तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिखरचंद बागरेचा


फुलचंद भगत (जिल्हा प्रतिनिधी)

वाशिम-मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने मागील वीस वर्षापासून वाशिम शहरात १९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडीभूषण विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वधर्मीय समाज बांधवांच्या सहभागातून साजरी करण्यात येत असून या वर्षीच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा यांची निवड करण्यात आली आहे.  दरवर्षी वेगवेगळ्या समाजातील मान्यवरांचे सामाजिक  योगदान लक्षात घेऊन निवड करण्यात येत असते. या वर्षी  पाण्याच्या बाबतीत वाशिम जिल्हा  सुजलाम सुफलाम करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून शिखरचंद बागरेचा यांनी घेतलेला  पुढाकार व त्यांचे  सामाजिक योगदान लक्षात घेता ही निवड करण्यात आली आहे.

येथील जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था सभागृहात बुधवारी पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले हे होते. यावेळी अध्यक्षपदासाठी बागरेचा यांचे नाव सुभाषराव  बोरकर यांनी सुचवले. त्यास उपस्थित सर्वानीच अनुमोदन दिले. यावेळी उर्वरित कार्यकारिणीमध्ये सचिवपदी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, सहसचिवपदी कृष्णा चौधरी, कार्याध्यक्षपदी तेजराव वानखेडे, कोषाध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष गजानन खिल्लारी, सहकोषाध्यक्ष संजीव कोरडे , उपाध्यक्षपदी हरजितसिंग सचदेव, सागर गोरे, माधवराव बल्लाळ,  सविताताई बोरकर, तर संघटकपदी ज्ञानेश भांडारकर, संजय पडोळे, प्रशांत बोरचाटे, सागर खरबळकर, गणेश अढाव, शामभाऊ उफाडे, पवन राऊत ,भारत सोनटक्के आदींची निवड करण्यात आली. समिती सल्लागार म्हणून ह.भ.प. श्रीकृष्ण पाटील, सुभाषराव बोरकर तर मार्गदर्शक म्हणुन मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव नारायणराव काळबांडे आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून सकाळचे जिल्हा प्रतिनिधी राम पाटील चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये नव्याने आजीव सभासद  झालेल्या शिवप्रेमी कार्यकर्त्यांचे प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले.  यावेळी गतवर्षीचे उत्सव समितीचे सचिव सुशील भिमजियानी  व कोषाध्यक्ष  नारायणराव काळबांडे  यांनी  नवनिर्वाचित शिवजयंती  उत्सव समिती अध्यक्ष शिखरचंद बागरेचा यांचे पुष्प देऊन अभिनंदन करीत सूत्रे सोपवलीत. या बैठकीस विधी सल्लागार अॅड.दतराव हजारे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष संजीवनीताई बाजड , संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कोंघे, उत्सव समिती सचिव सुशील भिमजियानी, डिगांबर बोरकर, भारत सोनटक्के, संदीप दहात्रे , बजरंग मोरे, प्रदिप मोरे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे भागवत मापारी, विशाल ठोकळ, योगेश शिंदे, शंकर शिंदे, गणेश सूर्वे ,राहुल बलखंडे, गोपाल कव्हर, प्रशांत बोरचाटे, शुभम बाजड , एकनाथ हिरवे, प्रवीण काटकडे, पुरुषोत्तम पाटील, किशोर हमाने, नीलेश देशमुख, गोपाल देशमुख, सतिष वाघ ,दिगंबर सरकटे, भानुदास भोरे, प्रवीण पट्टेबहादूर, आकाश शिंदे ,श्यामभाऊ उफाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीचे संचालन व प्रास्ताविक नारायणराव काळबांडे यांनी केले तर आभार कृष्णा चौधरी यांनी मानले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment