तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 February 2019

गेवराई येथील ॲड. गणेश कोल्हे लढवणार लोकसभेची निवडणूकसुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १३ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील खळेगावचे सुपुत्र ॲड. गणेश मारोती कोल्हे हे बीड लोकसभा निवडणूक लढविण्याच्या त्यादृष्टीने रणंगणात येणार असून अनेक सहकारी मित्रांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी त्यांना सहकार्य करण्याची भूमिका दर्शविली आहे.
       याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव या एका छोट्याशा गावातील सामान्य कुटुंबात जन्म घेऊन घराण्याचा सामाजिक कार्याचा वारसा व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद व त्यांच्या सहकार्यातून, समाजकार्य करणारे ॲड. गणेश मारोती कोल्हे हे गेवराई येथील न्यायालयात तब्बल सहा वर्षापासून वकिली व्यवसायात आहेत. या भागातील सामाजिक कार्यात ॲड. गणेश कोल्हे नेहमीच अग्रेसर असतात. यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खळेगाव या गावी झाले. पदवी पर्यंतचे शिक्षण गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालय या ठिकाणी घेऊन औरंगाबाद येथील एम पी लॉ. कॉलेज याठिकाणी शिक्षण पूर्ण केले. २००७ पासून अनेक आंदोलने केल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात केली होती. राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक कामे करत असताना अनेक लोकांच्या इच्छेप्रमाणे व जनतेच्या आशिर्वादाने २०१७ साली राष्ट्रीय समाज पक्ष प्रणित भाजप मित्र पक्षांमधून गेवराई तालुक्यातील राजपिंपरी या गणातून पंचायत गेवराई पंचायत समितीची निवडणूक लढवली. २५९६ मते मिळवून जनतेची इच्छा पूर्ण करत पुन्हा तरुणांना संधी देऊन खळेगाव ग्रामपंचायत निवडणूक जिंकली. सर्वसामान्यांचे प्रश्न लक्षात घेऊन व ते सोडविण्याच्या दृष्टीने सर्वसामान्यातील लोकनेता हवा या उद्देशाने तसेच जनतेला व मतदारांना आपलेसे करून लोकसभेची निवडणूक लढविण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. गणेश कोल्हे यांनी आजही तितक्याच ताकदीने लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली असल्याचे आमच्याशी बोलताना त्यांनी व्यक्त केली.
     गेवराई तालुक्यातील खळेगाव येथिल ॲड. गणेश कोल्हे यांचा असलेला दांडगा संपर्क व लोकाभिमुख कार्य करण्याची क्षमता लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी त्यांना पाठबळ दिले आहे. गेवराई तालुक्यातीलच नव्हे तर सबंध बीड जिल्ह्यामध्ये विविध संघटनेची तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी ॲड. गणेश कोल्हे यांनी संपर्कात राहून आपले निवडणूकीचे धोरण समोर ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीत उतरणारे गणेश कोल्हे आज लोकांना आपलेसे वाटत असल्याने लोकप्रियता मिळेल अशी धारणा अनेकांनी व्यक्त केली आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment