तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

आर बी अट्टल कॉलेजच्या ओंकारची क्रीडा महोत्सव आंतरविद्यापीठ कबड्डीसाठी निवडसुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि. ८ ( प्रतिनिधी ) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर बी अट्टल महाविद्यालयाचा अष्टपैलू कबड्डीपटू ओंकार भालचंद्र सोनवणे यांंची मुंबई विद्यापीठात होणाऱ्या क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धैसाठी विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
      नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कबड्डी स्पर्धैत ओंकार सोनवणे याने विद्यापीठ संघास उपविजेतेपद मिळवून दिले होते. याच क्रीडा कौशल्याच्या आधारे मुंबई येथील विद्यापीठात १३ ते १५ फेबु २०१९ दरम्यान  महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या राज्य स्तरीय क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धैसाठी ओंकारची निवड झाली आहे. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील क्रीडांगणावर ७ ते १२ फेब्रूवारी दरम्यान कबड्डी प्रशिक्षण सराव शिबीर होणार आहे आणि तेथूनच संघ मुंबईला रवाना होणार आहे.
ओंकार सोनवणे यास क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. सचिन पगारे, प्रा. राजेंद्र बरकसे, प्रा रविंद्र खरात यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले होते. 
     या निवडीबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशदादा सोळंके, उपाध्यक्ष तथा महाविद्यालयाचे कार्यवाह माजी आ. अमरसिंह पंडित, सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य  
दीपक आतकरे, अॅड.एच.एस पाटील, अॅड. आनंद सुतार, बंडू सेठ मोटे, जालिंदर पिसाळ, दीपक आतकरे, प्राचार्य डॉ. रणजितसिंह निंबाळकर, उपप्राचार्य डॉ रजनी शिखरे, उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अशोक जगताप, पर्यवेक्षक प्रा. राजेंद्र राऊत, प्रबंधक बी बी पिंपळे, कार्यालयीन अधिक्षक भागवत गौंडी, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment