांत जहागीरदार


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी 
सोनपेठ : समाजातील घटकांना एकत्र करून सर्वांवर योग्य संस्कार व्हावेत व शिस्त निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय योजनेचे शिबीर महत्त्वाचे असून यामधून चांगला नागरीक घडवण्याचे व श्रमप्रतिष्ठा निर्माणाचे काम होते. सामाजिक बांधीलकी व भारतीय संस्कृती यांची जोपासना करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरामधून होत असल्याचे प्रतिपादन समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात रमाकांत जहागीरदार यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ व ग्रामपंचायत विटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराचा समारोप आज दि. 5 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. या शिबीराच्या समारोपासाठी प्रमुख पाहूणे म्हणून हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम,गटविकास अधिकारी बालासाहेब बायस, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, विटा गावचे सरपंच मदनराव विटेकर,मधुकरराव निरपणे, शिवाजीराव भोसले, गोपाळ भोसले, रामप्रसाद यादव, भगवान पायघन, तुकाराम भालेकर, विठ्ठल पुरबुज,भगवान मोहीते, पराक्रम टोम्पे, लक्ष्मण पितळे,  शिवमल्हार वाघे, दत्ताराव कोलते पाटील, डिंगांबर ताल्डे, अरूण तुपसमिंद्रे, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी उपस्थित होते.तसेच या शिबीरास आज तहसिलदार जिवराज डापकर, अँड.श्रीकांत विटेकर, गणेश पाटील व सुभाष सुरवसे यांनी भेट दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. बापुराव आंधळे, प्रास्ताविक प्रा. डॉ. मारोती कच्छवे, अहवाल वाचन प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी व आभार प्रा. गोविंद वाकणकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अंगद फाजगे, प्रा.डॉ. संतोष रणखांब, प्रा. श्रीकांत गव्हाणे यांच्यासह सर्व स्वयंसेवक व गावकऱ्यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment