तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

राज्यातील संगणक परिचालकांच्या प्रश्नांवर सकारात्मक विचार करणार - ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे

मुंबई (प्रतिनिधी), :- दि.७..महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सन २०११पासून संग्राम व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक म्हणून हजारो संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करीत आहेत, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक कर्मचारी संघटनेच्या वतीने मंत्रिमहोदयांच्या दालनात विविध समस्यांसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना संघटनेच्या पदाधिका-यांनी विविध समस्यांचे निवेदन दिले यावेळी त्याबोलत होत्या. राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला रहीवाशी,बांधकाम परवाना, पेटीआर नक्कलयासह सर्व २९प्रकारचे दाखले, ग्रामपंचायतीचे संपूर्ण जमा खर्चाची नोंद घेणे, ग्रामसभा, मासिक सभा यांचे ऑनलाईन कामकाज, चौदाव्या वित्त आयोगाचे गाव विकास आराखडे यासह ग्रामपंचायतेतील इतर काम संगणक परिचालक करतो. शेतकरी कर्जमाफी माफी, अस्मिता योजना, जनगणना, सध्या राज्यात सुरु असलेला लाखो कुटुंबांचा घरकुलांचा सर्व्हे,प्रधानमंत्री पिक विमा योजना इत्यादी अनेक प्रकारची कामे मागील सात वर्षांपासून राज्यातील हजारो संगणक परिचालक करीत आहेत. संगणक परिचालकांना मानधनासह इतर येणाऱ्या अडचणी शासनाच्या वतीने सोडवण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिले. यावेळी कोल्हापूरचे विशाल चिखलीकर, चंद्रपूरचे देवेंद्र गेडाम, गोंदियाचे जितेंद्र सांक्रेजी, भंडारा चे नवनित बेहेरे, नागपूरचे अमित लोखंडे, साताऱ्याचे सुहास शितोळे, सांगलीचे अमोल पाहिल, अमरावतीचे सिद्धार्थ मनोहरे, वाशिमचे गोकुळ राठोड, सोलापूरचे प्रदिप शिंगे यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment